
Akshay Kumar च्या ताफ्यातील गाडीचा अपघात; मर्सिडीजच्या धडकेत रिक्षाचा झाला चुराडा
बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या सिक्युरिटी व्हॅनचा २० जानेवारी २०२६च्या मध्यरात्री मुंबईत भीषण अपघात झाला. सोशल मिडियावर या भयावह अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला असून सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. सोमवारी रात्री जुहू परिसरात घडलेल्या भीषण रस्ते अपघाताने एकच खळबळ उडाली होती. महत्वाचं म्हणजे अपघाताबद्दल माहिती मिळतात विश्वास नांगरे पाटील घटनास्थळी तातडीने आले होते. अक्षय कुमारच्या ताफ्यामागे भरधाव मर्सिडीज कार येत तिने एका ऑटो रिक्षाचा चक्काचूर केला होता.

ही घटना रात्री ९च्या सुमारास घडली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय कुमार आपल्या कारमधून घरी जात असताना त्याच्या मागे सुरक्षेसाठी एस्कॉर्ट SUV चालली होती. या SUV च्या अगदी मागे एक तरुण आपली ऑटो रिक्षा चालवत होता. याच दरम्यान मागून वेगाने आलेल्या मर्सिडीज कारने ऑटोला जोरदार धडक दिली. ही धडक इचकी जोरदार होती की ऑटो रिक्षा अक्षरशः चिरडली गेली आणि ती अक्षय कुमारच्या एस्कॉर्ट SUV च्या मागील भागात घुसली. प्रत्यक्षदर्शींनी असं देखील म्हटलं की, मर्सिडीज चालकाने धडकेनंतरही ब्रेक न दाबता वाहन पुढेच रेटत ठेवले, त्यामुळे ऑटो SUV च्या खाली अडकत गेला आणि SUV चा मागचा भाग हवेत उचलला गेला. (Akshay Kumar Car Accident in Mumbai)
================================
हे देखील वाचा : Akshay Kumar : बॉलिवूडच्या खिलाडीने रिजेक्ट केलेले चित्रपट आहेत तरी कोणते?
================================
दरम्यान, या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी SUV खाली अडकलेली ऑटो बाहेर काढली. या वेळी ऑटो चालक बासित खान गंभीर जखमी अवस्थेत सापडला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अद्याप या अपघाताबद्दल अक्षय कुमारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही आहे. तसेच, पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. (Bollywood)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi