Ashok Saraf : ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीने अशोक सराफ यांच्याशी अनेक

Akshay khanna : छावा सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी अक्षय खन्ना नव्हता पहिली पसंती
सध्या सर्वच प्रेक्षकांवर ‘छावा‘ (Chhavaa) सिनेमाने चांगलेच गारुड निर्माण केले आहे. सर्वत्र फक्त याच सिनेमाची चर्चा सुरु आहे. सोशल मीडिया देखील ‘छावामय’ झालेले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) शौर्यावर आधारित असलेल्या छावा या सिनेमाने प्रेक्षकांची, समीक्षकांची आणि कलाकारांची देखील मने जिंकली आहे. सिनेमातील सर्वच कलाकार त्यांच्या अतिशय प्रभावी आणि जिवंत अभिनयामुळे कौतुकास पात्र ठरताना दिसत आहे. छावा सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अभिनेता विकी कौशलने (Vickay Kaushal) साकारली असून, औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना दिसत आहे. (Akshay khanna)
नकारात्मक भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाने तर कमाल केल्याचीच सगळ्यांचीच भावना आहे. एकीकडे पूर्ण ताकदीने विकी कौशलने मुख्य भूमिका साकारताना त्याने छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तर दुसरीकडे अक्षय खन्नाने देखील तोडीस तोड अभिनय करत सगळ्यांची वाहवा मिळवली आहे. आज ज्या भूमिकेसाठी प्रत्येक जण अक्षय खन्नाचे कौतुक करत आहे, त्या भूमिकेसाठी आधी अक्षय खन्ना (Akshaye Khanna) पहिली पसंती नव्हता. (Bollywood Tadka)

कमालीचा अभिनय, करारी नजर, दमदार संवाद, भेदक एक्स्प्रेशन आदी अनेक गोष्टींसाठी आज अक्षय खन्ना या सिनेमातील औरंगजेबाच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून शाबासकी मिळवत आहे. मात्र या भूमिकेसाठी सर्वात पहिली पसंती अनिल कपूर हे होते. एवढेच नाही तर अनिल कपूर (Anil Kapoor) यांना ही भूमिका आवडली आणि त्यांनी या भूमिकेसाठी होकार दिला होता. मात्र काही गोष्टी जुळून आल्या नाहीत आणि अनिल कपूर हे या सिनेमात दिसू शकले नाही. त्यानंतर अक्षय खन्नाकडे ही भूमिका गेली आणि त्याने या भूमिकेचे आणि संधीचे सोने केले. (Chhaava Movie News)
तत्पूर्वी अक्षय खन्नाबद्दल सांगायचे झाले तर ९० च्या दशकातील लोकप्रिय आणि प्रसिद्ध अभिनेता म्हणून त्याचा नावलौकिक होता. अक्षयचे वैशिष्ट्य म्हणजे तो भरमसाठ सिनेमे करण्यापेक्षा कमी पण चांगले सिनेमे करण्यावर भर देतो. अतिशय उत्तम आणि प्रभावी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. अक्षयने छावा सिनेमातील औरंगजेबाची भूमिका देखील अतिशय उत्तम वठवली आहे. आता त्याला या भूमिकेत पाहिल्यानंतर त्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणाची आपण या भूमिकेसाठी कल्पना करू शकत नाही. (Entertainment mix masala)
======
हे देखील वाचा : Chhatrapati Shivaji Maharaj : ‘या’ कलाकारांनी साकारली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका
======
दरम्यान छावा सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर २०२५ सालातला सर्वात मोठा चित्रपट असलेल्या ‘छावा’ सिनेमाची सगळ्यांना प्रतीक्षा होती. अपेक्षेप्रमाणे छावा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर एकच धमाका केला असून छप्पर फाड कमाई देखील केली आहे. सिनेमाने प्रदर्शनानंतर दोनच दिवसात १०० कोटी रुपयांची मोठी कमाई केली आहे. १८ फेब्रुवारीपर्यंत सिनेमाने २२८.८५ कोटी रुपये कमावले आहेत.
विकी कौशल, रश्मिका मंदाना,अक्षय खन्ना, दिव्या दत्ता, आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील पाहायला मिळत आहे. हा सिनेमा लवकरच ३०० कोटींचा टप्पा देखील ओलांडेल असे जाणकार सांगत आहे.