‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आलिया भट्ट झाली लेखिका; जाणून घ्या अभिनेत्रीने कोणासाठी लिहीले पहिले पुस्तक
सिनेसृष्टीत आपला अभिनय आणि सौंदर्य सिद्ध केल्यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट आता कथाविश्वावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने लहान मुलांसाठी आपले पहिले चित्र पुस्तक प्रकाशित केले आहे. आलिया म्हणाली की, ती अनेक पुस्तकांवर काम करत आहे. रविवारी आलियाने मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड अॅड-ए-मम्मा अंतर्गत मुलांच्या चित्रांच्या पुस्तकांच्या मालिकेतील पहिले पुस्तक ‘एड फाइंड्स अ होम’‘ लाँच केले. तुम्हाला माहीत नसेल तर गंगूबाई काठियावाडी, ब्रह्मास्त्र आणि हॉलिवूडचित्रपट हार्ट ऑफ स्टोन सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या आलिया भट्टचे स्वत:चे प्रॉडक्शन हाऊस आहे, ज्यामध्ये अॅमेझॉन प्राईम व्हिडिओच्या पोचरची निर्मिती करण्यात आली होती.(Alia Bhatt turns Author)
आलियाने इन्स्टाग्रामवर तिच्या पुस्तकासोबतचा फोटो शेअर करत तिच्या नव्या भूमिकेबद्दल आनंद व्यक्त केला. या फोटोत आलिया पुस्तकासोबत पोज देत हसताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले की, ‘एक नवीन साहस सुरू होत आहे, ‘एड फाइंड्स अ होम’ ही एड-ए-मम्माच्या जगातील पुस्तकांच्या नव्या मालिकेची सुरुवात आहे.’ आलिया पुढे असं ही लिहीते की, “माझं बालपण कथा आणि कथाकारांनी भरलेलं होतं आणि एके दिवशी मी स्वप्नात पाहिलं की माझ्या आतल्या मुलाला बाहेर आणून मुलांसाठी पुस्तकात टाकावं, मी माझ्या सहकारी कथाकारांची खरंच आभारी आहे. ज्यांनी आपल्या तेजस्वी कल्पना, इनपुट आणि कल्पनाशक्तीने आमचे पहिले पुस्तक जिवंत करण्यास मदत केली. या प्रवासासाठी शुभेच्छा.’’एड फाइंड्स अ होम’ हे आलियाच्या मुलांच्या कपड्यांच्या ब्रँड अॅड-ए-मम्मापासून प्रेरित मालिकेतील पहिले पुस्तक आहे. तन्वी भट या बालपुस्तक चित्रकाराने या पुस्तकासाठी चित्रे तयार केली आहेत.
याआधी आलियाने आपल्या आवडत्या कथाकार आणि आजोबांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले आणि त्यांच्या जयंतीनिमित्त तिच्या बालपणातील काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, ‘माझे आवडते कथाकार, हॅप्पी बर्थडे आजोबा, तुम्ही आणि तुमच्या कथा आमच्या हृदयात कायम राहतील.”(Alia Bhatt turns Author)
=============================
=============================
अभिनेत्री आलियाचे ‘अॅड फाइंड्स अ होम‘ हे पुस्तक मुलांच्या पुस्तकांची मालिका आहे. येणाऱ्या पिढीत निसर्गप्रेम निर्माण व्हावे, हा या पुस्तकाचा उद्देश आहे. रविवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड ड्राइव्ह येथे आयोजित स्टोरीव्हर्स या बालसाहित्य महोत्सवात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आलिया भट्ट आता 19 महिन्यांच्या मुलीची आई आहे. तर ती पती रणवीर सिंगसोबत आपल्या मुलीसोबत अनेकदा स्पॉट झाली आहे. याशिवाय ती राहासोबतचे क्यूट फोटोही सोशल मीडियावर शेअर ही करत असते.