Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला संस्कृतमध्ये श्लोक
‘७८ व्या कान्स फिल्म फेस्टिवल’ला स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwerya Rai-Bachchan) हिने पारंपारिक साडीचा लूक करुन प्रेक्षकांना घायाळ केलं होतं. रेड कार्पेटवर दरवर्षी ऐश्वर्याचा लूक विशेष लक्षवेधी असतोच. मात्र, यावर्षी अभिनषेक बच्चन णि तिच्या नात्यात दुरावा आला असल्याच्या अफवांना तिने तिच्या कान्स लूकमधून भांगात कुंकू लावून सडेतोड उत्तर दिलं. आता ऐश्वर्याचा कान्स मधील आणखी एक लूक सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला असून चक्क तिने या वेस्टर्न लूकमध्येही भारतीय संस्कृती जपली आहे. कशी जाणून घ्या…(Entertainment news)

‘कान्स फिल्म फेस्टिवल २०२५’ (78th Cannes Film Festival) मध्ये आंतरराष्ट्रीय फिल्मी जगातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली आहे. अशात भारतीय चित्रपटसृष्टीचं ऐश्वर्या राय हिने उत्कृष्ट प्रतिनिधीत्व केलं होतं. पहिल्या दिवशी आयव्हरी रंगाची साडे नेसून त्यावर रुबीचे दागिने तिने परिधान केले होते.तर दुसऱ्या दिवशी ब्लॅक गाऊन घालून तिने पुन्हा एकदा उपस्थितांचं लक्ष वेधलं. ऐश्वर्याच्या या गाऊनवर तिने भगवद्गीतेतील एक खास श्लोक लिहिला होता.(Cannes film festival 2025)
================================
हे देखील वाचा: OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!
=================================
ऐश्वर्याच्या (Aishwerya Rai-Bachchan) दुसऱ्या दिवशीचा लूक फॅशन डिझायनर गौरव गुप्ता याने डिझाईन केला होता. त्याने ऐश्वर्याने परिधान केलेल्या ब्लॅक गाऊनचे डिटेल्स असणारी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यात त्याने लिहिले होते की, “ऐश्वर्याने ड्रेसवर भगवद्गीतेचा एक श्लोक लिहिला आहे. || कर्मण्येवाधिकारस्ते फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि”. त्यामुळे पुन्हा एकदा आपली भारतीय संस्कृती सातासमुद्रापार आपल्या पेहरावातून ऐश्वर्या राय-बच्चन हिने सादर केल्यामुळे भारतीयांसाठी हा अभिमानाचा क्षण नक्कीच असेल.(Bollywood news)
