
Ameeta चे ‘फिल्मी बारसे’ वाचकांचा कौल घेवून करण्यात आले.
एखाद्या हिरोईनचे नाव वाचकांना विचारून ठरवले जाऊ शकते का? हो नक्कीच. असा प्रकार एकदा झाला होता. एका नवोदित नायिकेचं काय फिल्मी नाव असावे यावर विचार मंथन चालू होते. निर्मात्याने सरळ भारतातील सर्व प्रमुख वृत्तपत्रांमध्ये, मासिकांमध्ये एक जाहिरात दिली आणि त्यात असे लिहिले की ‘आमच्या नवीन चित्रपटात एक नवी मुलगी नायिकेची भूमिका करत आहे या मुलीला एक फिल्मी नाव हवे आहे. तुम्ही ते नाव सुचवा. तुम्ही सुचवलेलं नाव जर सिलेक्ट झाले तर तुम्हाला पारितोषिक देऊ.’ अशा पद्धतीने संपूर्ण देशातून वाचकांचा कौल मागवण्यात आला व त्यातून एक नाव फायनल करण्यात आले आणि याच नावाने त्या हिरोईनीने आपली संपूर्ण कारकीर्द गाजवली. कोण होती ती हिरोईन आणि काय होते त्या हिरोईनचे नाव? खूप इंटरेस्टिंग असा हा किस्सा आहे. (Ameeta)

शम्मी कपूर (Shammi Kapoor) ला ज्या चित्रपटाने खऱ्या अर्थाने स्टार बनवले तो चित्रपट होता ‘तुमसा नही देखा’. १९५७ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची नायिका होती अमिता(Ameeta). याच हिरोईन बाबतचा हा किस्सा आहे तिचे खरे नाव होते कमर सुलताना (Qamar sultana). लहानपणापासून नाटकात काम करायची तिला आवड. १९५१ साली मधुबाला (Madhubala) आणि प्रेमनाथ (Premnath) यांचा एक चित्रपट आला होता ‘बादल’. या चित्रपटात मधुबालाने तलवारबाजी करून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यावेळी कमर सुलताना अवघ्या बारा वर्षाची होती. (जन्म ११ एप्रिल १९४०)

तिला मधुबालाची (Madhubala) भूमिका इतकी आवडली आणि तिने लाकडी तलवार आणून घेतली व दिवसभर ती घेवून तलवारबाजी करत असे. या तलवारबाजीने तिला वेडच लावले होते. या तिच्या तलवारबाजीने तिने शाळेतल्या शिक्षकांचे बोलणे देखील खाल्ले होते. तेव्हापासून तिने शाळेत लाकडी तलवार नेणे बंद केले. परंतु घरी आल्यानंतर पुन्हा तलवारबाजी करून ती संपूर्ण कॉलनीमध्ये एकच हंगामा करत असे. (Untold Stories)
एकदा निर्माते तिच्या घरासमोरून चालले होते. त्यावेळी त्यांना एक तलवारबाजी करणारी मुलगी दिसली. त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्यांनी गाडी थांबवली आणि तिच्या घरी ते गेले. तिच्या पालकांशी बोलले आणि त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. लेखराज यांनी सांगितले की “तुमच्या मुलीने खरं तर चित्रपटात काम करायला पाहिजे. तिच्यात ते सर्व गुण आहेत जे एका अभिनेत्रीकडे असणे गरजेचे आहे!” पालकांनीही हो नाही करत उत्तर दिले आणि ‘ठोकर’ या चित्रपटात तिला भूमिका मिळाली. या चित्रपटात तिचे फिल्मी नाव होते जय जयवंती. यानंतर तिला पुढचा चित्रपट मिळाला ‘चैतन्य महाप्रभू’ (Chaitanya Mahaprabhu). हा चित्रपट बैजू बावरा फेम विजय भट (Vijay Bhat) यांनी दिग्दर्शित केला होता.

यावेळी मात्र त्यांना हिचे नाव बदलणे गरजेचे आहे असे वाटले. तिचे नाव काय असावे याच्यावर भरपूर विचार मंथन झाले. मित्रांशी चर्चा झाल्या. कुटुंबीयांशी बोलणं झालं. अनेक कलावंतांशी बोलणं झालं. पण नाव काही फायनल होत नव्हतं. शेवटी त्यांनी संपूर्ण देशातील प्रमुख वृत्तपत्र आणि मासिकातनं एक जाहिरात दिली आणि ‘आमच्या नव्या चित्रपटातील हिरोईनचे नाव सुचवा तुमचे नाव जर आमच्याकडून फायनल झाले तर तुम्हाला पारितोषिक मिळेल’ अशा पद्धतीने जाहिरात दिली. (Bollywood Tadka)
संपूर्ण देशातून तिच्या नावाबाबतचा कौल घेण्यात आला. त्या काळात वाचकांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला आणि वाचकांकडून आलेल्या नावातून एक नाव फायनल केले गेले हे नाव होते ‘अमिता’ (Ameeta). अशा पद्धतीने तिचे फिल्मी बारसे दुसऱ्यांदा झाले आधी जय जयवंती आणि नंतर अमिता. सुरुवातीला तिचे करिअर थोडे लडखडतच सुरुवात झाली पण लवकरच तिने स्वतःला सिद्ध केले. तुमसा नही देखा, गूंज उठी शहनाई, देख कबीरा रोया, हम सब चोर है, राखी, मेरे मेहबूब, हसीना मान जायेगी…. हे तिचे चित्रपट आज देखील आठवले जातात.
========================
हे देखील वाचा: Kishore Kumar : कोणत्या गायिकेने किशोर कुमारला दिला होता अनमोल सल्ला?
========================
अमिता (Ameeta) या अभिनेत्रीची कारकीर्द तशी छोटीशीच. फार उल्लेखनीय अजिबात नाही. पण तिच्या फिल्मी नावाचा हा किस्सा मात्र इंटरेस्टिंग आहे. अमिताने नंतर अभिनेता कामरान यांच्यासोबत लग्न केले. (हा कामरान म्हणजे अभिनेता साजिद खानचा बाप. आई मात्र अमिता नाही!) साधारणतः साठच्या दशकाच्या अखेरी स तिने चित्रपट संन्यास घेतला. आज १० एप्रिल अभिनेत्री अमिता वयाची ८५ पूर्ण करत आहे.