Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

‘तो रोज मला…’ Aamir Khan बरोबर अफेयर च्या चर्चेनंतर गर्लफ्रेंड गौरीने सुपरस्टारच्या खास सवयीचा केला खुलासा…
Aamir Khan १४ मार्च रोजी ६० वर्षांचा झाला. सुपरस्टारने त्याच्या वाढदिवसापूर्वी त्याची नवीन जोडीदार गौरी स्प्रॅटची (gauri spratt) ओळख करून देऊन चाहत्यांना आश्चर्यचकित केले. मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना त्याने आपल्या मैत्रिणीबद्दल सांगितले. बेंगळुरूची रहिवासी असलेल्या गौरीला डेट करत असल्याची ही माहिती त्याने दिली.आमीर खानने गौरी स्प्रॅटसोबतच्या अफेअरचा खुलासा केला आणि तिसऱ्या लग्नाचे संकेत दिल्यापासून इंटरनेटवर हा एकच चर्चेचा विषय ठरला आहे.(Aamir Khan New Girlfriend)

गेल्या २५ वर्षांपासून ओळखत असलेल्या गौरी नावाच्या महिलेला डेट करत असल्याची माहिती आमिरने त्याच्या प्री-बर्थडेला दिली होती. जेव्हा त्याने त्यांच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा ती मीडियाला भेटण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी त्याच्या शेजारी बसली होती, परंतु तिने प्रसारमाध्यमांना आपले फोटो काढू नका अशी विनंती केली. मात्र, चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गोष्टीचा तपास करत असतात. माध्यमांशी संवाद साधताना गौरी आमिर बद्दल बरच काही म्हणाली.
माध्यमांशी संवाद साधताना आमिर आणि त्याच्या मैत्रिणीने काही प्रश्नांची उत्तरे दिली.

डीएनए इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, जेव्हा गौरी स्प्रॅटला विचारण्यात आले की आमिर खानने तिच्यासाठी सर्वात रोमँटिक गोष्ट कोणती केली आहे, तेव्हा तिने कबूल केले की सुपरस्टार आमिर खान खूप रोमँटिक आहे आणि तो तिच्यासाठी दररोज काहीतरी रोमँटिक करतो . आमीर खानने सांगितले की, जरी ते गेल्या वर्षभरापासून डेट करत असले तरी, ते एकमेकांना 25 वर्षांपासून ओळखतात. गौरीपुढे असे ही म्हणाली की, आमिरने तिची ओळख आपल्या कुटुंबाशी करून दिली आहे आणि त्यांनी तिचे खूप मनापासून स्वागत केले आहे.(Aamir Khan New Girlfriend)
==================================
हे देखील वाचा: Baida Trailer: अंगावर काटे आणणारा ‘बैदा’ सिनेमाचा थरारक ट्रेलर रैली; ‘या’ दिवशी होणार रिलीज
==================================
गौरी स्प्रॅट ही बंगळुरूमध्ये सलूनचालवणाऱ्या रिटा स्प्रॅट यांची मुलगी आहे. तिच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार ती मुंबईत ब्लंट सलून देखील चालवते. गौरीला सहा वर्षांचा मुलगा असून ती आमिरला २५ वर्षांपासून ओळखते. 18 महिन्यांपूर्वी त्यांनी डेटिंग ला सुरुवात केली होती.