Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!

 Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!
कलाकृती तडका

Amir Khan : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट द आमिर खान!

by रसिका शिंदे-पॉल 14/03/2025

हिंदी चित्रपटसृष्टीत ३७ वर्षांपेक्षा अधिक काळ काम करणारा मिस्टर परफेकश्ननिस्ट आमिर खान (Amir Khan) आज (१४ मार्च) त्याचा ६० वा वाढदिवस साजरा करत आहे. बालकलाकार म्हणून सुरु झालेला आमिर खानचा प्रवास निर्मात्यापर्यंत येऊन ठेपला आहे. १९७३ साली ‘यादों की बारात’ या चित्रपटात आमिरने भूमिका साकारली होती. पण १९८८ साली प्रमुख अभिनेता म्हणून ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये अॅक्टर म्हणून एन्ट्री घेतली. आणि त्यानंतर एकामागून एक वेगळ्या धाटणीचे चित्रपट त्याने दिले. आज आमिर खानच्या वाढदिवसानिमित्त काही खास किस्से जाणून घेऊयात…(Bollywood movies)

खरं तर आमिर खान (Amir Khan) फार सुरुवातीपासूनच निवडक भूमिका साकारत होता. ‘राजा हिंदुस्थानी’, ‘मन’, ‘लगान’, ‘बाजी’, ‘दामिनी’, ‘अंदाज अपना अपना’, असे अनेक चित्रपट आमिरने दिले. शिवाय, जुही चावलासोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत ‘कयामत से कयामत तक’ हा सुपरहिट चित्रपट त्याने दिला. बरं तो पहिलाच चित्रपट इतका लोकांना आवडला की त्याला ३००-४०० चित्रपट लागोपाठ ऑफर करण्यात आल्याचं त्यानेच सांगितलं होतं. तुम्हाला माहित आहे का? जेव्हा आमिरचा चित्रपट फ्लॉप व्हायचा तेव्हा तो घरी येऊन ढसाढसा रडायचा. जावेद अख्तर यांच्याशी बोलताना त्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला.(Classic Bollywood films)

आमिर पुढे म्हणाला, “त्या काळात मी एकाच वेळी ९ ते १० चित्रपट साइन केले होते. पण दुर्दैवाने ज्या दिग्दर्शकांसोबत मला काम करण्याची इच्छा होती त्यांनी मला भूमिका दिली नाही. आणि जेव्हा मी चित्रपटांचे चित्रीकरण सुरू केले तेव्हा मला माझी चूक कळली. मी दिवसातून तीन शिफ्टमध्ये काम करत होतो आणि तरीही मला त्यात समाधान नव्हते. म्हणून मी घरी जाऊन रडायचो.” पुढे आमिर असं देखील म्हणाला की, “कारण मला खात्री होती की माझे पुढील सहा चित्रपटही फ्लॉप होतील. मी माझ्या डोळ्यांसमोर माझे करिअर उद्ध्वस्त होताना पाहत होतो.”(Bollywood update)

बरं, ९० किंवा २००० च्या काळात चित्रपटसृष्टीत तीन खान फेमस होते. सलमान खान, शाहरुख खान आणि आमिर खान. या तिघांचा एकत्र चित्रपट जरी आला नसला तरी सलमान आणि आमिरचा ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटाने एक बेन्चमार्क सेट केला होता. राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘अंदाज अपना अपना’ चित्रपटगृहामध्ये फ्लॉप ठरला होता. मात्र, ज्यावेळी तो चित्रपट टीव्हीवर प्रदर्शित झाला तेव्हा तो सुपरहिट झाला असून आजही या चित्रपटाची गणना क्लासिक कॉमेडी चित्रपटांमध्ये केली जाते. (Amir Khan movies)

======

हे देखील वाचा :Archana Joglekar : शूटिंगदरम्यान झाला बलात्काराचा प्रयत्न, हादरलेल्या अर्चना जोगळेकरांनी थेट इंडस्ट्रीच सोडली

======

‘अंदाज अपना अपना’ या चित्रपटाचा आणखी एक किस्सा आमिरने एका मुलाखतीत सांगितला होता. तो म्हणाला होता की, “ ‘अंदाज अपना अपना’च्या शुटींगसाठी मी एकटाच असा कलाकार होतो जो वेळेत सेटवर जात होता. आणि दुसरं एक म्हणजे त्यावेळी रवीना टंडन आणि करिश्मा कपूर यांच्यात भांडण सुरु होतं बहुतेक, त्यामुळे जेव्हा रवीना सेटवर यायची करिश्मा निघुन जायची आणि जेव्हा करिश्मा यायची रवीना निघून जायची. आणि मी हे सारं काही पाहात असताना चित्रपटाचं शुटींग कसं पुर्ण होईल इतकाच मी विचार करत होतो. मात्र, शुटींग पुर्ण झालं आणि rest is history”.

आमिर खान चित्रपटसृष्टीतसोबतच समाजकार्यातही सक्रिय आहे. महाराष्ट्रातील पाणी टंचाईच्या समस्येवर ‘पाणी फाऊंडेशन’ ही संस्था अविरत कार्य करत आहे. अमिताभ बच्चन यांच्याशी बोलताना त्याने या फाऊंडेशनसाठी खास मराठी भाषा बोलायला शिकल्याचं सांगितलं. तो म्हणाला की, “मराठी ही काही माझी मातृभाषा नाही, पण संस्थेचे काम करताना खेड्यापाड्यातील लोकांशी त्यांच्या भाषेत संवाद साधता यावा, त्यांच्याशी जवळीक साधता यावी म्हणून मराठी भाषा शिकण्याचा त्याने जाणीवपूर्वक प्रयत्न केला आहे”. (Bollywood masala)

आमिर खानच्या चित्रपटांबद्दल सांगायचं झाल्यास ‘अव्वल नंबर’, ‘दौलत की जंग’, ‘परंपरा’, ‘हम है राही प्यार के’, ‘दिल चाहता है’, ‘मंगल पांडे’, ‘पीके’, ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्याने उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत. लवकरच तो ‘सितारें जमिन पर’ आणि ‘लाहौर १९४७’ या चित्रपटात दिसणार आहे. (Amir Khan)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amir khan amir khan birthday amir khan movies Bollywood bollywood tadaka entertainemnt entertainment tadaka
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.