Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?
बॉलिवूडचा अॅक्शन हिरो अक्षय कुमार (Akshay Kumar) एका वर्षात बरेच चित्रपट करतो अशी त्याची ख्याती आहे… परंतु, गेल्या काही काळात एकामागून एक तो चित्रपट जरी करत असला तरी ते हिट होत नाहीयेत… आता अक्षय कुमारच्याच एका सुपरहिट चित्रपटाचा सीक्वेल येणार असून तोच या चित्रपटात नसणार असं सांगितलं जात आहे… २०१२ साली प्रदर्शित झालेला अक्षयचा सुपरहिट अॅक्शन-कॉमेडी चित्रपट ‘राऊडी राठौर’ (Rowdy Rathore) प्रेक्षकांच्या मनात आजही घर करून आहे. या चित्रपटात अक्षयसोबत सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होती. प्रभू देवा यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटाने २०१२ मध्ये बॉक्स ऑफिसवर प्रचंड गल्ला जमवला होता… आता चित्रपटाचा सीक्वेल ‘राऊडी राठौर २’ (Rowdy Rathore 2 Movie) येणार असून यातून अक्षयचा पत्ता कट झाला अशी चर्चा सुरु झाली आहे…
मिळालेल्या माहितीनुसार, ‘राऊडी राठौर २’ शूटिंगची तयारी सुरू झाली आहे. या चित्रपटाची निर्मिती पुन्हा एकदा सुप्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या भन्साळी प्रॉडक्शन्स या बॅनरखाली होणार आहे. तर, सूत्रांच्या माहितीनुसार भन्साळी स्टुडिओ या प्रोजेक्टकडे एका मोठ्या फ्रँचायझीच्या रूपात पाहत आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ‘राऊडी राठौर’ची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या मालिकेला पॅन इंडिया स्तरावर नेण्याचा त्यांचा विचार असून, देशभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नव्या ताज्या स्टारकास्टवर चर्चा सुरू आहे. (Rowdy Rathore 2 movie update)

आता राऊडी राठौर म्हणजे अक्षय कुमार हे समीकरण पक्क आहे… पण यातून त्याचाच पत्ता कट झाला तर हा चित्रपट होणार तरी कसा असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे… ‘विक्रांत सिंग राठौर’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांची अक्षयने मनं जिंकली होती.. मात्र सिक्वेलमध्ये ही भूमिका एका नव्या पॅन इंडिया स्टारकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं जात आहे… अद्याप निर्मात्यांनी या नव्या कलाकाराचं नाव जाहीर केले नसलं तरी, सिनेवर्तुळात एकतर कार्तिक आर्यन किंवा साऊथच्या सुपरस्टारला या सीक्वेलमध्ये घेणार असं म्हटलं जात आहे… (Akshay Kumar Movies)

दरम्यान, राऊडी राठौर हा २०१२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विक्रमारकुडू’ या तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. दमदार, विनोदी संवाद आणि अक्षय कुमारच्या जोशपूर्ण अभिनयामुळे ‘राऊडी राठौर’ने २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता… तसेच, प्रभू देवा दिग्दर्शित पहिल्या भागातील धडाकेबाज अॅक्शन, जबरदस्त संवाद आणि मनोरंजक कथेमुळे तो चित्रपट हिंदी सिनेमाच्या ‘मास एंटरटेनमेंट’ श्रेणीत अव्वल ठरला होता. आता या सिक्वेलकडून चाहत्यांना आणखी भव्य अॅक्शन सिक्वेन्सेस, नवीन कथा आणि दमदार स्टारकास्टची अपेक्षा आहे. संजय लीला भन्साळी स्वतःच्या दर्जेदार निर्मितीसाठी ओळखले जातात, त्यामुळे ‘राउडी राठौर २’मध्ये दृश्यात्मक भव्यता आणि सिनेमॅटिक लुकचा अनुभव अधिक मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. (Bollywood News)
================================
================================
दरम्यान, अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी चित्रपट ‘वेलकम टू द जंगल’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट ‘वेलकम’ (२००७) आणि ‘वेलकम बॅक’ (२०१५)नंतर ‘वेलकम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग आहे. पहिला ‘वेलकम’ चित्रपट कल्ट कॉमेडी म्हणून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून गेला होता. ‘वेलकम ३’ची रिलीज डेट अद्याप घोषित झालेली नसली तरी अक्षयच्या चाहत्यांना त्याच्या या नव्या अवताराची प्रतीक्षा आहे. याशिवाय, ‘हेरा फेरी ३’, ‘हैवान’, ‘भूत बंगला’ असे बरेच नवे चित्रपट अक्षयचे लवकरच येणार आहेत… दुसरीकडे, ‘राउडी राठौर २’मध्ये कोणता नवा अभिनेता दिसणार आणि हा सिक्वेल किती धमाल उडवतो, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना थोडी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (Bollywood Gossips)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi