
Ajay Devgan : ‘सिंघम’सह बॉलिवूडला ‘देवमाणूस’ची भुरळ
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तेजस देऊस्कर दिग्दर्शित ‘देवमाणूस’ (Devmanus) चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीतूनही या ट्रेलरवर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणलाही (Ajay Devgan) या ट्रेलरने भुरळ घातली आहे. आपल्या सोशल मीडियावर ट्रेलर पोस्ट करत त्याने निर्माते लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या मराठीतील पदार्पणाबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच, इतर अनेक बॉलिवूड कलाकारांनीही देवमाणूस या मराठी चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. (Marathi upcoming film 2025)

अजय देवगण याने इन्स्टाग्रामवर देवमाणूसचा ट्रेलर पोस्ट करत ट्रेलर खूपच उत्कंठावर्धक आहे, देवमाणसाची सटकली की काय होते…?, असे लिहून संपूर्ण टीमला चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय, अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao), अर्जुन कपूर, सनी सिंग यांनी चक्क Whatss app स्टोरीवर ट्रेलर पोस्ट करत कौतुक केलं आहे. (Bollywood celebrities)
===============================
हे देखील वाचा: Ajay Devgan : ‘अजय ते विजय साळगांवकर’;बॉलिवूडमध्ये 9 मराठी पात्र साकारणारा देवगण!
===============================
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) आणि रेणुका शहाणे (Renuka Shahane) यांची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘देवमाणूस’ (Devmanus) चित्रपटाचा भावनिक ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये ‘देवमाणूस’च्या रहस्यपूर्ण, गूढ आणि भावनिक कथानकाची झलक पाहायला मिळते. दमदार अभिनय, दाट भावनांचा प्रवाह आणि उत्कंठा वाढवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट एक संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे. (Devmanus trailer)

लव फिल्म्स प्रस्तुत ‘देवमाणूस’ या चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस प्रभा विजय देऊस्कर यांनी केले असून, लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी निर्मिती केली आहे. महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे, सिद्धार्थ बोडके यांच्या भूमिका असणारा हा चित्रपट येत्या २५ एप्रिल २०२५ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.(Entertainment)