Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Alka Kubal : “….तर ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटात मी ‘या’ भूमिकेत दिसले असते!”
सोशिक सून हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यांसमोर एकच नाव येतं ते म्हणजे अलका कुबल यांचं. ७०-८०च्या दशकापासून मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या अलका कुबल (Alka Kubal) यांनी ४० वर्षांच्या त्यांच्या सिनेकारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यापैकी एक महत्वाचा चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ (Maherchi Sadi). या चित्रपटामुळे अलका कुबल यांचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचलं. पण तुम्हाला माहित आहे का अलका यांना चक्क संजय लीला भन्साळी यांनी एका चित्रपटासाठी ऑफर दिली होती. काय होता किस्सा वाचा..(Marathi actress)

अलका कुबल सध्या वजनदार या त्यांच्या नाटकामुळे विशेष चर्चेत आहेत. या नाटकाचे प्रमोळन करताना एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अलका कुबल यांनी संजय लीला भन्साळी यांनी ‘बाजीराव मस्तानी’ (Bajirao Mastani) चित्रपटाची ऑफर दिल्याचं त्यांनी सांगितलं. अलका म्हणाल्या की, “माझी नकारात्मक भूमिका साकारण्याची खूप इच्छा होती. पण मला तशा भूमिका आल्या नाहीत. संजय लीला भन्साळींनी माझा बाजीराव मस्तानी तील एका भूमिकेसाठी विचार केला होता. त्यांनी मला भेटायला बोलवलं होतं. मी जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा ते मला पाहून म्हणाले, ‘तुम्हारा चेहरा तो बहुत सोबर है.’ माझ्या सोज्वळ दिसण्यामुळे त्यांनी मला चित्रपटात घेतलं नाही. म्हणजे तुमच्या गोड दिसण्यामुळेही तुमचं नुकसान होऊ शकतं हे त्यावेळी माझ्या लक्षात आलं.” (Entertainment tadaka)

दरम्यान, संजय लीला भन्साळी(Sanjay Leela Bhansali) यांच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात अलका कुबल बाजीराव यांच्या आईची म्हणजे रणवीर सिंगने साकारलेल्या बाजीराव यांच्या आईची भूमिका ऑफर झाली होती. कालांतराने चित्रपटात ही भूमिका तन्वी अझ्मी यांनी केली होती. अलका पुढे म्हणाल्या, ” पण बाजीराव मस्तानी चित्रपटाच्या निमित्ताने मी त्यांना भेटले याचाही मला आनंद आहे. आम्ही तासभर गप्पाही मारल्या. त्यांना भेटून खूप छान वाटलं. ती माझ्यासाठी अतिशय गोड आठवण आहे.” (Bollywood news)
==============================
हे देखील वाचा: Mukkam Post Devach Ghar: ५ भारतीय भाषांमध्ये डब केलेला पहिला मराठी चित्रपट
===============================
अलका कुबल यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीत विविधांगी भूमिका साकारल्या पण सोशिक सुनेच्या भूमिकांचा विशेष ठपका त्यांच्यावर लागला. अलका कुबल यांनी अभिनयाची सुरुवात मराठी नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतून केली होती. १९८१ साली आलेल्या ‘चक्रा’ या हिंदी चित्रपटातून त्यांनी अभिनयाची सुरुवात केली. आणि मराठीत १९८४ साली आलेल्या ‘लेक चालली सासरला’ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केलं. त्यानंतर ‘बाळाचे बाप ब्रम्हचारी’, ‘माहेरची साडी’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘कमाल माझ्या बायकोची’,’देवकी’, ‘नशीबवान’, ‘आंधळा साक्षीदार’, ‘काल रात्री १२ वाजता’, ‘डॉक्टर डॉक्टर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली. (Alka Kubal Movies)