‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
प्रेयसीच्या नादात अभिनेता बनून अँग्री मॅनला टफ फाइट दिली…
प्रेमात काय काय होत? किंवा प्रेम लोकांना कसे बदलू शकते? कोणी वेडा होतो कोणी योग्य मार्गाला लागतो कोणी बेवडा बनतो पण एक माणूस चक्क अभिनेता बनला ! बरं बनला ते बनला पुढे जाऊन आपल्या साधेपणाने डायरेक्ट अँग्री यंग मॅन म्हणजे अमिताभ बच्चनला टफ फाइट दिली. आपण बोलत आहोत अमोल पालेकर यांच्याबद्दल. अमोल पालेकर हे नाव घेतले की, डोळ्यासमोर त्यांचा निरागस चेहरा, त्यांची विशिष्ट डायलॉग डिलिव्हरी आणि त्यांचे सादगी असलेले अप्रतिम सिनेमे येतात पण या सर्वांची सुरुवात देखील खूप गमतीशीर होती.(Amol Palekar)
अमोल पालेकर (Amol Palekar) एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले होते आणि त्यांना एक्टिंग आणि सिनेमा ऐवजी चित्रकलेची अतिशय आवड होती. त्यांना मग जेजे स्कुल ऑफ आर्टसमध्ये ऍडमिशन मिळाले. त्यावेळी ते कॉलेज सोबत एसबीआय बँकेत क्लार्कची नोकरी करत होते. त्यांची गर्लफ्रेंड आणि सध्याची बायको चित्रा ही त्यावेळी सत्यदेव दुबेंच्या ग्रुपमध्ये असायची आणि अमोल पालेकर तिची तालिमी पाहत वाट बघायचे. एकदा अशीच वाट बघत असताना सत्यदेव दुबे यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी एका नाटकात अमोल पालेकर यांना घेतले. दुबेजींनी त्यांना अभिनय पण शिकवला. तिथून पुढे अमोल पालेकर यांनी दुबेजीं सोबत अनेक नाटकात अभिनय केला आणि काहींचे दिग्दर्शन देखील केले.
पुढे ६० च्या दशकाच्या शेवटापर्यंत अमोल पालेकर (Amol Palekar) एक यशस्वी थिएटर आर्टिस्ट बनले होते. त्यांची नाटके पाहायला बासू चॅटर्जी, ऋषिकेश मुखर्जी, बासू भट्टाचार्य यायचे. १९७१ साली अमोल पालेकर यांचे ‘शांतता कोर्ट चालू आहे’ या फिल्मद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. नंतर एक वर्षाने त्यांनी ‘अनिकेत’ नावाची नाट्यसंस्था चालू केली. १९७४ साली त्यांना बासू चॅटर्जी यांनी त्यांना ‘रजनीगंधा’ या हिंदी फिल्ममध्ये त्यांना मुख्य अभिनेता म्हणून घेतले. तोपर्यंत त्यावेळच्या हिट फिल्म्समचे स्वरूप म्हणजे उडत्या चालीची गाणी, टाळ्याखाऊ डायलॉग्स, हायव्होल्टेज मारामारी, महागडी लोकेशन असे होते. जंजीर, दीवार, शोले यासारख्या फिल्म्समुळे अमिताभ बच्चन अँग्री यंग मॅनच्या रूपात सुपरस्टार बनले होते.
त्याकाळात रजनीगंधा सारखा लो बजेट ज्यात त्या काली समजले जाणारे हिट फिल्मचे कोणतेच गुण नव्हते. सुरुवातीला फिल्मला वितरक मिळत नव्हते. सहा महिन्यांनी ताराचंद बडजात्या यांनी ही फिल्म वितरित केली मग रिलीज झाल्यावर ओपनिंग खूपच स्लो झाली पण नंतर प्रेक्षक येऊ लागले आणि फिल्म हिट झाली. बासू चॅटर्जी यांचे अमोल पालेकर सगळ्यात लाडके हिरो बनले आणि दोघांनी एकसाथ अनेक फिल्म्स केल्या. अमोल पालेकरांचा स्क्रीन वरचा साधेपण त्यांची यूएसपी बनला.
त्यांना पाहताना प्रेक्षक आणि ते एक होऊन जात कदाचित त्यामुळेच ते कॉमन मॅनचे हिरो बनले. त्या वेळच्या हिट हिरो फॉर्म्युल्यात अमोल पालेकर यांचा ना चेहरा बसत होता ना फिजिक ना डायलॉग डिलिव्हरी पण तरीही त्यांचे चित्तचोर, एक छोटीसी बात, गोलमाल फिल्म्स हिट ठरल्या. यांच्या फिल्म्सच्या कथा एकदम सामान्य पण वास्तविक होत्या आणि त्या आपल्या मनात क्षणा क्षणाला बदलत जाणारे भाव टिपायचा. सुपरस्टार लोकांच्या फिल्म्स रिलीज आधी प्रसिद्धी खेचायच्या आणि अमोल पालेकरच्या फिल्म्स सुरुवातीला कमी ओपनिंग मिळून नंतर पेस पकडायच्या. त्या हळूहळू प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घ्यायच्या.
अमोल पालेकरांनी (Amol Palekar) आता हिट हिरोचा फॉर्म्युलाच बदलला होता. हिरो म्हणून करियर व्यवस्थित चालू असताना त्यांनी भूमिका फिल्म मधून व्हिलनचे काम स्वीकारले आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांचा निर्णय किती अयोग्य आहे अशी चर्चा होऊ लागली पण या सर्व चर्चांना खोटे ठरवत त्यांनी व्हिलन म्हणून तरंग घरोंदा, अग्निपरीक्षा, आदमी औरत व्हिलन या हिट फिल्म्स दिल्या. पडद्यावर साध्या सुध्या भूमिकांसाठी फेमस असलेले अमोल पालेकर यांचे व्हिलन रूप पाहून प्रेक्षक अचंबितच झाले.
==========
हे देखील वाचा : मनमोहन यांच्या मनातलं ‘हे’ गाणं चार वर्षांनी चित्रित झाले…
==========
पुढे अमोल पालेकर ‘आक्रीत’ ही मराठी फिल्म दिग्दर्शित करून दिग्दर्शनात आले. त्यांनी अभिनयापेक्षा दिग्दर्शनात खूप यश मिळवले. दिग्दर्शक म्हणून त्यांनी ५ वेळा नॅशनल अवॉर्ड मिळवला होता. दायरा, अनकही, कुछ रुमानीसा हो जाये, पहेली अशा फिल्म्स दिग्दर्शित केल्या. पहेली तर ऑस्करसाठी निवडली गेली होती ज्यात त्यांनी शाहरुख, राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन जे एकेकाळचे त्यांचे प्रतिस्पर्धी होते त्यांना दिग्दर्शित केले होते. चित्रकार, अभिनेता, दिग्दर्शक, प्रोड्युसर असे अष्टपैलू टॅलेंट असलेल्या कॉमन मॅनला अंडरएस्टिमेट मत करो !