
Alia Bhatt ने कान्सच्या रेड कार्पेटवर दिलेली ‘ती’ फोटो पोज आहे खास!
कान्स फिल्म फेस्टिवलच्या (Cannes Film Festival) रेड कार्पेटवर एकदा तरी जाण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असतेच. हि इच्छा २०२५ मध्ये अनेक भारतीय कलाकारांची पुर्ण झाली. यात आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचाही समावेश आहे. कान्सच्या रेड कार्पेटवरील आलिया भट्ट हिचा लूक सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यासोबतच तिने दिलेली एक ठराविक फोटो पोज लोकांना फारच आवडली आहे. पण तुम्हाला माहित आहे का तिच्या या व्हायरल फोटोमागे एक सत्य दडलेलं आहे… काय आहे? जाणून घेऊयात…(Bollywood news)

अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) ७८ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival 2025) ग्लॅमरस अंदाजात पदार्पण केले. कान्समधील तिच्या लूकचे चाहत्यांकडून विशेष कौतुक झाले. रेड कार्पेटवर ज्यावेळी आलिया फोटोसाठी पोज देत होती, त्यावेळी तिच्या गळ्यातील नेकलेस तुटला. मात्र, आलियाने प्रसंगावधान साधत तुटलेल्या नेकलेससोबत ग्लॅमरसपणे फोटो पोज दिल्या..गळ्यातील तो तुटलेला नेकलेस तसाच एका हाताने धरुन तिने सुंदर पोज दिली, महत्वाचं म्हणजे या तिच्या फोटोमध्ये नेकलेस तुटल्यामुळे तिने ही पोज दिली असं कुठेच जाणवत नाही आहे. आणि सध्या सोशल मिडियावर हाच तिचा फोटो विशेष व्हायरल झाला आहे. कौतुकाची बाब म्हणजे कुठेही आलियाने तिच्या चेहऱ्यावर गोंधळाचे हावभाव आणू दिले नाही आणि उपस्थित लोकांची शाबासकी मिळवली.(Alia bhatt at cannes film festival 2025)
================================
हे देखील वाचा: Prajakta Mali : “तिने कशालाच हद्दपार…”, प्राजक्तानं केलं आलिया भट्टचं कौतुक
=================================
आलिया भटट् हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्समधील ‘अल्फा‘ (Alpha) चित्रपटात झळकणार आहे. यापूर्वी देखील ‘राजी’ या स्पाय चित्रपटात ती झळकली होती. तर, ‘अल्फा’ मध्ये तिच्यासोबत ‘मुंज्या’ (Munjya) चित्रपट फेम शर्वरी वाघ (Sharvari Wagh) दिसणार आहे. यशराज फिल्स्मच्या Male Spy Universe मध्ये पहिल्यांदाच Female Spy characters दाखवले जाणार आहेत. याशिवाय, आलिया ‘सडक २’ मध्ये देखील झळकणार आहे.(Alia Bhatt movies)