Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

 All Is Well Marathi Movie: तीन मित्रांची धमाल गोष्ट ‘ऑल

Gaadi Number 1760: प्रेमभावनेला स्वरबद्ध करणारे प्रथमेश-प्रियदर्शिनीचे ‘झननन झाला’ गाणं

Dostana : ‘मेरे दोस्त किस्सा ये क्या हो गया…’हे गाणे

Aamir Khan याच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं कलेक्शन झालंय तरी

‘रंगभूमीवर फुललेली प्रेमकहाणी, कशी झालेली Reema Lagoo आणि Vivek Lagoo

Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ye Re Ye Re Paisa 3: सलमान खान, महेश मांजरेकर यांच्या

Kajol : “‘तिथे शूटिंग करताना मला नेहमीच अस्वस्थ वाटत होतं”

Sachin Pilgoankar- रंजिताचा ‘आंखियों के झरोखो से’आठवतो का?

Housefull 5 : मल्टिस्टार कास्ट असूनही अक्षय कुमारच्या चित्रपटाचं कलेक्शन

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Almost Comedy Marathi Stand Up Show: हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’!

 Almost Comedy Marathi Stand Up Show: हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’!
Almost Comedy Marathi Stand Up Show
टीव्ही वाले मिक्स मसाला

Almost Comedy Marathi Stand Up Show: हास्याचा धमाका घेऊन येत आहे ‘ऑलमोस्ट कॉमेडी’!

by Team KalakrutiMedia 16/01/2025

Almost Comedy Marathi Stand Up Show: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आपल्या दर्जेदार व मनोरंजक आशयासाठी प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी ते नेहमीच नवनवीन प्रयोग करत असतात. ‘प्रेमाची गोष्ट’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘कॉफ़ी आणि बरंच काही’ ‘बॅाईज’ यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात आणखी भर घालण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट एक धमाकेदार संकल्पना घेऊन येत आहे. प्रेक्षकांना हास्याच्या दुनियेत घेऊन जाण्यासाठी एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सज्ज झाले आहे.(Almost Comedy Marathi Stand Up Show)

Almost Comedy Marathi Stand Up Show
Almost Comedy Marathi Stand Up Show

एव्हरेस्ट हास्य मराठी प्रस्तुत ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा एक नवीन मराठी स्टँडअप कॉमेडी शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा धमाकेदार कॉमेडी शो एव्हरेस्ट हास्य मराठी या यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळेल. ज्यामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील काही उत्कृष्ट लेखक प्रथमच स्टेजवर स्टँडअप कॉमेडी सादर करणार आहेत. चेतन डांगे, अमोल पाटील, चिन्मय कुलकर्णी, अक्षय जोशी आणि ऋषिकांत राऊत या लेखकांनी पूर्वी अनेक मनोरंजक कथा लिहून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आता मात्र हे लेखक प्रत्यक्ष स्टेजवर येऊन आपल्या विनोदी किस्से सांगून प्रेक्षकांना हसवणार आहेत. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ चे सूत्रसंचालन करून या हास्ययात्रेला चारचांद लावणार आहे. तिच्या अनोख्या अंदाजाने व सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत येईल.

==============================

हे देखील वाचा: अमृता देशमुखची ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये एन्ट्री !

==============================

प्रेक्षकांना हसवण्याची जबाबदारी घेऊन हे लेखक आता कॅमेरासमोर येणार आहेत आणि त्यांच्या लेखणीप्रमाणेच त्यांची स्टेजवरील उपस्थितीदेखील प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा शो फक्त एक कॉमेडी शो नसून लेखकांच्या कलागुणांची एक मजेशीर सफर असणार आहे. एव्हरेस्ट एंटरटेनमेंटची ही नवीन संकल्पना प्रेक्षकांसाठी नव वर्षातील खास भेट ठरेल. ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ प्रत्येक एपिसोड प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करेल हे नक्की!(Almost Comedy Marathi Stand Up Show)

===========================

हे देखील वाचा: अभिनेत्री प्राजक्ता चव्हाण ची महाराष्ट्राची हास्यजत्रा च्या  मंचावर दणक्यात एन्ट्री

===========================

एव्हरेस्ट एंटरटेमेंटचे संस्थापक संजय छाब्रिया म्हणतात, “स्टँडअप कॉमेडी हा मनोरंजनाचा एक वेगळा आणि प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होणारा फॉरमॅट आहे. म्हणूनच ‘ऑलमोस्ट कॉमेडी’ हा नवा प्रयोग, नवी संकल्पना आम्ही घेऊन आलो आहे. लेखकांना स्टँडअप कॉमेडीच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीने प्रेक्षकांसमोर आणण्याचा हा एक रोमांचक प्रयोग आहे, आणि आम्हाला खात्री आहे की हा शो प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Almost Comedy Marathi Stand Up Show comedya show Everest media hasyajatra marathi Comedy show marathi Show Priyadarshani indalkar
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.