‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
आर डी बर्मन यांच्या पहिल्या लग्नाची भन्नाट लव्हस्टोरी !
संगीतकार राहुल देव बर्मन यांना आपल्यातून जाऊन तीस वर्षाहून अधिक कालखंड लोटला असला तरी यांच्या गाण्याची जादू आज देखील कायम आहे. परंतु राहुल देव बर्मन यांच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल लोकांना फारशी माहिती नाही. त्यांनी पार्श्वगायिका आशा भोसले यांच्यासोबत १९८० मध्ये लग्न केले होते पण त्यापूर्वीही त्यांचे लग्न झाले होते ! हे तुम्हाला माहिती आहे का ? त्यांची पहिल्या लग्नाची ही लव्हस्टोरी देखील खूप भन्नाट होती. (R. D. Burman)
आर डी बर्मन आपल्या काही मित्रांसोबत दार्जिलिंगला १९६५ साली फिरायला गेले होते. आर डी चे तोवर छोटे नवाब, भूत बंगला हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. भूत बंगला मध्ये त्यांनी अभिनय देखील केला होता.या सिनेमाची गाणी चांगलीच लोकप्रिय झाली होती.त्या मुळे आर डी ला ओळखणारे बरेच होते. त्याचवेळी दार्जिलिंगला काही मुंबईच्या मुली देखील पिकनिकला आल्या होत्या. त्या मुली आर डी ला तिथे पाहून हरखून गेल्या. त्यातील एक टप्पोरे डोळे असणे मुलगी धीट पणे आर डी यांच्याकडे आली आणि तिने त्यांचा ऑटोग्राफ मागितला. राहुल देव बर्मन तथा आर डी बर्मन यांनी नंतर सांगितले,” ती मुलगी मला पाहता क्षणी आवडली.” त्या मुलीचे नाव होते रिटा पटेल. आर डी यांनी आपला मुंबईचा फोन नंबर तिला दिला. नंतर ते दार्जिलिंग हून परत मुंबई ला आले आणि आपल्या कामात व्यस्त झाले.
एक दिवस आर डी यांना अचानक त्या मुलीचा फोन घरच्या फोन नंबर वर आला आणि तिने लाडिक स्वरात विचारले,” उद्या संध्याकाळी तुम्ही माझ्यासोबत रिगल सिनेमा मध्ये ‘गोल्ड फिंगर’ हा सिनेमा पाहायला येऊ शकाल का ?” आपल्याला आवडलेली मुलगी स्वतःहून सिनेमा पाहण्यासाठी बोलवते आहे म्हटल्यावर आरडी नाही कसे म्हणणार ? ते मनोमन खूष झाले. त्यांच्या दृष्टीने ही त्यांची पहिलीच डेट होती. मस्तपैकी आवरून आर डी रिगल थिएटर मध्ये पोहोचले. जेम्स बॉण्ड सिरीज च्या या सिनेमाचा नायक सिन कॉनरी होता. त्यांनी तो सिनेमा आधी पाहिला होता पण आपली लाडकी मैत्रीण बोलवते म्हणल्यावर कोण संधी सोडणार ? तिथे रिटा त्यांची वाट पाहत होती. लगेच दोघे हातात हात घालून आत गेले. चित्रपट सुरू झाला आणि दहा-पंधरा मिनिटात ही मुलगी म्हणाली,” मी आत्ता दोन मिनिटात आलेच !” असे म्हणून ती बाहेर पडली. पाच सात मिनिटे झाली रिटा परत न आल्याने आर डी बर्मन यांची चुळबुळ वाढली कारण जिच्यासाठी ते सिनेमाला आले होते तीच आता बाहेर पडली होती. आर डी देखील तिच्या पाठोपाठ बाहेर पडले. पार्किंग मध्ये आले असताना त्यांच्या असे लक्षात आले की मुलगी काळ्या रंगाच्या अँमबॅसॅडर गाडीतून निघून गेली आहे. त्यांनी लगेच एका टॅक्सीतून तिचा पाठलाग केला परंतु तिला गाठणे शक्य झाले नाही. आर डी बर्मन रात्रभर तळमळत राहिले. पण त्यांच्या मित्रांनी सांगितले,” टेन्शन घेऊ नकोस. आपण तिला शोधून काढू.” (R. D. Burman)
आर डी बर्मनला तिने सांगितले होते की ती चर्चगेटच्या निर्मला निकेतन होम सायन्स कॉलेजमध्ये ती शिकते आहे. त्याच्या मित्रांनी हेरगिरी सुरू केली. त्याकाळी मुंबईमध्ये फियाट च्या तुलनेत अँमबॅसॅडर गाड्या तशा कमी होत्या. आर डी च्या मित्रांनी डोळ्यात तेल घालून कॉलेजच्या परिसरात हेरगिरी करून तिला शोधू लागले. आणि एक दिवस त्यांना ती मुलगी दिसली! त्यांनी तिचा पाठलाग केला. रिटा पटेल मरीन ड्राईव्ह जवळच्या चौपाटी इथे एका सहा मजली इमारतीत रहात होती. बिल्डींग चे नाव होते ‘कॉस्मोपॉलीटिन’. (R. D. Burman)
==========
हे देखील वाचा : सत्यजित रे ‘हा’ चित्रपट काढताना कन्फ्युज होते ?
==========
आता तिच्या घराचा पत्ता माहित झाला होता. त्यावरून आरडी ने टेलिफोन डिरेक्टरी हातात घेतली. त्या इमारतीतील सर्व फोन नंबर शोधले तिथे तीन पटेल सापडले. आरडीने त्यांना फोन लावायला सुरुवात केली. पहिला नंबर रॉंग नंबर. दुसरा रॉंग नंबर बंद . तिसरा फोन स्वतः रिटा पटेलने च उचलला. आरडीने तिला विचारले,” तू मला त्या दिवशी का धोका दिलास? तुझ्यासाठी मी सिनेमाला आलो. आणि तूच पळून गेलीस!” त्यावर रिटा पटेल खळखळून हसत म्हणाली,” मी माझ्या मैत्रिणी सोबत बेट लावली होती की मी आर डीला पिक्चरला घेऊन येते. माझ्या काही मैत्रिणी ऑल रेडी थिएटरमध्ये येऊन बसल्या होत्या. त्यांना मी आर डी बर्मन ला घेऊन थिएटरमध्ये आल्याचे दिसले मी बेट जिंकले होते. माझे काम झाले होते. म्हणून तिथून निघाले. यावर आरडी म्हणाले,” पण कुणाच्या भावनांशी असे खेळणे बरोबर आहे का?” आपण उद्या पुन्हा भेटूया.” दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा रेस्टॉरंट मध्ये ते भेटले. हळूहळू त्यांच्या भेटी वाढत गेल्या आणि प्रेम देखील. नंतर दोघांनी १९६६ मध्ये लग्न केले पण हे लग्न फारसे टिकले नाही. १९७१ साली या दोघांचा घटस्फोट झाला !