‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Shaitaan 2 : नवे चेहरे आणि नवी कथा; वशीकरणाची नवी कथा लवकरच येणार!
अॅक्शन स्टार अजय देवगण (Ajay Devgan) याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मग तो ‘सिंघम’ अॅक्शन-कॉमेडी चित्रपट असो किंवा थ्रिलर ‘दृश्यम’ (Drishyam Movie) चित्रपट असो… त्याच्या प्रत्येक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. २०२४ मध्येही त्याच्या ‘शैतान’ (Shaitaan movie) चित्रपटाने प्रेक्षकांना अक्षरश: वेडं करुन ठेवलं होतं…काळी जादू, वशीकरण, अंधश्रद्धा यावर कथानक आधारित असणाऱ्या हॉरर-सस्पेन्स ‘शैतान’ चित्रपटाचा सीक्वेल लवकरच येणार अशी माहिती आता समोर येत आहे.(Bollywood Suspense Movie)

‘शैतान’ चित्रपटाचं दिग्दर्शन विकास बहल याने केले असून गुजराती चित्रपट ‘वश’ (Vash Gujarati Movie) चा हा हिंदी रिमेक आहे. लवकरच शैतानच्या युनिवर्समधील ‘माँ’ (Maa) हा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून यात ‘काजोल’ (Kajol) प्रमुख भूमिकेत असणार आहे. दरम्यान, ‘शैतान २’ मध्ये अजय देवगण, आर माधवन, ज्योतिका आणि जानकी बोडीवाला यांच्यासह आणखी नवे चेहरे दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. ‘वश २’ (Vash Level 2) चित्रपटाची कथा हिंदीत शैतान २ च्या निमित्ताने पुन्हा प्रेक्षकांसमोर आणणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे लवकरच सीक्वेलची अधिकृत घोषणा केली जाईल अशी अपेक्षा केली जात आहे.(Gujarati movie)
================================
हे देखील वाचा: अजय देवगणच्या Son of Sardar 2 ची रिलीज डेट जाहिर!
=================================
‘शैतान’ चित्रपटाच्या शेवटी आर माधवन एका कालकोठडीत बंद असल्याचं दिसतं. त्यामुळे आता ‘शैतान २’ मध्ये आर माधवनचा भूतकाळ दाखवणार की आणखी नवा ट्विस्ट येणार याकडे सगळ्याचं लक्ष आहे. सध्या अजय देवगण रोहित शेट्टीसोबत ‘गोलमाल ५’ (Golmaal 5) चं शूट करत असून ते पूर्ण केल्यानंतर ‘अजय देवगण’ २०२६ मध्ये ‘शैतान २’ चे शूटिंग सुरू करू शकतो. शिवाय या सीक्वेलमध्ये काजोलचा कॅमिओ असण्याची शक्यताही आहे. दरम्यान, ‘शैतान’ चित्रपटाने १७७ कोटींची भारतात कमाई केली होती.(Ajay Devgan Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi