
Alia Bhatt-Ranbir Kapoor यांनी नव्या घरात केला गृहप्रवेश!
बॉलिवूडचं स्टार कपल आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांनी अखेर त्यांच्या नव्या घरी गृहप्रवेश केला… खरं तर बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नव्या घराची जोरदार चर्चा सुरु होती… काही दिवसांपूर्वी आलिया-रणबीरच्या नव्या घराचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते… मात्र, मीडियावर नाराजी व्यक्त करत आलियाने खडेबोल सुनावले होते… आणि आता अधिकृतरित्या आलियाने त्यांच्या नव्या आलिशान घराचे फोटो शेअर केले आहेत… (Entertainment News)
आलिया आणि रणबीर यांच्या नव्या घराचं नाव आहे कृष्णा राज… सोशल मिडियावर त्यांनी गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे… कपूर कुटुंबाच्या व ऋषी कपूर यांच्या आठवणी आणि आशिर्वादाने प्रत्येक घरातील कोपरा भरला आहे हे नक्की दिसून येतं… आलियाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये एका फोटोत ऋषी कपूर यांच्या फोटोसमोर रणबीर नतमस्तक झाल्याचं दिसतं.. तर, आणखी एका एका फोटोत आलिया आणि सासू नीतू कपूर यांचा खास बॉन्ड पाहायला मिळत आहे. (Bollywood)

दरम्यान, आलिया आणि रणबीर यांनी ज्या जमिनीवर हा बंगला उभा केला आहे त्याची मालकी राज कपूर आणि कृष्णा राज कपूर (Krishna Raj Kapoor) यांची होती. १९८० मध्ये हा बंगला ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या नावे करण्यात आला होता. आता रणबीर आणि आलिया यांनी त्याच ठिकाणी त्यांचं नवं घर उभं केलं आहे…

आलिया भटट् हिच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झालं तर ‘जिगरा’ (Jigara) या चित्रपटात ती लीड अभिनेत्री म्हणून दिसली होती… आणि आता लवकरच ती ‘अल्फा’ (Alpha) या यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिवर्सचा भाग होणार आहे… तसेच, संजय लीला भन्साळींच्या ‘लव्ह एण्ड वॉर’ (Love and War) या चित्रपटात ती विकी कौशल आणि रणबीर कपूरसोबत दिसणार आहे… शिवाय, ‘ब्रम्हास्त्र २’ देखील लवकरच येणार आहे… (Alia Bhatt Movies)
================================
================================
तर, रणबीर कपूर याच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच नितेश तिवारींच्या ‘रामायण’ (Ramayan) चित्रपटात दिसणार आहे… याव्यतिरिक्त Animal Park चित्रपटातही तो झळकणार आहे… तसेच, तो नेटफ्लिक्सच्या ‘डायनिंग विथ द कपूर्स’ या डॉक्युमेंट्रीमध्येही दिसला होता.. (Ranbir Kapoor Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi