Lalit Prabhakar : एका लव्ह स्टोरीच्या अरेंज मॅरेजची गोष्ट; ‘प्रेमाची

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!
मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) गेल्या काही काळापासून जरी मोठ्या पडद्यावर दिसत नसली तरी तिच्या अभिनयाची आणि मुख्यत: तिची सौंदर्याची क्रेज काही कमी झाली आहे. सध्या कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival 2025) सुरु असून आंतरराष्ट्रीय कलाकरांसोबतच अनेक भारतीय आणि त्यातही बॉलिवूडच्या कलाकारांनी रेड कार्पेट आपल्या हटरे लूकने गाजवलं. पण कान्सच्या रेड कार्पेटची OG क्वीन ऐश्वर्या राय हिने भारतीय संस्कृती जपत रॉयल साडीच्या लूकचे सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे.(Entertainment news)

ऐश्वर्या रायने (Aishwerya Rai) कान्स फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर आयव्हरी रंगाची डिझायनर साडी अन् त्याला बाजूने सोनेरी काठ, गळ्यात लाल रंगाचा नेकलेस, पारंपरिक दागिने, हातात मॅचिंग अंगठी, भांगेत कुंकू अशा पारंपरिक लूकमध्ये पोहोचली होती. सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी तिचा हा लूक डिझाईन केला होता. (Aishwerya rai look in cannes film festival 2025)

सोशल मिडियावर ऐश्वर्याच्या या रॉयल लूकचीच चर्चा रंगली असून ‘क्वीन इज बॅक’ असं कॅप्शन देत तिचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. ऐश्वर्याने २००२ मध्ये ‘देवदास’ (Devdas) चित्रपटावेळी कान्स फिल्म फेस्टिवलला पहिल्यांदा रेड कार्पेटवर हजेरी लावली होती. आणि त्यानंतर आत्तापर्यंत सलग २२ वर्ष ती ‘कान्स फिल्म फेस्टिवल’ (Cannes Film Festival) गाजवत आहे. ऐश्वर्या कायमच सोशल कार्यक्रमात भारतीय संस्कृती जपताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा देखील कान्समध्ये तिने पिवळ्या रंगाच्या साडीत एन्ट्री केली होती. आणि त्यानंतर आजपर्यंत ती दर वर्षी आपलं वेगळेपण जपताना दिसते. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील ऐश्वयाने कान्सला मुलगी आराध्यासोबत (Aaradhya abhishek Bachchan) हजेरी लावली होती. (Bollywood news Update)
================================
हे देखील वाचा: Cannes 2024: ऐश्वर्या राय बच्चनचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील मनमोहक लूक पाहीलात का?
=================================
सध्या ऐश्वर्या जरी रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी ‘पोन्नियन सेल्वन २’ (PS – 2) मध्ये दाक्षिणात्य चित्रपटात ती झळकली होती. ‘और फिर प्यार हो गया’, ‘आ अब लौट चले’, ‘ताल’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘देवदास’, ‘अलबेला’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘जोश’, ‘कुछ ना कहो’, ‘रेनकोट’, ‘क्यु?’, ‘शहीद’, ‘UmraoJaan’ अशा अनेक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिकेत ऐश्वर्या झळकली आहे. (Aishwerya Rai-Bachchan movies)