लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Amir Khan : दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं ‘चॅलेंज’, ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर रिलीज
बऱ्याच वर्षांनंतर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Amir Khan) लवकरच टसितारे जमीन परट (sitaare zameen par trailer) या चित्रपटातून पुन्हा एकदा हटके भूमिकेतून समोर येणार आहे. १८ वर्षांनंतर तारे जमीन पर चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच भेटीला येणार असून नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक नवीन, हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करण्यास सज्ज झाले आहेत. (Entertainment)

‘सितारे जमीन पर’ चित्रपटात आमिर खान यावेळी बास्केटबॉल कोच आहे. ट्रेलरमध्ये दिसतं की, आमिरला ड्रींक अँड ड्राईव्हच्या माध्यमातून कोर्टात शिक्षा होते. आमिर खानला दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवायला सांगितलं जातं. पुढे आमिरची या मुलांशी चांगली ओळख होते आणि दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवून त्यांचा बास्केटबॉल संघ बनवण्याचं चॅलेंज आमिर घेतो. आता यात यश कुणाला मिळतं आणि आव्हानांना तोंड संपूर्ण टीम कशी देते हे चित्रपटात पाहायला मिळणार आहे.(Bollywood news)
====================================
हे देखील वाचा: ‘वामा लढाई सन्मानाची’ चित्रपटातील Kailas Kher यांच्या आवाजातील टायटल साँग प्रदर्शित…
=====================================
दरम्यान, आमिर खान प्रोडक्शन्सची कलाकृती असणाऱ्या या चित्रपटाद्वारे १० नवोदित कलाकारांना लॉन्च करण्यात येणार आहे .अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, संवित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर. ‘सितारे जमीन पर’चं दिग्दर्शन आर.एस. प्रसन्ना यांनी केले आहे. विशे, म्हणजे बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा जिनिलिया देशमुख मोठ्या पडद्यावर हटके भूमिकेत झळकणार आहे. आणि हा चित्रपट२० जूनला रिलीज होणार आहे. (sitaare zameen par movie)
‘सितारे जमीन पर’ मध्ये आमिर खान आणि जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. संगीत दिग्दर्शन शंकर-एहसान-लॉय यांचे असून, गीतकार आहेत. अमिताभ भट्टाचार्य. पटकथा डिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. चित्रपटाचे निर्माते आहेत आमिर खान, अपर्णा पुरोहित आणि रवि भगचंदका आहेत.