Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

राम सेतु… भारतीयांच्या शक्ती, शौर्याची गाथा!

 राम सेतु… भारतीयांच्या शक्ती, शौर्याची गाथा!
मनोरंजन ए ख़ास मिक्स मसाला

राम सेतु… भारतीयांच्या शक्ती, शौर्याची गाथा!

by सई बने 23/03/2021

अक्षय कुमारचा महत्वाकांक्षी चित्रपट राम सेतुचा मुहूर्त नुकताच अयोध्या येथे झाला. अक्षय या चित्रपटात पुरातत्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारत असून भारताचे सांस्कृतिक आणि ऐतिहासीक वैभव रास सेतुच्या माध्यमातून दाखवण्यात येणार आहे. खिलाडीकुमार म्हणून ओळखला जाणारा अक्षय कुमार दरवर्षी किमान चार चित्रपट करतो. गेल्यावर्षी कोरोनाचा कहर असला तरी अक्षयचा लक्ष्मी चित्रपट प्रदर्शित झाला. याशिवाय अक्षयनं आगामी चित्रपटाचीही जोरदार तयारी केली. त्यामध्ये यशराज बॅनरखाली येणारा पृथ्वीराज हा प्रमुख चित्रपट आहे. सर्वात चर्चा झाली ती राम सेतु या चित्रपटाची. अक्षयनं महिन्यापूर्वी या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केल्यावर त्याच्या लूकचीही चर्चा झाली. लांब केस असलेला अक्षयकुमारचा लूक वेगळा भासला. त्याबरोबरच त्याच्या चाहत्यांमध्ये राम सेतुच्या कथेबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. 

राम सेतु (Ram Setu) चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शर्मा आहेत. राम सेतुचे क्रिएटीव्ह दिग्दर्शक म्हणून डॉ. चंद्रप्रकाश द्विवेदी काम बघणार आहेत. डॉ. द्विवेदी हेच अक्षयच्या आगामी पृथ्वीराज चित्रपटाचे निर्माते आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर या चित्रपटाचे अर्धेअधिक शुटींग मुंबईत होणार आहे. मात्र देशातील काही खास ठिकाणीही राम सेतुचे चित्रिकरण होणार आहे. त्यात अयोध्येचाही समावेश असेल. यातून श्री राम हे आपल्या संस्कृतीचा प्रमुख भाग असल्याचे दाखवण्यात येणार आहे. चित्रपटात जॅकलीन फर्नांडिस, नुसरत भरुचा या दोघीही अभिनेत्री महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. मात्र अद्यापही त्यांचा लूक जाहीर न झाल्यानं त्यांच्या भूमिकेबाबतही उत्सुकता आहे. 

Ram Setu: Akshay Kumar unveils new film poster, to 'keep alive the ideals  of Ram in the consciousness of Indians' | Hindustan Times
Ram Setu: Akshay Kumar

या चित्रपटाचा मुहूर्त अयोध्येला श्री रामाच्या आशिर्वादानं झाला. यावेळी चित्रपटाची सर्व टीम उपस्थित होती. स्वतः अक्षय राम सेतुबाबत खूप उत्साहीत आहे या चित्रपटाची कथा भारतीयांची शक्ती, शौर्य सांगणारी आहे. अक्षयच्या म्हणण्यानुसार राम सेतु चित्रपटात जुन्या आणि नव्या पिढीचा समन्वय साधण्यात आला आहे. भारताची संस्कृती किती भव्य आहे, हे नव्या पिढीला राम सेतुच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करण्यात असल्याचे अक्षय कुमारने सांगितले. अक्षयचा लक्ष्मी चित्रपट ओटीटी माध्यमावर प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र या चित्रपटाला अपेक्षित असे यश आले नाही. (Akshay Kumars upcoming movie Ram Setu)

अक्षयच्या (Akshay Kumar) लूकवर त्याच्या चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती.  त्यामुळे अक्षय राम सेतुच्या लूकबाबत अधिक काळजी घेत आहे.  राम सेतु चित्रपट भारताबरोबर अन्य देशातही प्रदर्शित करण्यात येणार आहे. 2022 च्या दिवाळीमध्ये राम सेतु प्रदर्शित करण्यात येणार आहे. त्याआधी बेलबॉटम, सूर्यवंशी,  बच्चन पांडे, अतरंगी रे,  पृथ्वीराज हे अक्षयचे चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहेत. एकूण 2020 ची कमतरता अक्षय या 2021 मध्ये भरुन काढणार हे नक्की.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.