Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

 Amirbai Karnataki  कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान
बात पुरानी बडी सुहानी

Amirbai Karnataki कर्नाटकी भगिनींची सुरीली दास्तान

by धनंजय कुलकर्णी 27/02/2026

अमीरबाई कर्नाटकी एक प्रतिभावान गायिका आणि अभिनेत्री होत्या, ज्या कन्नड (मातृभाषा) आणि गुजराती भाषांमध्ये पारंगत होत्या. अमिरबाई कर्नाटकी या ४० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि मानधन घेणाऱ्या गायिका-अभिनेत्री होत्या. त्यांना ‘कन्नड कोकिळा’ म्हणूनही ओळखले जाते.’महरे ते गामडे एक वार आवजो’ हे संगीतकार अविनाश व्यास यांच्यासोबत ‘राणाक देवी’ (१९४६) या चित्रपटातील त्यांचे एक प्रसिद्ध गुजराती गाणे आहे. त्यांनी लता मंगेशकर यांच्यासोबत ‘गोरे गोरे ओ बांके छोरे’ हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध युगल गीत गायले, जे ‘समाधी’ (१९४९) चित्रपटातील होते. १९३४ साली अमीरबाई ‘विष्णू भक्ती’ (दि. जी आर सेठी) या चित्रपटात पहिल्यांदा चमकल्या. सुरुवातीला, अमीरबाईंनी चित्रपटांमध्ये गाणी गायली, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. १९४३ मध्ये, बॉम्बे टॉकीजच्या ‘किस्मत’ (१९४३) चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यांना लोकप्रियता मिळाली.

‘किस्मत’ची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली आणि अमीरबाई प्रसिद्ध झाल्या. या यशामागे संगीतकार अनिल विश्वास यांचा हात होता. सुरुवातीला त्या एक गायन-तारका म्हणून ओळखल्या जात होत्या, परंतु कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्या पार्श्वगायिका बनल्या. १९४७ पर्यंत त्या त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. १९४७ नंतर, लता मंगेशकर एक उगवता तारा बनल्या, त्यामुळे अमीरबाई पुन्हा अभिनयाकडे वळल्या. त्यांच्या उत्तरार्धात, त्यांनी बहुतेक चरित्र भूमिका केल्या. अमीरबाईंनी वहाब पिक्चर्सच्या ‘शहनाज’ (१९४८) चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनही केले. त्याच वर्षी त्यांनी गुजराती आणि मारवाडी चित्रपटांसाठी हिंदी चित्रपटसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला. ‘फिल्म इंडिया’ या प्रसिद्ध चित्रपट मासिकाने आपल्या एका लेखात नमूद केले होते की, २० व्या शतकात जेव्हा इतर गायकांना एका गाण्यासाठी ५०० रुपये मिळत असत, तेव्हा अमीरबाईंना प्रत्येक रेकॉर्डिंगसाठी १००० रुपये मिळत असत. त्या केवळ शास्त्रीय संगीतच नाही, तर ठुमरी, दादरा आणि सुफी ढंगाची गाणी तितक्याच ताकदीने गात असत. कन्नड मातृभाषा असूनही त्यांनी हिंदी आणि उर्दू उच्चारांवर कमालीचे प्रभुत्व मिळवले होते.

अमीरबाईंचे वैवाहिक जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. त्यांचे पहिले लग्न चित्रपट अभिनेता हिमालयावाला (उर्फ अफझल कुरेशी) यांच्याशी झाले होते. ते चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध होते. लग्नानंतर त्यांचे पटले नाही. तो  अमीरबाईला वारंवार मारहाण करत असे आणि तिच्या कमाईचा मोठा भाग आपल्या वैयक्तिक मौजमजेसाठी खर्च करत असे. अभिनेत्री म्हणून काम करताना आणि स्टुडिओमध्ये गाणी गातानाही अमीरबाईला चेहऱ्यावर खोटे हसू आणावे लागत असे. प्रसिद्ध गुजराती लेखक भाई रंजन कुमार पांड्या यांनी अमीरबाईच्या वैवाहिक जीवनाचे सविस्तर वर्णन केले आहे. ते सांगतात की, न्यायाच्या अपेक्षेने अमीरबाईची मोठी बहीण अहिल्याबाई एके रात्री उशिरा प्रसिद्ध गुजराती वकील चेलशंकर व्यास यांच्याकडे गेली. तिने व्यासांना सांगितले की, हिमालयवालाने घटस्फोटाच्या बदल्यात मोठी रक्कम आणि अमीरबाईची गाडी घेतली होती. दुसऱ्याच दिवशी त्याने एका रेकॉर्डिंग स्टुडिओमधून तिचे दिवसाढवळ्या अपहरण केले होते. त्याने तिला एका खोलीत डांबून ठेवले होते आणि वारंवार मारहाण करत होता. पोलिसांनीही हिमालयवालाचीच बाजू घेतली होती. चेलशंकर व्यास यांनी हे सर्व आरोप लक्षात घेऊन तिला मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला सामाजिक दर्जा आणि कायदेशीर ज्ञानाचा वापर करून अखेरीस अमीरबाईला घटस्फोट मिळवून दिला.

