मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
अमिताभ आणि माधुरी रुपेरी पडद्यावर एकत्र आले नाहीत ?
ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला माधुरी दीक्षित हिचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. राजश्री प्रोडक्शनच्या ‘अबोध’ या सिनेमातून. याच काळात तिने एका टीव्ही सिरीयल मध्ये काम केले होते. पण ते फारसे कुणाच्या लक्षात आले नाही, सुरुवातीला बरेच सिनेमे फ्लॉप दिल्यानंतर १९८८ साली आलेल्या एन चंद्राच्या ‘तेजाब’ या चित्रपटानंतर मात्र माधुरी दीक्षित लेडी सुपरस्टार बनली. याच काळात अमिताभ बच्चन काही काळ राजकारण करून पुन्हा एकदा रुपेरी पडदा परतले होते. (Movie)
माधुरीने अनिल कपूर, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान या समवयस्क कलाकारांच्या सोबतच जितेंद्र, विनोद खन्ना यांच्यासोबत देखील नायिकेच्या भूमिका केल्या होत्या. साहजिकच अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी एकत्र येणे अपरिहार्य होते परंतु प्रेक्षकांचे दुर्दैव असे की, एकाही चित्रपटात ते नायक – नायिका म्हणून एकत्र आले नाही. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न कधी झालाच नाही का ? नक्की झाला, चार चित्रपट असे आहेत की, जे चित्रपटातून हे दोघे एकत्र आले असते. परंतु दुर्दैवाने हे चारही सिनेमा बंद पडले. (Movie)
जे पी दत्ता यांनी १९८९ साली ‘बंधुआ’ हा एक चित्रपट जाहीर केला होता. चित्रपटाच्या नावावरून तो उत्तरेकडील वेठबिगारी पद्धतीवरील चित्रपट असावा असे वाटते. यात अमिताभ बच्चन यांची नायिका माधुरी दीक्षित होती. चित्रपटाचा मुहूर्त जोरात पार पडला होता. पण मुहूर्ताच्या पलीकडे हा चित्रपट काही गेलाच नाही. याच काळात दिग्दर्शक टिनू आनंद यांनी ‘शिनाख्त’ नावाचा एक चित्रपट अनाउन्स केला. यात देखील ही जोडी एकत्रित काम करणार होती. पण काही कारणाने हा चित्रपट देखील डब्यात दिला.
ऋतुपर्ण घोष यांनी या दोघांना घेऊन ‘सत्यजित रे’ यांच्यावरील बायोपिक काढण्याचा विचार केला होता. ज्यात ‘सत्यजित रे’ च्या भूमिकेमध्ये अमिताभ बच्चन आणि त्यांच्या मैत्रिणीच्या म्हणजेच माधवी मुखर्जीच्या भूमिकेमध्ये माधुरी दीक्षित काम करणार होती. सुरुवातीपासूनच या चित्रपटाच्याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या होत्या. ‘सत्यजित रे’ यांच्या आयुष्यातील नाजूक प्रसंगांना जनतेसमोर आणणे बरोबर नाही असे काही जणांना वाटत होते. (Movie)
त्यामुळे ऋतूपूर्ण घोष यांनी हा विचार थांबवला. खरं तर एक चांगला चित्रपट या निमित्ताने प्रेक्षकांच्या समोर आला असता. नव्वदच्या दशकात डेव्हिड धवन यांनी अमिताभ बच्चन आणि गोविंदा या दोघांच्या दुहेरी भूमिकेतील ‘बडे मिया छोटे मिया’ हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आणला होता. यात गोविंदाची नायिका माधुरी दीक्षित. अमिताभ आणि माधुरी यांनी या चित्रपटात एकत्र स्क्रीन शेअर केला होता पण ते या चित्रपटात नायक नायिका नव्हते. ‘लीला’ या चित्रपटाचे दिग्दर्शक सोमनाथ सेंन यांनी देखील अमिताभ बच्चन- माधुरी दीक्षित आणि डिम्पल कपाडिया यांना एकत्र घेऊन चित्रपट बनवण्याचा प्लॅन केला होता. पण हा प्रोजेक्ट देखील पूर्ण होऊ शकला नाही.
=============
हे देखील वाचा : ‘आय ॲम ॲन ॲक्सीडेंटल हिरो’ : अशोक कुमार
=============
एकाच कालखंडात रुपेरी पडद्यावर कार्यरत असताना अमिताभ बच्चन आणि माधुरी दीक्षित यांनी केवळ डेव्हिड धवन यांच्या ‘बडे मिया छोटे मिया’ या चित्रपटात ‘मेरे प्यार का रस जरा चखना ओ मखना…’ या एका गाण्यापुरता स्क्रीन शेअर केला. ही जोडी जशी जमली नाही तसेच पटकन आठवते ती अलीकडच्या काळातील सलमान खान आणि जुही चावला ही जोडी. हे दोघे देखील कधीच पडद्यावर नायक-नायिकेच्या भूमिकेत एकत्र आले नाही. तसेच आमिर खान आणि ऐश्वर्या रॉय हे देखील कधी रुपेरी पडद्यावर नायक-नायिकेच्या भूमिकेत एकत्र आलेले आपल्याला दिसले नाहीत. आज माधुरी दीक्षित पुन्हा एकदा नव्याने रुपेरी पडद्यावर येत आहे अमिताभ देखील अजूनही कार्यरत आहेत बघूया या दोघांना एकत्र येण्याचा योग येतो का ?