‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेतून ‘या’ अभिनेत्याची एक्झिट; ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता

“’रामायण’ चित्रपटात मी दशरथची भूमिका साकारणार होतो पण…” ; Ajinkya Deo यांनी केला मोठा खुलासा
कलाकार म्हटलं की त्याला अभिनय करताना कधीच भाषेचा अडसर येत नाही असं म्हणतात… किंबहूना प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी भाषा ही अडचण कधीच नसावी… आणि याचमुळे गेली अनेक वर्ष मराठी किंवा अमराठी कलाकार विविध भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करताना दिसत आहेत… असाच एक अभिनेते म्हणजे अजिंक्य देव… मराठी चित्रपटसृष्टी आपल्या अभिनयाने गाजवणारे अजिंक्य देव (Ajinkya Deo) हिंदीतही बरीच वर्ष काम करत आहेत… आता आगामी नितेश तिवारी दिग्दर्शित Ramayan चित्रपटात ते रणबीर कपूरसोबत एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत… जाणून घेऊयात त्यांच्या या भूमिकेबद्दल…
‘रामायण’ हा जवळपास ४००० कोटींचा प्रोजेक्ट असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यात आपला मराठी कलाकार एक महत्वाचं पात्र साकारणार ही अभिमानाची बाब नक्कीच आहे… तर, ‘रामायण’ चित्रपटात सुरुवातीला अजिंक्य देव राजा दशरथ ही भूमिका साकारणार होते आणि त्यासाठी त्यांनी ऑडिशन देखील दिलं होतं… पण काही महिन्यांनी ही भूमिका वर्कआऊट होत नसल्याचा फोन प्रोडक्शनकडून अजिंक्य यांना आला होता… याबद्दल वरिंदर चावलाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, ‘रामायण’साठी मी ऑडिशन दिली होती. दशरथ राजाच्या भूमिकेसाठी मी ऑडिशन दिलं होतं. त्यानंतर खूप वेळा गेला. आणि मग दोन महिन्यांनी मला फोन आला. दशरथ राजाची भूमिका साकारण्याबाबत खरं तर मी संभ्रमात होतो. दशरथ राजाची भूमिका हा खूप मोठा रोल होता. त्यात रणबीर कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत मी दिसणार होतो. पण, त्यांनी मला सांगितलं की दशरथ राजाच्या भूमिकेसाठी तुमची निवड होऊ शकत नाही. पण, ते तुम्हाला एक दुसरा रोल ऑफर करू इच्छितात”… (Entertainment News)

पुढे अजिंक्य म्हणाले की, “मग त्यांनी मला विश्वामित्रच्या भूमिकेसाठी विचारलं. विश्वामित्रबद्दल मला एवढी माहिती नव्हती. रामाचा जन्म कशासाठी झालाय हे माहीत असणारी व्यक्ती म्हणजे विश्वामित्र. ते मला म्हणाले की तुम्ही विचार करून सांगा. मी त्यांना लगेच होकार सांगितला. आणि मला आनंद होतोय की त्या भूमिकेसाठी हो म्हणालो”. त्यामुळे आता ‘रामायण’मध्ये अजिंक्य देव विश्वामित्र ही भूमिका साकारताना दिसणार असून दशरथ राजाच्या भूमिकेत अभिनेते अरुण गोविल (Arun Gowil) दिसणार आहेत. (Mythological Film Of Bollywood)
================================
================================
‘रामायण’ या भव्य पौराणिक चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) प्रभू श्रीराम यांची, साई पल्लवी (Sai Pallavi) सीता मातेची, सनी देओल (Sunny Deol) हनुमानाची, रवी दुबे लक्ष्मणाची, यश रावणाची भूमिका साकारणार आहेत… या व्यतिरिक्त लारा दत्ता, काजल अग्रवाल आणि बरेच बडे कलाकार या चित्रपटात झळकणार आहेत… २ भागांमध्ये ‘रामायण’ चित्रपट रिलीज होणार असून पहिल् भाग २०२६ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… तसेच, अजिंक्य देव यांच्यासोबत आणखी २ मराठी चेहरे ‘रामायण’ चित्रपटाचा महत्वाचा भाग आहेत…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi