Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
Allu Arjun अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घोषणाबाजी करत केली तोडफोड
साऊथ सुपरस्टार (South Superstar) अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) पुष्पा २ (Pushpa 2) सिनेमाने चित्रपटगृहांमध्ये नुसता धुमाकूळ घातला आहे. १००० कोटींची (1000 Crore) बक्कळ कमाई करत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. मात्र दुसरीकडे त्याच्या या आनंदाला गालबोट लागले आहे. ४ डिसेंबर (4th December) रोजी हैद्राबादमध्ये (Hyderabad) संपन्न झालेल्या पुष्पा २ च्या प्रीमियर (Premier) प्रसंगी झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आणि एक मुलगा जखमी झाला असून, उपचारासाठी तो रुग्णालयात दाखल आहे.
मात्र अशातच अजून एक मोठी बातमी (News) येत आहे, अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला करण्यात आला आहे आणि घरात घुसून तोडफोड करण्यात आली आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या हैदराबाद येथील घराच्या बाहेर उस्मानिया विद्यापीठाच्या (Osmania University) सदस्यांनी आंदोलन केले. त्यावेळी काही आंदोलक हे अल्लू अर्जुनच्या घरात घुसले आणि त्याच्या घराची तोडफोड केली.
तसेच अल्लू अर्जुनच्या घरावर टॉमेटो फेकले. ज्या महिलेचा मृत्यू झाला आहे त्या महिलेच्या कुटुंबाला अल्लू अर्जुनने एक कोटी रुपये द्यावेत, शिवाय शक्य आहे तेवढी सगळी मदत करावी अशा दोन मागण्या या सगळ्या सदस्यांनी केल्या. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) (JAC) सदस्यांनी रविवारी सायंकाळी अभिनेता अल्लू अर्जुनच्या घरी निदर्शने केली.
आंदोलकांनी (Protesters) अल्लू अर्जुनच्या घराबाहेर घोषणाबाजी करत आपल्या मागण्यांसाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी (Police) तत्काळ कारवाई करत जेएसीच्या नेत्यांना ताब्यात घेतलं. याप्रकरणी ८ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेवेळी अल्लू अर्जुन त्याच्या घरी उपस्थित नव्हता.
दरम्यान अभिनेता अल्लू अर्जूनने या संपूर्ण प्रकारानंतर पहिल्यांदाच समोर येत पत्रकार परिषद (Press Conference) घेतली आणि त्याची बाजू मांडली होती. त्याने हा एक केवळ अपघात (Accident) होता. त्याला कोणीही जबाबदार नाही असे सांगत पीडित कुटुंबाबद्दल सहानुभूती देखील व्यक्त केली.
सोबतच त्याने त्याचावर होत असलेले सर्वच आरोप फेटाळून लावत सांगितले की, तो कोणावरही आरोप करु इच्छीत नाही, परंतू सध्या त्याची बदनामी करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले. सोबतच त्याच्याबद्दल चुकीची माहिती पसरवली जात असल्याचे देखील म्हटले आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबद्दल अल्लू अर्जुनने यावेळी माफी देखील मागितली.
तेलंगणाच्या विधान सभेत अल्लू अर्जूनवर तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री रेवंत रेड्डी (CM Revanth Reddy) आणि एमआयएमचे (MIM) आमदार अकबरुद्दीन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी टीका केली होती. त्यानंतर अल्लू अर्जून याने मीडियासमोर त्याची बाजू मांडली. त्यानंतर काही तासांनी लगेचच त्याच्या घरावर हल्ला करण्यात आला.
हे देखील वाचा : ‘त्या’ घटनेनंतर अल्लू अर्जुन मौन सोडत त्याच्यावर होणाऱ्या आरोपांचे केले खंडन
तत्पूर्वी ‘पुष्पा 2’ (Pushpa 2) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले आहेत. चित्रपट तिसऱ्या आठवड्यात दाखल झाला आहे. त्याच्या कमाईत घट झाली असली तरी, हे सर्व असूनही केवळ १६ दिवसांत देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई करणारा हा सर्वात जलद चित्रपट ठरला आहे.
‘पुष्पा 2’ ने रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर धमाका केला आहे. अल्लू अर्जुनच्या चित्रपटाने १७५ कोटींची (175 Crore) ग्रँड ओपनिंग (Grand Opening) मिळवली होती. प्रदर्शनाच्या दोन आठ्वड्यानंतरही सिनेमा अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल (Houseful) जात आहे. त्यामुळे हा सिनेमा अजूनही भरपूर कमाई करेल असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहे.