Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar यांनी खोपकरांना दिलं प्रत्युत्तर

 “शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar यांनी खोपकरांना दिलं प्रत्युत्तर
मिक्स मसाला

“शिवरायांवर जर का आम्ही चित्रपट करत असू तर…”; Digpal Lanjekar यांनी खोपकरांना दिलं प्रत्युत्तर

by रसिका शिंदे-पॉल 20/01/2026

३० जानेवारी २०२६ रोजी मराठीतील दोन मराठी चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार आहेत. अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा साडे माडे तीन’ आणि दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ एकमेकांसमोर ठाकले असून यावरुन निर्माते अमेय खोपकर यांनी लांजेकरांवर आरोप केले आहेत. लांजेकरांना मुद्दामहून आपल्या चित्रपटाची रिलीज डेट बदलून आगाऊपणा केल्याचं म्हणत त्यांना बॅन करायला हवं असं खोपकरांनी म्हटलं आहे. आता यावर दिग्पाल यांनी आपली बाजू मांडली आहे. काय म्हणाले आहेत ते जाणून घेऊयात..

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत, दिग्पाल म्हणाले की, “हा संपूर्णपणे निर्मात्यांचा भाग आहे. अमेय खोपकर यांचा बहुदा काहीतरी गैरसमज झालेला असावा. आमचं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हाही मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की चित्रपटाचा निर्माता मी नाही. चित्रपटाचा दिग्दर्शक आणि लेखक मी आहे. अर्थातच दोन मोठे मराठी चित्रपट समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मी आहे. आमच्या ‘मुक्ताई’ चित्रपटाची रिलीज डेट मराठी चित्रपटांना न्याय मिळावा म्हणून सहा वेळा बदलण्यात आली होती. ‘सुभेदार’ चित्रपटही तीन वेळा पोस्टपोन्ड केला होता. त्यामुळे मराठी चित्रपटांच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. दोन निर्मात्यांनी मिळून ठरवलं तर कोणत्याही चांगल्या तारखेला हा चित्रपट प्रदर्शित व्हावा. पण, हा निर्मात्यांनी घ्यायचा निर्णय आहे. माझं काम हे फक्त चित्रपट बनवणं आणि तो त्यांच्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आहे”.

पुढे लांजेकर असं देखील म्हणाले की, “आम्ही फक्त छत्रपतींचे चित्रपट करतो. आम्ही जर मराठी भाषा टिकवण्यासाठी सिनेमे करतोय तर मराठी चित्रपट टिकवण्यासाठी का नाही प्रयत्न करणार? सगळ्यांनी योग्यरितीने चर्चा करून तारीख ठरवावी, असं माझं मत आहे. प्रत्येक निर्मात्याने त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने तारीख ठरवलेली असते. फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरू होत्यात. त्यामुळे चित्रपटाची तारीख बदलण्यात आली आहे. हा चित्रपट नव्या पिढीने बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे चित्रपटाची तारीख अलिकडे घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता, असं मला निर्मात्यांनी सांगितलं. याबाबत मी निर्मात्यांशी एका मर्यादेपर्यंतच चर्चा करू शकतो. त्यानंतर माझी व्यावसायिक मर्यादा मला सांगते की मी निर्मात्यांच्या मताचा आदर केला पाहिजे”, असंही ते पुढे म्हणाले.

================================

हे देखील वाचा : “काही निर्माते जास्त शेफारलेत…”; खोपकरांचा Digpal Lanjekar यांना धमकी वजा इशारा!

================================

दरम्यान, ‘पुन्हा साडे माडे तीन’ चित्रपटाचे निर्माते अमेय खोपकर यांनी दिग्पाल यांनी १६ फेब्रुवारीला रिलीज होणाऱ्या ‘रणपति शिवराय..’ची प्रदर्शनाची तारीख मुद्दाम बदलली असं म्हटलं होतं. ते म्हणाले होते की, “’पुन्हा साडे माडे तीन’ ची तारीख इतर मराठी चित्रपटांसाठी मी तीन आठवडे पुढे ढकलली. मात्र दिग्पाल लांजेकरने त्याच्या १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘रणपति शिवराय’ ची रिलीज डेट अचानक बदलत ३० जानेवारी केली. याबद्दल त्याने कुणालाही विचारलं किंवा सांगितलं नाही. मी त्याला फोन करत तुमच्या चित्रपटाची तारीख बदला असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याने माझा एकही कॉल उचललेला नाही. पण मी याचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट आहे म्हणून मी गप्प आहे. पण, काही निर्माते खरंच शेफारले आहेत. त्यांची मस्ती उतरवली पाहिजे. दिग्पाल लांजेकरनेही असाच आगाऊपणा केला आहे. निर्माता संघ आणि मंडळाला सांगावं लागेल की त्याला बॅन करावं”.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: ameya khopkar bollywood update Digpal Lanjekar Entertainment Marathi Movie marathi movies 2026 punha ekda saade maade 3 Ranpati Shivray Swari Agra Teaser
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.