
Kesari Chapter 2 : “चित्रपट पाहिल्यानंतर ब्रिटीश स्वत:हूनच माफी”, अक्षयने व्यक्त केला विश्वास
देशभक्तीपर चित्रपट बनवण्याची सुरुवात ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार (Manoj Kumar) यांनी केली होती. आणि त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवत आजपर्यंत अनेक कलाकारांनी देशभक्तीपर चित्रपट आणले. पण अक्षय कुमारने आत्तापर्यंत सादर केलेले चित्रपट आणि त्यातील त्याची भूमिका विशेष नक्कीच ठरली. लवकरच ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटातून Akshay Kumar वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून जालियनवाला बाग हत्याकांडावर चित्रपटाचं संपूर्ण कथानक आधारित आहे. चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत ‘केसरी चॅप्टर २’ (Kesari Chapter 2) पाहून ब्रिटीशांच्या तोंडून नकळत माफी मागितली जाईल असा विश्वास अक्षयने व्यक्त केला. (Entertainment news)

अक्षय (Akshay Kumar) यावेळी म्हणाला की,ब्रिटिशांनी ‘केसरी चॅप्टर २’ हा चित्रपट पाहिल्यावर त्यांना १०६ वर्षांपूर्वी घडलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या भीषणतेची जाणीव होईल आणि त्यांच्या तोंडून नकळतच माफीसह सगळ्या गोष्टी बाहेर येतील. दरम्यान, मार्चमध्ये ब्रिटनमधील हुजूर पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन यांनी ब्रिटिश सरकारने जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणी भारतीय जनतेची औपचारिक माफी मागावी, अशी मागणी तेथील संसदेत करण्यात आली होती. त्याच अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, ब्रिटिशांनी माफी मागावी, अशी मागणी मी करणार नाही. पण किमान त्यांनी हा चित्रपट पाहावा आणि त्यांना त्यांच्याकडून घडलेल्या चुकीची जाणीव व्हावी, अशी भावना अक्षयने व्यक्त केली. (Kesari Chapter 2)

२०१९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ चित्रपटात २१ शीख सैनिकांच्या धैर्याची आणि बलिदानाची गोष्ट दाखविण्यात आली होती. आता ‘केसरी चॅप्टर २’ (Kesari Chapter 2) चित्रपटात जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित अनेक गोष्टी मांडण्यात आल्या असून हा चित्रपट १८ एप्रिल २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. करण सिंग त्यागी दिग्दर्शित ‘केसरी चॅप्टर २’ चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar), अनन्या पांडे (Ananaya pandey), आर. माधवन (R. Madhvan) यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. (Bollywood patriotic movies)
===============================
हे देखील वाचा: Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
===============================
चित्रपटाचे दिग्दर्शन करण त्यागी म्हणाले की,”माझे वडील अमृतसरचे आहेत. माझ्या आजोबांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा थरार जवळून पाहिलेला आहे. त्यामुळे या हत्याकांडासंबंधी विविध गोष्टी आजोबांनी वडिलांना सांगितल्या होत्या. वडिलांकडून त्या मी ऐकल्याने मला लहानपणापासूनच या घटनेच्या भीषणतेची जाणीव होती. त्यामुळे ‘केसरी चॅप्टर २’ या चित्रपटात भूमिका साकारणे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण होते”.