
Bollywood Movies : ३४ वर्षांच्या कारकिर्दित या अभिनेत्याने फ्लॉपपेक्षा सुपरहिट चित्रपट दिले अधिक!
हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांनी ३० वर्षांपेक्षा अधिक काळ चित्रपटसृष्टीत जरी घालवला असला तरीही त्यांचे हिट पेक्षा फ्लॉप चित्रपट अधिक आहेत. आणि असं असूनही त्यांचं स्टारडम कमी झालं नसून उलट ते अधिक वाढतच आहे… गेल्या काही वर्षात खरं तर तो अभिनेता त्याच्या चित्रपटांच्या सीक्वेल्सवरच नाव आणि पैसे कमवत आहे… कोण आहे तो कलाकार? त्याने किती हिट आणि फ्लॉप चित्रपट दिले ते थोडक्यात जाणून घेऊयात… (Bollywood movies)
वडिल वीरू देवगण बॉलिवूडमधील स्टंट मास्टर असल्यामुळे हिंदी चित्रपांमध्ये आपली जागा तशी सुरळीतपणे निर्माण करण्यात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan) यशस्वी झाला.. पण स्टार किड्स असूनही तुमचा अभिनय किती दमदार आहे यावर सर्व गोष्टी अवलंबून असतात.. अजय देवगणने 1991 साली फुल ओझर कांटे या चित्रपटातून हिंदी चित्रपसृष्टीत अभिनेता म्हणून आपला प्रवास सुरु केला आणि तो २०२५ पर्यंत ३४ वर्ष सुरु आहे.. या ३४ वर्षांमध्ये अजयने १०० पेक्षा अधिक चित्रपट केले असून त्यापैकी ५० पेक्षा अधिक चित्रपट त्याचे फ्लॉप गेले आहेत. त्यापैकीच एक अलीकडचा चित्रपट म्हणजे मैदान… (Entertainment masala)

‘मैदान’ (Maidaan) ची रिलीज डेट तब्बल ५ वेळा बदलण्यात आली होती.. रिलीज डेट बदलल्यामुळे निर्मात्यांवरही बजेटचा परिणाम झाला होता.. परिणामी चित्रपटाने रिलीजनंतर बॉक्स ऑफिसवर निराशाजनक कमाई केली होती… चित्रपटात बऱ्याचवेळा दिग्गज कलाकार असूनही तो हिट होईलच अशी शाश्वती नसते.. आणि मैदानच्या बाबतीत तसंच झालं…या चित्रपटाने बजेटच्या निम्मीही कमाई केली नव्हती. स्पोर्ट्स ड्रामा असलेला हा चित्रपट फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिम यांच्यावर आधारित होता. १९५१, १९६२च्या आशियाई खेळात भारताने सुवर्ण पदक जिंकण्यात सय्यद अब्दुल रहिम यांचं मोठं योगदान होतं. (Entertainment classic news)
===========================
हे देखील वाचा: Raid 2 : “नया शहर और नई रेड…”; अजय देवगण पुन्हा ‘रेड’ मारणार!
===========================
‘मैदान’मध्ये अजय देवगण, प्रियामणी, गजराज राव, नितांशी गोयल, चैतन्य शर्मा, अभिलाष थापलियाल, विजय मौर्य आणि रुद्रनील घोष यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. इतके कलाकार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे. ‘मैदान’ चित्रपटाच्या आर्थिक गणिताबद्दल सांगायचं झालं तर, ‘डीएनए’च्या वृत्तानुसार, हा चित्रपट २५० कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘मैदान’ जगभरात फक्त ७१ कोटी रुपये कमवू शकला. (Bollywood gossips)

अजय देवगण गेला काही वर्षांमध्ये ‘गोलमाल’ चित्रपटाच्या फ्रॅंचायझीमुळे अधिक चर्च आहे. या चित्रपटाचा प्रत्येक भाग प्रेक्षकांना कायमच आवडला आणि त्यामुळे अजय देवगण ‘गोलमाल’च्या जोरावर इतर प्रजोक्ट करत आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.. ‘गोलमाल’ शिवाय ‘दृष्यम’ आणि ‘रेड’ या थ्रिलर, सप्पेन्स चित्रपटांनीही अजय देवगणच्या अभिनयाची एक वेगळी बाजू त्याच्या चाहत्यांना दाखवली… (Ajay Devgan movies)
१९९१ पासून अजय देवगणने पहिलाच डेब्यू चित्रपट हिट दिला होता. त्यानंतर, ‘जिगर’, ‘धनवान’, ‘विजयपथ’, ‘इश्क’, ‘काल’, ‘अपहरण’, ‘ऑल द बेस्ट’, ‘तान्हाजी’, ‘शैतान’, ‘भोला’ असे काही चित्रपट त्याने हिट दिले. तर त्याच्या फ्लॉप चित्रपटांच्या यादीत ‘बेदर्दी’, ‘जंग’, ‘गैर’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘संडे’, ‘महबूब’, ‘जमीर’, ‘थॅंक गॉड’ हे येतात… (Hit or flop movies in Bollywood)

लवकरच अजय देवगणच्या अनेक सीक्वेल्स चित्रपटांची भेट त्याच्या चाहत्यांना मिळणार आहे.. यात ‘सन ऑफ सरदार २’, ‘रेड २’ (Raid 2), ‘दे दे प्यार दे २’ यांचा समावेश आहे.. त्यामुळे आगामी काळात येणारे त्याचे चित्रपट किती हिट असणार आणि किती फ्लॉप हे पाहावे लागेल… (Bollywood upcoming sequel movies)