१९४७ मध्ये जेव्हा भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान हे दोन देश निर्माण झाले, तेव्हा हिमालयवाला पाकिस्तानात गेला आणि एक अभिनेता म्हणून त्याने चांगली लोकप्रियता मिळवली. भारतात, अमीरबाईने ‘पारस’चे संपादक बद्री कांचवाला यांच्याशी दुसरे लग्न केले, भारतीय सिनेमा संगीताच्या क्षितिजावर लता मंगेशकर या तार्‍याचा उदय होण्यापूर्वी अनेक गायिकांनी आपल्या स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. पार्श्वगायनाचे तंत्र तितकेसे विकसित आणि लोकप्रिय न झाल्याने गाता येणार्‍या नट नट्यांची त्या काळात चलती होती. अमीरबाई कर्नाटकी यांचा  चाळीसच्या दशकात चांगलाच बोलबाला होता. बॉम्बे टॉकीजच्या ’किस्मत’ सिनेमातील त्यांच्या गाण्यांनी अफाट लोकप्रियता मिळवली. म.गांधींना प्रिय असलेलं ’वैष्णव जन तो तेणे कहिये’(नरसी भगत – १९४०) हे भजन गावून त्यांनी देशभर लोकप्रियता हासिल केली.

================================

हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?

================================

अमीरबाई यांनी गायलेल्या ’किस्मत’ चित्रपटातील ’दूर हटो दूर हटो ऐ दुनियावालो हिंदुस्तान हमारा हैं, अब तेरे सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया, घर घर में दिवाली हें मेरे घर में अंधेरा, धीरे धीरे आरे बादल धीरे धीरे आ मेरा बुलबुल सो रहा है’ या गाण्यांनी संपूर्ण हिंदुस्तानात एकच हलचल निर्माण केली.गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनाला या गीतातून एक मूक पाठींबा होता. १९४४ साली आलेल्या ’रतन’ ची बहुतांश गाणी जोहराबाई अम्बालीवाला यांनी गायलेली असली तरी श्यामकुमार सोबत गायलेलं ’ओ जाने वाले बालमवा लौटके आ लौटके आ’ या गाण्याने प्रचंड लोकप्रियता हासिल केली होती.सी रामचंद्र यांच्या ’शहनाई’ (१९४८) तील अमीरबाईच्या ’मारी कटारी मर जाना’ या गाण्याची मोहिनी रसिकांवार बराच काळ होती.फिल्मीस्तानच्या ’ समाधी’ सिनेमातील अण्णांनीच स्वरबध्द केलेल्या ’गोरे गोरे ओ बॉंके छोरे कभी मेरे गली आया करो’ या अमीरबाई – लताच्या गाण्याची जादू आजही कायम आहे.पण या गाण्यानंतर अमीरचा आवाज लता-आशाच्या झंझावातात मागे पडला.पुढे काही वर्षे त्या चरीत्र अभिनेत्रीच्या भूमिकात दिसत राहिल्या. पारस मासिकाचे संपादक बद्री काचवाला यांच्या त्यांचा निकाह झाला.त्यांनी काही गुजराती गाणी देखील गायली.मराठी ;भक्तीचा मळा(१९४८) या सिनेमात त्यांनी तीन मराठी गाणी गायली.१९६५ साली त्यांच निधन झालं.

================================

हे देखील वाचा : Rakesh Roshan: पित्याच्या गाण्याच्या चालीतून बनवले ‘हे’ सुपर हिट गीत!

