दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Amir Khan आणि Sonali Bendre यांच्या ‘सरफरोश’ सिनेमाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त होणार खास स्क्रिनिंग
बॉलिवूड स्टार आमिर खान आणि सरफरोश सिनेमाची टीम चित्रपटाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईत या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करणार आहे. सरफरोश हा चित्रपट ३० एप्रिल १९९९ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. आता २५ व्या वर्धापनदिनानिमित्त या स्क्रिनिंगला आमीर खान, सोनाली बेंद्रे यांसारखे कलाकार उपस्थित राहणार आहेत. १० मे रोजी मुंबईतील पीव्हीआर जुहू येथे ही स्क्रिनिंगला होणार आहे. संगीत दिग्दर्शक ललित पंडित, मुकेश ऋषी, नसीरुद्दीन शाह, मकरद देशपांडे, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजेश जोशी, स्मिता जयकर, मनोज जोशी, उपासना सिंह, अखिलेंद्र मिश्रा आणि आकाश खुराना हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.(25 Years of Sarfarosh Movie)
असे म्हटले जात आहे की, कलाकार आणि क्रू मेंबर्स शूटिंगशी संबंधित त्यांच्या आठवणी आणि चित्रपटाशी संबंधित गोष्टी सामायिक करतील. टीमच्या एका निवेदनानुसार, प्रीमिअरसाठी तिकिटे बुक करण्याची संधी मिळणार असल्याने चाहत्यांना देखील स्क्रीनिंगला उपस्थित राहता येणार आहे. सरफरोशची कथा एका भारतीय पोलीस अधिकाऱ्याने सीमेपलीकडून होणारा दहशतवाद रोखण्याचा केलेला प्रयत्न आहे, ज्यामुळे देशभक्तीची भावना जागृत होते. भारतीय राजकीय व्यवस्था, पोलीस दल आणि दहशतवादाच्या जगाचे न सांगितलेले सत्य उलगडून दाखवणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक गोष्ट निर्माण केली. दिग्दर्शक जॉन मॅथ्यू मॅथॉन यांनी या चित्रपटात दहशतवादाचे वास्तव आणि पोलिस दल दररोज कसे हाताळते याचे चित्रण केले आहे.
सरफरोश प्रेक्षकांशी जोडण्यात यशस्वी झाला कारण त्यात केवळ मनोरंजन नाही तर त्या पलीकडे असलेल्या बर्याच गोष्टी उलघडवणयाचा प्रयत्न केला गेला. चित्रपट समीक्षकांकडून या चित्रपटाचे खूप कौतुक झाले आणि बॉक्स ऑफिसवर ही या सिनेमाने चांगलाच व्यवसाय केला.(25 Years of Sarfarosh Movie)
================================
हे देखील वाचा: अभिनेत्री Janhvi Kapoor शिखर पहारियासोबत तिरुपतीमध्ये लग्न बंधनात अडकणार?
=================================
अभिनेता आमीर खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर आमिर खान आगामी ‘सितारे जमीन पर’ या चित्रपटात दिसणार आहे, जो ‘तारे जमीन पर‘ या सिनेमाचा सिक्वेल मानला जात आहे. या चित्रपटात आमिरसोबत जेनेलिया डिसूझादेखील महत्त्वाच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे.