Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने केला बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम…

 ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने केला बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम…
Albatya Galbatya Natak World Record
नाट्यकला मिक्स मसाला

‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने केला बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम…

by Team KalakrutiMedia 17/08/2024

लहान मुलांसाठी काही विशेष नाटकं रंगभूमीवर आली आणि या नाटकांनी लहानांसोबत मोठ्यांचीही मने जिंकली. ‘अलबत्या गलबत्या’ हे नाटकही त्यापैकीच एक. रंगभूमीवर धुमाकूळ घालत बच्चे कंपनीला घाबरवणारी आणि प्रसंगी हसवणारी ‘चिंची चेटकीण’ गुरुवारी १५ ऑगस्टला श्री शिवाजी मंदिर नाट्यगृहात तळ ठोकून होती. या चेटकिणीला भेटण्यासाठी छोट्यांसह मोठ्यांनाही तुडुंब गर्दी केली. रत्नाकर मतकरी लिखित  तुफान लोकप्रियता मिळवणाऱ्या ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाने सलग ६ प्रयोग करत मराठी बालरंगभूमीच्या इतिहासात अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमाचे साक्षीदार होण्याची संधी अनेक  नाट्यरसिकांनी आवर्जून घेतली.(Albatya Galbatya Natak World Record)

Albatya Galbatya Natak World Record
Albatya Galbatya Natak World Record

नाटक पाहण्याच्या उत्सुकतेमुळे रसिकांनी सकाळी सात वाजताच्या प्रयोगालाही नाट्यगृह ‘हाउसफुल्ल’ केले. काही वेळातच बाल्कनीही गर्दीने भरली. या नाटकाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यामुळे कलाकारांचा उत्साह द्विगुणित झाला. ‘अलबत्या गलबत्या’ नाटक पाहण्यासाठी नाट्य रसिकांची गुरुवारी श्री शिवाजी मंदिर नाट्यगृह यथे झुंबड उडाली. या  नाटकाचे सलग प्रयोग प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरले. विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी आवर्जून उपस्थित होते. 

Albatya Galbatya Natak World Record
Albatya Galbatya Natak World Record

निर्माते राहुल भंडारे म्हणाले की, ‘आजवर या नाटकाला नाट्यप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला, अपार प्रेम केलं. या नाटकाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. विश्वविक्रमी प्रयोगाला रसिकांनी दिलेली दाद या नाटकाच्या  लोकप्रियतेची प्रचिती देणारी आहे.  या विक्रमी प्रयोगासाठी  कलाकारांनी  आणि  पडद्यामागील  तंत्रज्ञानी खूप  मेहनत घेतली. नाटयरिसकांच्या प्रतिसादाने या कलाकारांच्या  मेहनतीचे चीज  झाले असल्याची भावना  राहुल यांनी  बोलून दाखविली.(Albatya Galbatya Natak World Record)

=============================

हे देखील वाचा: भरत जाधव यांचा ट्रिपल धमाका; एकाच दिवशी सादर करणार ‘अस्तित्व’,’मोरूची मावशी’ आणि ‘पुन्हा सही रे सही’चे प्रयोग

=============================

”शाळा सुटता, पुस्तक मिटता, करुया आपण गमत्या जमत्या..अलबत्या गलबत्या….. अलबत्या गलबत्या….अलबत्या गलबत्या… अलबत्या.”असं म्हणत चिंची चेटकिणीची धमाल प्रेक्षकांना हसवत हसवत थरार, उत्सुकता आणि विनोदाची तिहेरी मेजवानी देते. चेटकीण झालेले निलेश गोपनारायण यांच्याबरोबरच सनीभूषण मुणगेकर, श्रद्धा हांडे आदि दहा कलाकारांची फौज आपल्या अफलातून उत्साहाने प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करते.  या नाटकाचे दिग्दर्शन चिन्मय मांडलेकर यांनी केले आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Albatya Galbatya Natak Albatya Galbatya Natak World Record Celebrity chinmay mandalekar marathi drama Entertainment Marathi Natak rahul khandare vaibhav mangale
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.