================================

आपल्या मराठी रसिकांकरीता मात्र अमीरबाई पेक्षा तिची बहिण गोहरजान या विषयी विशेष कुतूहल आहे कारण बालगंधर्वांच्या आयुष्यात अखेरच्या टप्प्यात आलेल्या गोहरने त्यांच सारं आयुष्यच व्यापून टाकलं होतं. या दोघी बहिणींच्या कलाजीवानाबाबत फारसं कधी लिहिलं गेलं नाही. या दोघींच्या कला जीवनाचा  आढावा घेणारं एक पुस्तक कन्नड भाषेत आलं होतं. या पुस्तकात त्या काळातील (१९३०-५०) कन्नड रंगभूमी, भारतीय चित्रपट , संगीत , स्वातंत्र्य आंदोलनातील सांस्कृतिक चळवळीच अस्तित्व व महत्व तसेच वसाहतवाद विरोधी आंदोलनाची  कलेच्या माध्यमातून होणारी वाटचाल याचे सांगोपांग चित्रण यात आहे..कर्नाटक तर कलाकारांची खाण होती.पं. मल्लीकार्जुन मन्सूर , गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी…. अमीरबाईं कर्नाटकी यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील बिळगी येथे १९१२ साली झाला.तर गोहरजान च जन्म १९१४ सालचा.या बिळगी सिस्टर्सनी आधी कन्नड रंगभूमी गाजवली. बोलपटाच्या उदयानंतर तीसच्या दशकात त्यांनी मायानगरीत प्रवेश केला.

गोहरजान यांनी मुंबईत आल्यावर त्यांनी १५-२० सिनेमात अभिनय केला.१९३२ साली एच एम व्ही ने गोहरजानच्या आवाजातील कान्होपात्राच्या रेकॉर्डस काढल्या. हिच गाणी बालगंधर्वांनी काही वर्षे अगोदर कोलंबियाकरीता गायली होती.गोहरच्या या कॉपी प्रकरणाने बालगंधर्व चिडले व गोहरच्या विरोधात कोर्टात गेले. कोर्टात परस्परांशी भांडणारे हे दोघे पुढे काही वर्षांनी एकमेकाचे जीवन साथी बनले.मराठी रसिकांना गोहरचा कायम रागच आहे. तिने गंधर्वांची अवहेलना केली.त्यांच्या तब्येतीची हेळसांड केली वगैरे वगैरे.. पण गोहरची सुध्दा काही एक बाजू होती हि कधी कुणी विचारात घेतलीच नाही.अगदी अलिकडे आलेल्या ’बालगंधर्व’सिनेमात देखील गोहरला खलस्वरूपात दाखवले आहे. त्यांनी बालगंधर्वांच्या वृद्धापकाळात त्यांची खूप सेवा केली. गंधर्व नाटक मंडळी जेव्हा आर्थिक संकटात होती, तेव्हा त्यांनी आपल्या परीने कंपनी सावरण्याचा प्रयत्न केला.बालगंधर्वांच्या गायकीची शिस्त आणि परंपरा जपण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

================================

हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?

================================

बालगंधर्व आणि गौहरबाईंचे नाते त्या काळी अत्यंत वादग्रस्त ठरले होते.बालगंधर्व आपल्या कुटुंबाला सोडून गौहरबाईंसोबत राहू लागले होते. ही गोष्ट बालगंधर्वांच्या अनेक चाहत्यांना आणि त्यांच्या तत्कालीन समाजाला रुचली नव्हती.अनेक वर्षांच्या सहजीवनानंतर, १९५१ मध्ये बालगंधर्वांनी गौहरबाईंशी कायदेशीर विवाह केला. या पुस्तकात मात्र कन्नड लेखकांच्या नजरेतून या प्रकरणाचे व्यवस्थित विश्लेषण केले आहे.गंधर्वांशी लग्न केल्यावर तिच्याच वाट्याला कशी उपेक्षा आली हे सोदाहरणासोबत स्पष्ट केले आहे. सारा महाराष्ट्र जेंव्हा गंधर्वांना विसरला होता तेंव्हा गोहरनेच त्यांना अक्षरश: सांभाळल होतं! दुर्दैवाने ती गंधर्वांच्या आधीच १९६४ साली गेली! गौहरबाईंचे निधन १९६४ मध्ये झाले. त्यांच्या निधनानंतर बालगंधर्व पूर्णपणे एकाकी पडले आणि अवघ्या तीन वर्षांत (१९६७ मध्ये) त्यांचेही निधन झाले. या दोन्ही बहिणींना गुणवत्ता असूनही लौकिकार्थाने यश आणि गौरवापासून कायम वंचितच रहावं लागलं.

धनंजय कुलकर्णी : बात पुरानी बडी सुहानी

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amirbai Karnataki Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.