‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Ajay Purkar ’अभंग तुकाराम’ चित्रपटात साकारणार खलनायक
विविधांगी भूमिका साकारणारे अभिनेते अजय पुरकर पुन्हा एकदा हटके भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत… दिग्पाल लांजेकर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या ऐतिहासिक चित्रपटांमधून उत्कृष्ट भूमिका साकारणार अजय पुरकर आता त्यांच्याच ’अभंग तुकाराम’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहेत… नायकाप्रमाणे क्रूर खलनायकही चित्रपटांत गाजलेत! याआधी सकारात्मक भूमिकेत दिसलेले कलाकार आता नकारात्मक पात्र साकारणार आहेत. ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटात ‘मंबाजी’ या नकारात्मक रूपात आपल्याला ते दिसणार आहेत.

संत तुकोबांचे वाढते प्रस्थ पाहून ज्यांच्या ज्यांच्या पोटात दुखत होते त्यात मंबाजी हे आघाडीवर होते. काही ना काहीतरी कुरापत काढायची आणि संत तुकोबांना छळायचे हे त्यांचे नित्याचेच काम होते. ‘मंबाजी’ यांचा नीचपणा एवढा होता की तुकोबांना गुरुस्थानी मानणाऱ्या बहिणाबाई यांनी त्याचे वर्णन विंचवाची नांगी । तैसा दुर्जन सर्वांगी असे केलेले आहे.
‘मंबाजी’ या आपल्या खलनायकी भूमिकेबद्दल बोलताना अजय पूरकर म्हणाले की, ‘याआधीच्या माझ्या बऱ्याच भूमिका सकारात्मक प्रवृत्तीच्या होत्या. आजवरच्या माझ्या प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूला येऊन एक वेगळा प्रयत्न या चित्रपटातून मी केला आहे. ही व्यक्तिरेखा कमाल ताकदीची आहे. कलाकार म्हणून स्वीकारलेली ही व्यक्तिरेखा मला खूप महत्त्वाची वाटते. कलाकार म्हणून माझ्या प्रत्येक भूमिकेमध्ये मी वेगळेपण कसं आणू शकतो हे महत्त्वाचं आहे. ‘अभंग तुकाराम’ चित्रपटातील या भूमिकेच्या निमित्ताने मला ही संधी मिळाली.
================================
हे देखील वाचा : Smita Shewale साकारणार ‘अभंग तुकाराम’मध्ये तुकारामांची आवली!
=================================
‘अभंग तुकाराम’ चित्रपटाची कथा आणि संवाद प्रसिद्ध लेखक योगेश सोमण यांचे आहे. दिग्पाल लांजेकर यांनी पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. या चित्रपटात योगेश सोमण, स्मिता शेवाळे यांच्या प्रमुख भूमिका असून ’अभंग तुकाराम’ चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे…