Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

RRR चित्रपटातील कॅमिओचा बादशाह; ८ मिनिटांसाठी आकारले इतके कोटी!
सध्या ‘झपाटलेला’ चित्रपटातील तो आयकॉनिक डायलॉग ‘माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात’ अशी काहीशी स्थिती भारतीय चित्रपटसृष्टीची झाली आहे. म्हणजे काय? तर बॉलिवूड, हॉलिवूड किंवा टॉलिवूड इंडस्ट्रीतील कलाकारांचं चित्रपटातील कॅमिओ करण्याचं प्रमाण फारच वाढलं आहे. एखादा साऊथचा कलाकार बॉलिवूडच्या चित्रपटात कॅमिओ करतो आणि मार्केटच खाऊन टाकतो. अगदी तसंच, साऊथचं मार्केट एका चित्रपटात कॅमिओ करुन बॉलिवूडच्या अभिनेत्याने खाऊन टाकलं होतं. इतकंच नाही तर ऑस्करपर्यंत पोहोचणाऱ्या या चित्रपटात कॅमिओसाठी सर्वाधिक मानधन घेणारा हा एकमेव बॉलिवूड कलाकार ठरला आहे. कोण आहे? जाणून घ्या…(Oscar Award Winner Movie)

तर, लार्जर दॅन लाईफ चित्रपट प्रेक्षकांना देणारे एस.एस. राजामौली यांनी आर.आर.आर (RRR Movie) चित्रपट साकारुन एक नवा इतिहासच रचला. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), राम चरण (Ram Charan) आणि ज्युनिअर एन.टी.आर (Jr NTR) यांच्या प्रमुख भूमिका जरी असल्या तरी यात अजय देवगण (Ajay Devgan) याने कॅमिओ करुन प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं होतं. अजयने या चित्रपटात कॅमिओ करुन भारतीय चित्रपटांच्या इतिहासात सर्वात महागड्या कॅमिओचा रेकॉर्ड नोंदवला आहे.(Bollywood News)
================================
हे देखील वाचा: “Jackie Chan अजय देवगणला म्हणाले तु अॅक्शन सीन्स कर आणि मी…”
=================================
२०१९ मध्ये आलेल्या आर.आर.आर चित्रपटात अजय देवगण याचा स्क्रिन टाईम केवळ ८ मिनिटांचा होता.ज्यासाठी अजयने ३५ कोटी घेतले होते. अजय देवगण हा आत्तापर्यंत कॅमिओ करणारा सर्वात महागडा कलाकार ठरला आहे. आर.आर.आर चित्रपट हा अजय देवगण याचा पहिला तेलुगू डेब्यू चित्रपट होता. (Ajay Devgan Movies)

दरम्यान, ‘आर.आर.आर’ या चित्रपटाची कथा ब्रिटिश हुकुमशाही आणि हैदराबाद निजामाविरुद्ध लढलेले क्रांतिकारक अल्लुरी सीताराम राजू आणि कोमाराम यांच्याभोवती फिरते. चित्रपटात एनटीआर कोमाराम भीम याची भूमिका तर अभिनेता रामचरण अल्लुरी सीताराम याची भूमिका साकारली आहे. राजामौली यांच्या या चित्रपटाचं बजेट ५५० कोटी होतं आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने जवळपास ७६५ कोटी भारतात आणि जगभरात १२०० कोटींच्या घरात कलेक्शन केलं आहे.(Bollywood Tadaka)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi