राष्टीय पुरस्कार सोहळ्यात Vidhu Vinod Chopra यांनी लाल कृष्ण अडवाणींसोबत

Akshay Kumar याने एका चित्रपटासाठी १८ वर्षांचा ‘तो’ नियम मोडला होता!
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या चित्रपटातील अॅक्शन सीन्ससाठी प्रसिद्ध आहे… अक्षय त्याच्या चित्रपटातील प्रत्येक स्टंट स्वत:च करत असतो… मग हेलिकॉप्टरमधून खाली उडी मारणं असो किंवा मग दोन गाड्यांवर लटकणं असूदे सारं काही तोच करतो.. बरं अक्षय फिटनेसच्या बाबतीत फारच शिस्तप्रिय आहे… त्याच्यासोबत काम करणारे त्याचे सहकलाकार फिटनेस फ्रिक अक्षयबद्दल फार गोष्टी सांगत असतात… पण तुम्हाला माहित आहे का अक्षय कुमार याने त्याच्या एका चित्रपटासाठी १८ वर्षांपासून स्वत:ला घातलेला एक नियम मोडला होता.. जाणून घेऊयात त्याबद्दल…(Bollywood News)
तर, बॉलिवूडच्या या झगमगाटात अक्षय कुमार त्याच्या व्यायाम आणि शरीरयष्टीवर फार लक्ष देतो.. मात्र, २०२१ मध्ये बेल बॉटम या चित्रपटासाठी त्यावने स्वत:चे काही निमय मोडले होते…‘बेल बॉटम’ चित्रपटाचं स्कॉटलंडमध्ये चित्रीकरण सुरु होतं. स्कॉटलंडमध्ये पोहोचल्यानंतर १४ दिवस क्वारंटाइन राहावं लागणार होतं आणि त्यामुळे निर्मात्यांच्या नुकसानाची कल्पना अक्षयला होती. निर्मात्यांचं नुकसान टाळण्यासाठी अक्षयने १८ वर्षांचा नियम मोडला होता. गेल्या अठरा वर्षांपासून अक्षय कुमार दिवसातून केवळ ८ तासच काम करायचा.(Entertainment Tadaka)
================================
हे देखील वाचा: Ramayana Movie : ‘हे’ मराठी कलाकार झळकणार…९०० कोटींच्या ‘रामायणा’त!
=================================
मात्र, ‘बेल बॉटम’ चित्रपटाच्या निर्मात्यांचं नुकसान होऊ नये यासाठी अक्षय कुमारने डबल शिफ्टमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला होता. चित्रपटाचं लवकरात लवकर चित्रीकरण संपवण्याचा अक्षय कुमारचा प्रयत्न होता. बेल बॉटम या चित्रपटाची निर्माती जॅकी भगनानी केली होती तर रंजित तिवारी यांनी दिग्दर्शन केलं होतं. बेल बॉटममध्ये अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वाणी कपूर, लारा दत्ता हे कलाकार झळकले होते.(Latest Entertainment News)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi