Abhijeet Sawant : जुन्या गाण्याला नवा साज;अभिजीत चाहत्यांना देणार सरप्राईज

Aishwerya Rai : ऐश्वर्याने नकार दिलेल्या चित्रपटामुळे करिष्मा कपूर झाली सुपरस्टार!
स्वप्नसुंदरी ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) सध्या चित्रपटांपासून विशेषत: बॉलिवूडपासून लांबच आहे. ‘पोन्नियन सेल्वन’ (ponniyin selvan) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकलेली ऐश्वर्या राय पुन्हा एकदा चित्रपटात कधी दिसणार असा प्रश्न तिचे चाहते विचारताना दिसतात. ऐश्वर्या रायने तिच्या एकूण चित्रपटांच्या कारकिर्दित हिट चित्रपट जरी दिले असले तरी इंडस्ट्रीमध्ये स्वत:च स्थान निर्माण करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागला होता. १९९४ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकल्यानंतर १९९७ मध्ये तिने ‘और प्यार हो गया’ (Aur Pyaar Ho Gaya) चित्रपटातून हिंदीत पदार्पण केलं. पण तुम्हाला माहित आहे का १९९६ मध्ये एका सुपहिट चित्रपटाला तिने नकार दिल्यामुळे करिश्मा कपूरचं (Karishma Kapoor) नशीब त्या चित्रपटामुळे फळफळलं होतं. (Bollywood)

ऐश्वर्या राय हिने एका मुलाखतीमध्ये १९९७ साली आलेला ‘और प्यार हो गया’ चित्रपटाऐवजी १९९६ मध्ये आलेला ‘राजा हिंदुस्तानी’ (Raja Hindustani) हा चित्रपट तिचा पहिला चित्रपट ठरला असता असं तिने सांगितलं होतं. (Bollywood gossips) Vouge ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ऐश्वर्या म्हणाली होती की, “मिस वर्ल्ड स्पर्धेला जाण्यापूर्वीच माझ्याकडे ४ चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. खरं तर फिल्म इंडस्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी मी मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता. आणि जर का मी त्या स्पर्धेत सहभागी झाले नसते तर ‘राजा हिंदुस्तानी’ माझा पहिला चित्रपट ठरला असता”. (Aishwerya rai debut film)

‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपट ऐश्वर्या राय हिने रिजेक्ट केल्यानंतर आमिर खानसोबत (Amir Khan) मनीषा कोईराला, पूजा भट्ट आणि जुही चावला यांनाही ऑफर देण्यात आली होती. पण तिघींनीही या चित्रपटाला नकार दिल्यानंतर सर्वात शेवटी करिश्मा कपूरला ही भूमिका विचारली आणि तिने खऱ्या अर्थाने या संधीचं सोनं केलं. (Entertainment)
‘राजा हिंदुस्तानी’ (Raja Hindustani) चित्रपटाचं दिग्दर्शन धर्मेश दर्शन यांनी केलं होतं. या चित्रपटाने करिश्मा कपूरला सुपरस्टार केलं होतं. ५.७६ कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने जगभरात ७६.३४ कोटींची कमाई केली होती. हा त्या वर्षातील म्हणजेच १९९६ मधील सर्वाधिक कमाई करणारा आणि १९९० च्या दशकातील भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘कुछ कुछ होता है’ व ‘हम आपके है कौन’ या चित्रपटानंतर ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटाचा नंबर लागला होता. (Raja Hindustani box office collection)
==============
हे देखील वाचा : Reema Lagoo : बॉलिवूडच्या ‘कूल आई’ला पाहून श्रीदेवीलाही वाटायची भीती!
==============
‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाने करिश्मा कपूर आणि आमिर खान या दोघांनाही भरभरुन प्रेम दिलं होतं. इतकंच नाही तर ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटासाठी करिश्माला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. १९९७ मध्ये आलेल्या या चित्रपटाने फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट संगीत, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक असे सगळेच पुरस्कार पटकावले होते. (Filmfare Awards news)

‘राजा हिंदुस्तानी’ (Raja Hindustani) या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्यासोबत कुणाल खेमु, अर्चना पूरण सिंग, जॉनी लिव्हर, फरिदा जलाल, मोनिश बहल, टिकू तलसानिया असे अनेक कलाकार झळकले होते. ‘राजा हिंदुस्तानी’ चित्रपटापूर्वी आमिर आणि करिष्मा ‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटात एकत्र दिसले होते. आणि त्यानंतर ‘बॉम्बे टॉकिज’ या चित्रपटात २०१३ मध्ये ते एकत्र काम करताना दिसले होते. त्यानंतर आजपर्यंत आमिर आणि करिष्माने पुन्हा स्क्रिन शेअर केली नाही आहे. आगामी काळात पुन्हा एकदा ९०च्या दशकातील या हिट जोड्या चित्रपटांमध्ये दिसतील अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही. (Karishma Kapoor And Amir Khan)