Sachin Pilgoankar : ‘ही’ आहे ‘७० रुपये वारले’ संवादामागची गोष्ट

Amir Khan : बऱ्याच वर्षांनी जिनियीलाचा कमबॅक; ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित
गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपट इंडस्ट्रीत काम करणारे अनेक कलाकार अलीकडे पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसतात. त्यापैकीच एक जोडी म्हणजे आमिर खान (Amir Khan0 आणि जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच चित्रपटात दिसणार आहेत. सध्या चित्रपटसृष्टीपासून बऱ्यापैकी लांब असलेली जिनिलीया फार निवडक भूमिका करताना दिसते. आता लवकरच ती आमिरसोबत ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात एका महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. (Bollywood movies)

२००७ साली आमिर खानचा ‘तारे जमीन पर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तमम प्रतिसाद दिला होता. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला होता. आता ‘तारे जमीन पर’ या चित्रपटाचा सिक्वेल ‘सितारे जमीन पर’ येत असून त्याचे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. (Taare Zameen par)

‘सितारे जमीन पर’ च्या पोस्टरमधून आमिर खान बास्केटबॉलच्या शिक्षकाच्या भूमिकेत असणार असं दिसतंय. पहिल्या भागात तो आर्ट्सचा शिक्षक होता. दरम्यान, येत्या २० जून २०२५ रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. (Sitare Zameen Par) ‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिरसोबत जिनिलीया देशमुख, आरुष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भन्साळी, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर हे कलाकारदेखील असणार आहेत. (Bollywood tadaka)
======================================
हे देखील वाचा: Ameesha Patel वयाच्या ४९ वर्षीही का आहे सिंगल? अभिनेत्रीने स्वतः सांगितले कारण म्हणाली…
=======================================
या चित्रपटात त्याच्याबरोबर लोकप्रिय अभिनेत्री जिनिलीया देशमुखदेशमुखदेखील दिसणार आहे. २०२२ ला आलेल्या लाल सिंग चड्डा चित्रपटानंतर आमिर खान मोठ्या पडद्यावर परतला आहे. त्यामुळे ‘तारे जमीन पर’सारखाच ‘सितारे जमीन पर’ चित्रपटही लोकप्रिय होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Amir Khan movies)