Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

Parinati Movie: छोटा पडदा गाजवल्यानंतर आता Akshar Kothari झळकणार ‘परिणती’ सिनेमात!
आपल्या सोज्वळ अभिनयशैलीने प्रेक्षकांच्या मनात आपलं खास स्थान निर्माण करणारा अभिनेता अक्षर कोठारी आता एका नव्या रूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. अनेक मालिकांमधून छोट्या पडद्यावर आपली छाप पाडल्यानंतर अक्षर आता ‘परिणती’ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करतो आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झालं असून, त्यामधून झळकणारी अक्षरची नजर आणि भावनिक शांतता प्रेक्षकांच्या मनात एक वेगळीच उत्सुकता निर्माण करत आहे. या चित्रपटात अक्षरसोबत सोनाली कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मराठी चित्रपटसृष्टीतील दोन अत्यंत गुणी अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. (Actor Akshar Kothari)

‘परिणती’ या चित्रपटाविषयी बोलताना अक्षर कोठारी सांगतो की, हा चित्रपट म्हणजे त्याच्यासाठी केवळ एक व्यावसायिक संधी नव्हे, तर एक आतून अनुभवलेली प्रक्रिया आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत असतानाच त्याला या पात्रात पूर्णपणे झोकून देण्याची आणि त्याच्या प्रवासाला अनुभवण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णीसोबत काम करणं म्हणजे अक्षरसाठी एक मोठा शैक्षणिक टप्पा होता, असंही तो म्हणतो. ‘परिणती’ने त्याला एक कलाकार म्हणून अधिक समृद्ध केलं, असंही त्याचं स्पष्ट मत आहे.

या चित्रपटाची कथा दोन स्त्रियांभोवती फिरते, मात्र त्याचा गाभा सर्वसामान्य माणसाच्या अंतर्मनातील संघर्षाशी जोडलेला आहे. दोन परस्पर भिन्न पार्श्वभूमीतील स्त्रिया एक वळणावर येऊन एकमेकींच्या आयुष्यात शिरतात आणि त्यांच्या नात्यातून एक वेगळाच अध्याय सुरू होतो. ही केवळ त्यांची गोष्ट नसून, ती आपल्या सर्वांच्या आतल्या लढ्यांची कहाणी आहे, असं या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अक्षय बाळसराफ सांगतात. त्यांनी अक्षरच्या भूमिकेला एक वेगळी उंची दिली असून, त्याच्या अभिनयात पाहणाऱ्यांना खोल भावनिक अर्थ जाणवतो. ‘परिणती’ या चित्रपटाची निर्मिती पीएच फिल्म्स, फिनिक्स फिल्म्स आणि इनसिंक मोशन पिक्चर्स यांनी संयुक्तपणे केली आहे. पराग मेहता आणि हर्ष नरूला हे चित्रपटाचे निर्माते असून, अमित डोगरा, मोना नरूला, रुही माने, आशिष त्रिवेदी, शारदा नरूला, मनोज जैन, मोहित लालवानी, कांचन शाह आणि शांता जैन हे सहनिर्माते आहेत. अक्षय बाळसराफ यांच्या लेखन व दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट अमृता सुभाष, सोनाली कुलकर्णी आणि अक्षर कोठारी या तिघांच्या दमदार अभिनयाने सजलेला आहे.(Actor Akshar Kothari)
=============================
हे देखील वाचा: Harshada Khanvilkar यांनी गणपतीला दिलं ‘शाहरुख’ हे नाव; कारण ही आहे खास !
=============================
‘परिणती’ हा चित्रपट केवळ एक कथा नाही, तर भावनिक गुंतवणुकीचा अनुभव आहे. सध्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नसली, तरी पहिल्या झलकितच प्रेक्षकांमध्ये या सिनेमाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या तीन शक्तिशाली कलाकारांच्या अभिनयातून जे काही प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे, ते निश्चितच मराठी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.