Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Gharoghari Matichya Chuli : पात्र एक, रुपं अनेक; मालिकेत ऐश्वर्याचा नवा लूक!
कलाकारांसाठी एखादं पात्र साकारणं म्हणजे परकाया प्रवेश असतो. सध्या असाच काहीसा अनुभव घेत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील ऐश्वर्या म्हणजेच अभिनेत्री प्रतीक्षा मुनगेकर (Actress Pratiksha Mungekar). मालिकेत सध्या ऐश्वर्या जानकीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांचा शोध घेत आहे. ही कागदपत्रं मिळवण्यासाठी तिने ओवीला आपल्या जाळ्यात अडकवलं आहे. लहान मुलांना काल्पनिक जगात हरवून जायला आवडतं हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. (Gharoghari Matichya Chuli Serial)

कार्टुन्स आणि त्यांच्या जादुई नगरीत हरवणाऱ्या ओवीची ऐश्वर्याने क्युटू या नव्या कार्टुनसोबत भेट घडवून दिली आहे. आणि हा क्युटू बोलतो आणि आपलं सगळं ऐकतो हा देखिल तिने ओवीला आता पटवून दिलं आहे. त्या बदल्यात जानकीची महत्त्वाची फाईल आणून द्यायची असं तिने ओवीला सांगितलं आहे. क्युटूच्या जाळ्यात ओवी फसणार काय़ हे मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.

घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या दिसत असलेला क्युटू दुसरा तिसरा कुणी नसून ती आहे ऐश्वर्या. क्युटूचा वेष धारण करुन ती ओवीला आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करत आहे. ऐश्वर्या म्हणजेच प्रतीक्षासाठी हे रुप साकारणं अतिशय आव्हानात्मक होतं. एकतर उन्हाळ्यात ही वेशभूषा करणं म्हणजे मोठी कसरत. (Gharoghari Matichya Chuli Serial)
===============================
हे देखील वाचा: Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’; २० वर्षांनंतर मुकेश खन्ना करणार दमदार पुनरागमन !
===============================
या आधीही प्रतीक्षाने मालिकेत बरेच कठीण प्रसंग शूट केले आहेत. मात्र क्युटू साकारताना खूपच मज्जा आली असं प्रतीक्षा म्हणाली. या क्युटूला आवाजही प्रतीक्षानेच दिलाय. त्यामुळे प्रेक्षकांना पहाताना नक्कीच धमाल येणार आहे. घरोघरी मातीच्या चुली आपल्याला सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाह या वाहीनीवर पाहाता येईल.