
Ranveer Allahbadia आणि समय रैनानंतर आता युट्यूबर एल्विश यादव याच्या ही अडचणीमध्यें वाढ
Ranveer Allahbadia आणि समय रैना पाठोपाठ युट्यूबर एल्विश यादव ही अडचणीत सापडला आहे. जयपूर पोलिसांनी युट्यूबर एल्विश यादव याच्या विरोधात शहर दौऱ्यादरम्यान सुरक्षा पुरवल्याच्या दाव्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हा दावा फेटाळून लावत यादव यांना कोणतीही अधिकृत सुरक्षा पुरवण्यात आली नसल्याचे म्हटले आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये युट्यूबर एल्विश यादव आपल्या कारच्या पुढे पोलिसांच्या एस्कॉर्ट वाहनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने अडचणीत सापडला आहे. राजस्थान पोलिसांची डायल ११२ गाडी त्यांच्या कार समोरुन जात असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर हा वाद आणखी चिघळला आणि जयपूर पोलिसांनी मंगळवारी एक निवेदन दिले आहे.(Elvish Yadav News)

व्हिडिओमध्ये कृष्णवर्धन विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाताना पोलिसांची वाहने बदलतील, असे सांगताना दिसत आहेत. मात्र, राजस्थान पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. जयपूरचे पोलिस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी सांगितले की, यादव यांना अशी कोणतीही सुरक्षा पुरवण्यात आली नव्हती, हा प्रोपगंडा आहे आणि लवकरच एल्विश यादव आणि प्रताप सिंह खाचरियावास यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी खाचरियावास यांच्या मुलाविरोधात एफआयआर दाखल करण्याचा उल्लेख केला तेव्हा माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावासही पुढे आले.

एल्विश यादव ८ फेब्रुवारी रोजी सांभर येथे एका म्युझिक व्हिडिओ शूटसाठी जयपूरला आला होता आणि प्रवासादरम्यान त्याने व्लॉगही बनवला होता. हे वादग्रस्त फुटेज याच व्लॉगचा भाग होते. या वादावर प्रतिक्रिया देताना माजी मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी स्वत:ला आणि आपल्या मुलाला या प्रकरणापासून दूर ठेवत दोघांनीही पोलिस संरक्षणाची विनंती केली नसल्याचे सांगितले.(Elvish Yadav News)
============================
हे देखील वाचा: घरोघरी मातीच्या चुली मालिकेत दिसणार सुप्रसिद्ध बॉलीवुड अभिनेता Vicky kaushal!
============================
काँग्रेस नेते खाचरियावास म्हणाले की, एल्विश अनेकदा मला भेटायला येतो. एक नेता म्हणून मला अनेक जण भेटतात. माझा पक्ष सत्तेत नाही, त्यामुळे पोलिसांच्या वाहनाची व्यवस्था कोणी केली आणि ती का होती, हे मला माहित नाही. मी किंवा माझ्या मुलाने सुरक्षा मागितली नाही. राज्य सरकारने किंवा एल्विशने याबाबत स्पष्टीकरण द्यावे.