
Sanket Korlekar ‘आई-वडिलांनी स्वतःचं पोट मारलं’ अभिनेता संकेत कोर्लेकरची भावनिक पोस्ट
आजच्या आधुनिक काळात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे महत्वाचे साधन झाले आहे. या माध्यमाला अनन्यसाधारण महत्व आहे. कन्टेन्ट क्रियेटर हा अतिशय लोकप्रिय, प्रसिद्ध आणि भरपूर पैसा मिळवून देणारे करियरचे माध्यम ठरत आहे. सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करून त्यातून पैसा कमवण्याचे काम सध्याच्या काळात खूपच प्रचलित होताना दिसत आहे. (Content Creator)
या क्षेत्राला मिळणारे महत्व, ग्लॅमर पाहून सगळेच आता या क्षेत्रात येण्याचा प्रयत्न करताना दिसतात. मात्र हे क्षेत्र देखील इतर क्षेत्रांप्रमाणे मेहनतीचे आहे. फक्त कॅमेरा हातात घेऊन व्हिडिओ काढून तो पोस्ट केल्याने पैसे, प्रसिद्धी मिळत नाही. यामागे खूप मेहनत, सातत्य आणि जिद्द गरजेची आहे. या क्षेत्रात आजच्या काळात अनेक कलाकार काम करताना दिसत आहे. पण यश खूपच मोजक्या लोकांना मिळते यातलाच एक कलाकार म्हणजे अभिनेता संकेत कोर्लेकर (Sanket Korlekar) आणि त्याची बहीण उमा कोर्लेकर (Uma Korlekar). (Sanket Korlekar)
‘अजूनही बरसात आहे’ (Ajunhi Barsaar Aahe) या मालिकेतून प्रसिद्ध झालेला अभिनेता संकेत कोर्लेकर आणि त्याची बहीण अभिनेत्री उमा कोर्लेकर यांचे सोशल मीडियावर एक चॅनेल आहे. या चॅनेलवरून ते विविध फनी व्हिडिओ शेअर करत लोकांचे मनोरंजन करताना दिसतात. नुकतेच त्यांना त्यांच्या या क्षेत्रात मोठे यश मिळाले आहे. त्यांना यूट्यूबकडून सिल्वर बटण (Youtube Silver Play Button) मिळाले आहे. या नव्या ध्येयपूर्तीनंतर त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे. (Entertainment Mix Masala)
“घरात लहानपणापासून आई-पप्पांनी आम्हा दोघांना मोठं करण्यासाठी केलेला संघर्ष बघत मोठे झालो आहोत. पप्पांची दोन वेळच्या जेवणासाठी मेहनत आणि आईची कमी पगारात केलेली काटकसर स्वतःच्या डोळ्यांनी बघितली आहे. आई-वडिलांनी आमच्यासाठी स्वतःचं पोट किती मारलं आहे हे आम्हाला दोघांनाच माहीत. आम्हाला दोघांना आई-वडिलांनी आमच्यावर केलेल्या संस्काराची जाणीव आहे. त्याची किंमत आहे. त्यामुळे आजपर्यंत आई-पप्पांची मान फक्त गर्वाने वर झाली कधीच झुकली नाही. आज त्यांचा मुला-मुलीने एकाच घरात दोन सिल्व्हर प्ले बटण आणले आहेत. (Sanket Korlekar Post)
आमची स्पर्धा स्वतःशी आहे. त्यामुळे हरायची भीती नाही. कोण किती पुढे जातंय? कोण किती मागे राहतंय? याच्याशी आम्हाला काहीही देणे घेणे नाही. आमचे टार्गेट ठरले आहे. आम्हाला इतकं मोठं व्हायचं की, आई-पप्पानी आमचा इतका पैसा बघून टेन्शन घेणेच सोडले पाहिजे. आम्ही क्लिअर आहोत. स्वतःचा रस्ता, स्वतःचे विश्व आणि प्रेक्षकांचे आशीर्वाद. बस्स. बाकी सगळं आमची मेहनत बघून घेईल. धन्यवाद.”
===============
हे देखील वाचा : Hum : ‘जुम्मा चुम्मा दे दे’ चा वाद केवढा गाजला!
===============
या पोस्टसोबतच त्याने हातात सिल्व्हर बटण घेऊन उमा-संकेतने एक फोटो शेअर केला आहे. दरम्यान संकेतच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास संकेतने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. यात ‘अजूनही बरसात आहे’, ‘अंतरपाट’, ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकांमध्ये काम केले आहे. सोबतच तो ‘टकाटक’ या सिनेमात दिसला होता. त्याचे युट्यूब चॅनेलवर ५ लाखांहून अधिक सब्सक्रायबर्स आहेत. तर त्याची बहीण उमाबद्दल सांगायचे झाल्यास ती काही दिवसांपूर्वीच ‘साधी माणसं’ या मालिकेत एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती. या सोबतच तिने मालिकाविश्वामधे पदार्पण केले. तिचे युट्युबवर जवळपास १.५ लाख फॉलोअर्स असून ती फॅशन-लाइफस्टाइल संदर्भातील व्हिडिओ शेअर करते.