Shubhvivah मालिकेत चिन्मय उद्गीरकरची एंट्री; आकाशच्या जीवासाठी भूमी करणार संघर्ष

Ambat Shoukin Poster: मनोरंजनाचा डोस घेऊन येत आहे ‘आंबट शौकीन’; सिनेमाच भन्नाट पोस्टर प्रदर्शित !
Ambat Shoukin: हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून या भन्नाट विनोदी चित्रपटात निखिल वैरागर, अक्षय टंकसाळे (Akshay Tanksale) व किरण गायकवाड (Kiran Gaikwad) या तीन मित्रांची अतरंगी कहाणी पाहायला मिळणार आहे.(Ambat Shoukin Movie Poster)
=============================
हे देखील वाचा: PSI Arjun Trailer: राडा घालायचा येतोय ‘पी.एस.आय. अर्जुन; पहिल्यांदाच जेलमध्ये लाँच झाला मराठी चित्रपटाचा ट्रेलर…
=============================
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये पूजा सावंतही (Pooja Sawant) पाहायला मिळत असून या चित्रपटात तिची काय भूमिका असेल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. या चौघांसोबत या चित्रपटात प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Ambat Shoukin Movie Poster)

दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, ‘आंबट शौकीन’ ही मजेशीर गोष्ट आहे. सोशल मीडियाच्या जगात अडकलेल्या तीन मित्रांची गंमतीशीर सफर या सिनेमातून दाखवली आहे. हा चित्रपट हास्य, विनोदाने प्रेक्षकांचे मनोरंजन करेल. तसेच चित्रपटाला लाभलेल्या उत्तम कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.’’ (Ambat Shoukin Movie Poster)
===============================
हे देखील वाचा: BANJARA Movie Trailer: मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली, निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा दाखवणाऱ्या ‘बंजारा’ सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित…
===============================
चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून२०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.