
Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!
अजय देवगण (Ajay Devgan) एकीकडे ‘गोलमाल’ सारखे विनोदी चित्रपट करतोय तर दुसरीकडे ‘दृश्यम’ किंवा ‘भोला’ सारखे कंटेन्ट बेस्ड चित्रपट करुन प्रेक्षकांना आश्चर्यचकित करतोय. याच पठडीतील २०१८ मध्ये त्याचा ‘रेड’ चित्रपट प्रचंड गाजला. एका रिअल इन्कम टॅक्स ऑफिसरची सत्य कथा चित्रपटात दाखवली गेली होती. बॉक्स ऑफिस आणि प्रेक्षकांचं उत्तुंग प्रेम मिळवणाऱ्या रेड चित्रपटाचा सीक्वेल ‘रेड २’ (Raid 2) लवकरच येणार असून रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. (Raid 2 movie update)
या वेळी नव्या शहरात नवी रेड मारताना अजय देवगण दिसणार असून तो ही ‘रेड २‘आता १ मे २०२५ रोजी मारणार आहे. महत्वाचं म्हणजे या चित्रपटात रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिसणार आहे. सोशल मिडीयावर त्याने पोस्ट केलेल्या फोटोमधून तो एक राजकीय नेत्याच्या भूमिकेत दिसणार असं स्पष्ट होत आहे. (Entertainment news)

‘रेड २’ (Raid 2)मध्ये पुन्हा एकदा अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार असून रितेश देशमुख खलनायकाची भूमिका साकारणार आहे. राज गुप्ता दिग्दर्शित ‘रेड २’मध्ये अजय देवगण, रितेश देशमुख, वाणी कपूर (Vaani Kapoor), सौरभ शुक्ला, रजत कपूर दिसणार आहेत. (Bollywood movie)
===========================
हे देखील वाचा: Akshay Khanna : ‘छावा’त औरंगजेब साकारण्यासाठी अक्षयने ठेवली होती अट!
===========================
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रेड’ (Raid) चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १५० कोटींच्या पुढे कमाई केली होती. त्यामुळे पहिल्या भागाचे घवघवीत यश मिळवल्यानंतर आता रेड २ कडूनही प्रेक्षकांना फार अपेक्षा आहेत. खरं तर, २०२५ हे वर्ष अजय देवगणच्या अनेक सीक्वेल्स चित्रपटाचं ठरणार आहे. ‘रेड २’ नंतर ‘दे दे प्यार दे २’, ‘सन ऑफ सरदार २’ (Son Of Sardar 2) हे चित्रपटही लवकरच येणार आहेत.