‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
‘कटीपतंग’ च्या या गाण्याच्या शूटचा भन्नाट किस्सा !
‘आराधना’ या चित्रपटाच्या बंपर यशानंतर शक्ती सामंत यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची निर्मिती सुरू केली. हा चित्रपट पुन्हा त्यांनी राजेश खन्ना –शर्मिला टागोर यांनाच घेऊन काढायचे ठरवले. चित्रपटाचे नाव होते ‘कटी पतंग’ (Kati Patang). परंतु त्या वेळेला शर्मिला टागोर प्रेग्नेंट असल्यामुळे तिने या चित्रपटात काम करायला असमर्थाचा दर्शवली आणि तिथे आशा पारेख यांची वर्णी लागली. त्या काळात राजेश खन्ना प्रचंड मोठा सुपरस्टार बनला होता. सलग १७ गोल्डन जुबली सिनेमे देण्याचे रेकॉर्ड या काळात त्याच्या हातून घडले होते.
या १७ चित्रपटांपैकीच एक होता ‘कटी पतंग’(Kati Patang). या चित्रपटाचे कथानक गुलशन नंदा यांच्या एका कादंबरीवर होते. अर्थात गुलशन नंदा यांनी देखील एका आंग्ल साहित्यावरून हे कथानक घेतले होते.(कोर्न वुलरिच यांच्या ‘I married a dead man’) या चित्रपटातील गाणी आनंद बक्षी यांनी लिहिलेली होती. तर संगीत राहुल देव बर्मन यांचे होते. या सिनेमातील हरेक गाणं प्रचंड गाजलं. किशोर कुमार यांनी गायलेलं ये शाम मस्तानी ,ये जो मोहब्बत है, प्यार दिवाना होता है ही गाणी प्रचंड गाजली. या चित्रपटातील आशा पारेख यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना त्यावर्षीचे फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले. या चित्रपटात लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ना कोई उमंग आहे ना कोई तरंग है…’ हे देखील खूप गाजले होते. तसेच या चित्रपटातील होळी गीत आज देखील मशहूर आहे.
या सिनेमात आणखी एक गीत होते जे मुकेश यांनी गायलेले होते. मुकेश यांनी गायलेले या चित्रपटातील हे एकमेव गाणे होते. गाण्याचे बोल होते ‘जिस गली मे तेरा घर ना हो बालमा’ या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग नैनीताल येथे झाले. या गाण्याची चित्रीकरण देखील नैनीताल येथील सुप्रसिद्ध झीलवर होणार होते. शूटिंगची डेट ठरली. या गाण्याची चित्रीकरण राजेश खन्ना आणि आशा पारेख एका नावेत बसून जात असतात अशा सिच्युएशनला करायचे होते. नैनिताल हे पूर्वीपासूनच पर्यटकांसाठी अतिशय आवडतं डेस्टिनेशन. (Kati Patang)
जेव्हा त्यांना कळालं की इथल्या तलावात आज राजेश खन्ना शूटिंग करणार आहे तेव्हा सर्व पर्यटक बोटीमध्ये बसून राजेश खन्नाच्या जवळ येऊन डिस्टर्ब करू लागले! शक्ती सामंत यांना शॉट अजिबात घेता येत नव्हता. कारण प्रत्येक वेळेला फ्रेम मध्ये पर्यटकांच्या बोटी येत होत्या. हल्ला गुल्ला गोंधळ प्रचंड होत होता. त्यामुळे सारखा सारखा व्यत्यय येत होता. शक्ती सामंत यांनी पोलिसांची मदत घेतली पण त्यांचा ही नाईलाज होता. ही पब्लिक प्लेस असल्यामुळे थोडा वेळ ते बाजूला गेले. पण पुन्हा तेच. सारखा व्यत्यय येत होता. शक्ती सामंत हे चित्रपटाचे जसे दिग्दर्शक होते तसे निर्माते देखील होते. फार काळ शूटिंग रेंगाळणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यांनी त्या दिवशी पॅकअप करून ते हॉटेलला निघून गेले आणि या गाण्याची चित्रीकरण कसे करायचे या विवंचनेत पडले. आता काय करायचं ?(Kati Patang)
============
हे देखील वाचा : राज कपूरने सोडवला दिलीप कुमारचा कौटुंबिक प्रश्न
============
त्यांनी एक सोल्युशन काढले. एक भन्नाट जुगाड त्यांनी केला त्यांनी. नैनीताल मधील तलावाच्या आजूबाजूला असलेल्या सर्व बोटी दुसऱ्या दिवशी भाड्याने घेतल्या आणि एका बाजूला लॉकअप मध्ये टाकून दिल्या. आता संपूर्ण तलावात एकच बोट होती ज्यात राजेश खन्ना आणि आशा पारेख होते. दुसऱ्या दिवशी पर्यटक तिथे आले पण त्यांना इच्छा असून देखील बोटिंग करता आले नाही कारण कुठलीही बोट त्या दिवशी उपलब्ध नव्हती. अशा प्रकारे राजेश खन्ना आणि आशा पारेख यांना घेऊन त्यांनी चित्रीकरण उरकून टाकले. शक्ती सामंत यांनी केलेला हा जुगाड चालून गेला आणि आपण हे सुंदर गाणे पाहू शकलो !