Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Trailer: सासू-सुनेचं नात्यावर भाष्य करणाऱ्या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लॉन्च !
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज यांच्या निर्मितीतून साकारलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ (AGA AGA SUNBAI KAY MHANTAY SASUBAI) सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. यापूर्वी प्रदर्शित झालेल्या टीझर आणि शीर्षक गीतामुळे चित्रपटाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. आता ही उत्सुकता अधिक वाढवत, नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर एका आगळ्यावेगळ्या आणि अर्थपूर्ण सोहळ्यात सादर करण्यात आला. स्त्री सशक्तीकरणाची ठळक मांडणी असलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केवळ महिलांच्या हस्ते करण्यात आले, हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. उपस्थित महिला पत्रकार आणि चित्रपटाच्या तांत्रिक टीममधील महिलांनी एकत्र येत ट्रेलर लाँच केला. याच कार्यक्रमात अभिनेत्री प्रार्थना बेहेरेचा वाढदिवसही असल्याने संपूर्ण टीमने केक कापत तिचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.(Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Trailer)

सासू-सुनेचं नातं हे प्रत्येक घरात वेगवेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतं. कुठे प्रेम, आपुलकी आणि समजूतदारपणा असतो, तर कुठे मतभेद, कुरबुरी आणि संघर्ष. मात्र या सर्वांपलीकडे या नात्यात एक अदृश्य भावनिक नाळ असते, जी कधीही तुटत नाही. याच नात्याच्या विविध छटा, भावनिक गुंतागुंत आणि बदलते पैलू या चित्रपटात प्रभावीपणे उलगडण्यात आले आहेत. ट्रेलरमध्ये सासू-सुनेचं केवळ आदर्श नातं न दाखवता, त्यातील वास्तववादी संघर्ष, हसरे-खटके प्रसंग आणि हृदयस्पर्शी क्षण प्रामाणिकपणे मांडण्यात आले आहेत. ही कथा केवळ एका घरापुरती मर्यादित न राहता, प्रत्येक स्त्रीशी नातं सांगणारी आहे. स्त्रिया एकमेकींचा आधार बनल्या, तर त्या अधिक सक्षम आणि आत्मनिर्भर होतात, हा विचार चित्रपटातून ठळकपणे मांडण्यात आला आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांच्यानुसार, “‘अगं अगं सूनबाई! काय म्हणताय सासूबाई?’ हा संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा असा चित्रपट आहे. चौकोनी कुटुंबाची ही कथा आहे, ज्यामध्ये विनोद, भावना आणि ओळखीच्या नात्यांमधील गमतीदार प्रसंग आहेत. सासू आणि सुनेच्या नात्यातील ताकद, भावनिक वळणं आणि त्यांच्यातील नातेसंबंध प्रेक्षकांना नक्कीच भावतील.”(Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai Trailer)
===============================
हे देखील वाचा: Big Boss Marathi 6 मध्ये सागर कारंडे ते Gautami Patil सह ‘हे’ कलाकार झळकणार
===============================
झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले असून सना शिंदे आणि उमेश कुमार बन्सल हे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा व संवाद वैशाली नाईक आणि ओमकार मंगेश दत्त यांचे असून पटकथा वैशाली नाईक यांनी लिहिली आहे. छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी मयूर हरदास यांनी सांभाळली आहे. हा चित्रपट १६ जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.