‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
ऑल राउंडर तापसी
एक सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तापसी पन्नू या अभिनेत्रीनं तिच्या दमदार अभिनयानं हिंदीलाच नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड मध्येही आपली छाप उमटवली आहे. 1 ऑगस्ट रोजी या अभिनेत्रीचा वाढदिवस… त्यानिमित्त तिचा हा अल्प परिचय…
इंजिनिअर अभिनेत्री…
एक सॉफ्टवेअर…इन्फोसिसमधील नोकरी…हे सर्व सोडून एक मुलगी लहानपणापासून तिला खुणवत असलेल्या क्षेत्राकडे वळली…तिथे एक-एक पायरी चढत आता टॉपमध्ये विराजमान झाली. ही मुलगी म्हणजे तापसी पन्नू…दिल्लीच्या शिख कुटुंबात जन्म झालेली तापसी लहानपणापासून अभ्यासात प्रचंड हुशार…तिला अभिनयाची आवड होती. पण या क्षेत्रात कुठलीही ओळख नाही, म्हणून तापसीनं एक पाऊल मागे घेतलं. पण हिच तापसी आपल्या पायावर उभी राहिल्यावर फिल्मी दुनियेत आली आणि स्थिरावलीही…
निर्मलसिंग आणि दिलमोहन सिंग हे तापसीचे आई वडील. वडीलांचा स्वतंत्र व्यवसाय. तापसी त्यांची मोठी मुलगी. अभ्यासात हुशार असलेल्या तापसीला अभिनयची गोडी शाळेपासून होती. पण ती शाळेच्या गॅदरींग पुरती मर्यादीत राहीली. गुरु तेजबहादूर इन्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून तापसीनं इंजिनिअरींग केलं. कॉलेजमध्ये पॉकेटमनीसाठी तापसी मॉडेलिंग करत होती. यामुळे अनेकवेळा तिला कॉलेजला दांड्याही माराव्या लागायच्या. त्यामुळेच ती शिक्षकांच्या बॅडलिस्टवर असायची. पण अभ्यासात हुशार असलेल्या तापसीनं फोनचा काही अॅप डेव्हलप केला. अर्थात तिला पदवी तर मिळालीच पण कॅम्पस इंन्टरव्हू मध्ये इन्फोसिस सारख्या कंपनीत निवड झाली. नोकरी करतांनाच तापसीनं पुन्हा मॉडेलिंग सुरु केलं. व्ही चॅनलच्या टॅलेंट शो तिची निवड झाली. मग नोकरीला रामराम करुन तापसी पूर्णवेळ मॉडेल म्हणून काम करु लागली. तिला फेमिना मिस इंडीया बेस्ट फेस म्हणूनही निवडण्यात आलं. अनेक मान्यवर ब्रॅन्डच्या जाहीरातींमध्ये ती दिसू लागली.
जाहीराती आणि मॉडेलिंग यापुढे जाऊन चित्रपटात काम करण्याची संधी तापसी शोधत होती. तिला पहिला ब्रेक मिळाला तो तेलगूमध्ये… राघवेंद्र राव यांच्या झुम्मांडी नांदा या चित्रपटापासून तापसी मोठ्या पडद्यावर आली. हा चित्रपट फारसा चालला नाही. त्यानंतर तमिळमध्ये तिचा दुसरा चित्रपट आला अधुकलम. यात धनुष तिचा सहकलाकार होता. हा चित्रपट ब्लॉकबास्टर ठरला. या चित्रपटाला सहा राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. या यशानंतर तापसीनं तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नड या भाषांमधील चित्रपटात काम केलं. 2013 मध्ये तापसी डेव्हीड धवन यांच्या चष्मेबहादूर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आली. त्यानंतर बेबी या चित्रपटात आयबी एजंट असलेल्या शबाना खानच्या भूमिकेत दिसली. ही भूमिका छोटी होती. पण त्यात तापसीचा अभिनय एवढा जबरदस्त होता की, या शबाना खानच्या भूमिकेचा प्रिक्वल काढण्यात आला. असा प्रकार फार क्वचित हिंदीमध्ये करण्यात आला. हा चित्रपट म्हणजे नाम शबाना….यासाठी तापसीनं सहा महिने मार्शल आर्टचे ट्रेनिंग घेतले. तिची ही मेहनत कामी आली. नाम शबानाही बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. या सर्वांत तापसीची ओळख अँग अँग्री लेडी अशी झाली. कोर्टरुम ड्रामा असलेल्या पिंकमध्ये तापसी अमिताभ बच्चनसह दिसली. अत्यंत संवेदनशील विषय असलेल्या पिंकमधील मिनल अरोडा या भूमिकेमधून पुन्हा एकदा तापसीच्या अभिनयाची ताकद समजली. मि. परफेक्ट, ध्रुवा, शॅडो, अरंभम, कांचन 2, बदला, गेम ओव्हर, रनिंग शादी, द गाजी अटैक, जुडवा 2, सूरमा, मुल्क, मिशन मंगल, सांड की ऑंख अशा दर्जेदार चित्रपटातून तापसी मोठ्या पडद्यावर आली. प्रत्येकामध्ये तापसीचा रंग वेगळा होता.
मुल्कमध्ये ती तडफदार वकील झाली तर मिशन मंगलमध्ये वैज्ञानिक झाली. सुजय घोषच्या बदला मध्ये तर तिनं कमाल केली. अमिताभ बच्चनसोबत हा तिचा दुसरा चित्रपट. बच्चन सरांसमोर ही कालपरवा आलेली तापसी तेवढ्याच ताकदीनं उभी राहीली. तुषार हिरानंदानीच्या सांड की ऑंखमध्ये तापसीनं प्रकाशी तोमर यांची भूमिका केली. बॉक्सऑफीसवर हा चित्रपट अपेक्षीत यश मिळवू शकला नाही…पण तापसीच्या भूमिकेचं कौतुक मात्र झालं. आता अलिकडे आलेल्या थप्पडमधल्या तिच्या भूमिकेचंही असंच कौतुक झालं.
तापसीचे असेच जरा वेगळ्या विषयावरील चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत. त्यात हसीन दिलरुबा, क्रिकेटर मिताली राजची बायोपिक शाबास मिठू, लूप लपेटा या चित्रपटांचा समावेश आहे.
सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या तापसीनं तिच्या समाधानासाठी आपला ट्रॅक बदलला आणि ती चित्रपट सृष्टीत दाखल झाली. हा तिचा ट्रॅकबदल चित्रपटसृष्टीसाठीही चांगलाच ठरला. त्यानिमित्ताने एक होतकरु अभिनेत्री या प्रवाहात आली….