Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Neena Kulkarni यांना नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहिर

Mahesh Kothare : मराठी चित्रपटसृष्टीतील टॅक्नॉलॉजीचा बादशाह!

Anushka Sharma ५०० कोटी क्लबमध्ये चित्रपट देऊनही आता बॉलिवूडपासून आहे

Prasad Oak यांना यंदाचा ‘निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५’ घोषीत!

Ahilyadevi Holkar Marathi Biopic: रुपेरी पडद्यावर येणार अहिल्यादेवींचा जीवनप्रवास; ‘हिंदू हृदय

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि

GAADI NUMBER 1760 Teaser: रहस्य आणि हास्याची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘गाडी

Ashok Saraf : ‘आपली माणसं’ ते ‘एक डाव भुताचा’! मामांचे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि अँथनीची धमाकेदार गोष्ट येतेय भेटीला!  

 ‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि अँथनीची धमाकेदार गोष्ट येतेय भेटीला!  
मिक्स मसाला

‘All Is Well’ सिनेमात दिसणार धमाल त्रिकुट; अमर, अकबर आणि अँथनीची धमाकेदार गोष्ट येतेय भेटीला!  

by Team KalakrutiMedia 05/06/2025

All Is Well:  मराठी चित्रपटसृष्टीत हास्य, भावनिक गुंतवणूक आणि नात्यांचे बारकावे यांची मेजवानी अनेकदा पाहायला मिळते. अशाच एका निखळ मनोरंजनाच्या प्रवासासाठी सज्ज झाला आहे आगामी मराठी सिनेमा ‘ऑल इज वेल’. विनोदी वळण असलेला पण मनाला भिडणारा हा सिनेमा २७ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. “तीन तिघाडा काम बिघाडा” ही म्हण आपण अनेकदा ऐकतो, पण यावेळी मात्र ती तीन मित्रांची भन्नाट गोष्ट सांगण्यासाठी नकारार्थी नसून खळखळून हसवणारी ठरणार आहे.आणि या मध्ये  अमर, अकबर आणि अँथनी या तिघांची अफलातून मैत्री आणि त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रवास पहायला मिळणार आहे. (All Is Well Marathi Movie)

All Is Well Marathi Movie

प्रियदर्शन जाधव, अभिनय बेर्डे आणि रोहित हळदीकर हे तगडे कलाकार पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करत असून त्यांच्यातील केमिस्ट्री प्रेक्षकांना नक्कीच भावून जाईल. ‘ऑल इज वेल’ या चित्रपटात या तिघांची भूमिका ही फक्त मनोरंजनापुरती मर्यादित नसून, ती आपल्याला मैत्रीच्या खऱ्याखुऱ्या अर्थाकडे घेऊन जाणारी ठरणार आहे. चित्रपटाची कथा मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या तीन मित्रांभोवती फिरते. सुरुवातीला सगळं काही सुरळीत चाललेलं असताना, त्यांच्या आयुष्यात येते एक अनपेक्षित घटना…आणि इथून सुरू होतो एक हसवणारा, विचार करायला लावणारा आणि थेट काळजाला भिडणारा प्रवास! या सिनेमाचं दिग्दर्शन योगेश जाधव यांनी केलं असून लेखन आणि संवादाची माळ प्रियदर्शन जाधव यांनीच गुंफली आहे. वाणीश्री फिल्म प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली तयार झालेला हा सिनेमा निर्माते अमोद मुचंडीकर आणि वाणी हालप्पनवर यांनी साकारला आहे.

All Is Well Marathi Movie

यात फक्त तिघांचं त्रिकूटच नाही, तर सोबत सयाजी शिंदे, अभिजीत चव्हाण, नक्षत्रा मेढेकर, सायली फाटक, माधव वझे, अजय जाधव, अमायरा गोस्वामी, दिशा काटकर यांसारखे कसलेले कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन चिनार-महेश आणि अर्जुन जन्या यांनी केलं असून गाणी स्वरबद्ध केली आहेत रोहित राऊत आणि अपेक्षा दांडेकर यांनी. याशिवाय, छायांकन, संकलन, वेशभूषा आणि साहसदृश्ये अशा तांत्रिक बाबतीतही एक उत्तम टीम या चित्रपटासाठी सज्ज आहे. (All Is Well Marathi Movie)

================================

हे देखील वाचा: ‘एक… दो… तीन’ ते मोहिनी पर्यंतचा प्रवास: Madhuri Dixit च्या स्टारडमचा खास किस्सा!

================================

या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तो केवळ हसवण्यासाठी नाही, तर खऱ्या अर्थाने नात्यांची, विशेषतः मैत्रीची गुंतागुंत दाखवतो. ‘ऑल इज वेल’ म्हणताना या तिघांची धमाल मुंबईच्या गजबजाटात कशी उलगडते, हे सिनेमागृहातच अनुभवायला मिळणार आहे.तेव्हा २७ जून ही तारीख लक्षात ठेवा आणि तयार व्हा या धमाल तिघांच्या भन्नाट मैत्रीचा रंगीबेरंगी प्रवास अनुभवण्यासाठी!

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: abhijit chavan abhinay benrde all is well marathi movie Entertainment Marathi Movie marathi movie 2025 priydarshn jadhav rohit haldankar sayaji shinde
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.