Prajakta Gaikwad चं ‘ठरलं’; फोटो शेअर करत अभिनेत्रीने चाहत्यांना दिली

नासीर हुसेन यांनी Amitabh Bachchan यांना ‘यादों की बारात’ मधून कां डच्चू दिला होता?
महानायक अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला स्वतःला सिद्ध करण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला. ओळीने डझनभर सिनेमे फ्लॉप दिल्यानंतर त्यांचा जंजीर हा चित्रपट ११ मे १९७३ रोजी प्रदर्शित झाला आणि त्यांच्या करिअरचा ग्राफ एकदम वर चढला! पण या पूर्वीच्या काळामध्ये त्यांना अतिशय वाईट पध्दतीने अनेक चित्रपटातून काढून टाकण्यात आले होते . फ्लॉप स्टार म्हणून त्यांना कोणीही सिनेमात घ्यायला तयार नव्हतं. यात एक चित्रपट होता नासिर हुसेन यांचा ‘यादों की बारात’. या सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांना आधी कास्ट केलं होतं पण डिस्ट्रीब्युटर्स यांनी मोठा दबाव निर्मात्यावर आणला आणि अमिताभ बच्चन यांना सिनेमातून डच्चू मिळाला. त्यांच्या जागी विजय अरोरा सिनेमात आले. गंमत म्हणजे ‘जंजीर’ आणि ‘यादों की बारात’ या दोन्ही चित्रपटाची सुरुवात साधारणत: १९७२ साली झाली.

‘यादों की बारात’ थोडा आधी सुरू झाला. दोन्ही चित्रपटांची कथा, पटकथा आणि संवाद सलीम जावेद यांनी लिहिली होती. ‘जंजीर’ आधी पूर्ण झाला आणि ११ मे १९७३ या दिवशी प्रदर्शित झाला आणि सुपर डुपर हिट झाला. या ‘जंजीर’ च्या यशाने ‘यादों की बारात’ या चित्रपटाचे निर्माता दिग्दर्शक नासिर हुसेन यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण एकतर या दोन्ही सिनेमाचे बऱ्यापैकी सारखे होते. दोन्ही सूड कथा होत्या. दोन्ही चित्रपटात लहान मुलांच्या समोर त्यांच्या आई-वडिलांची हत्या होते आणि हि मुलं मोठी झाल्यावर आपल्या बापाच्या हत्येचा सूड घेताना दोन्ही सिनेमात दाखवले होते. त्यामुळे नासिर हुसेन ‘जंजीर’ च्या यशानंतर पुरते घाबरून आणि हादरून गेले होते.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
दोन्ही सिनेमाचा खलनायक एकाच आहे अजित. प्रेक्षक हा सारखेपणा कसा स्वीकारतील? पण सलीम जावेद यांनी त्यांना समजावून सांगितले,” दोन्ही चित्रपटाच्या कथानकात जरी तुम्हाला साम्य दिसत असले तरी दोन्ही सिनेमाचा जॉनर हा टोटली वेगळा आहे. ‘जंजीर’ एक सोलो हिरो ॲक्शन सिनेमा आहे. तर ‘यादों की बारात’ हा ॲक्शन, इमोशन आणि म्युझिकल ड्रामा आहे. इथे चित्रपटात रोमान्स आहे, फडकते म्युझिक आहे, मिलना बिछडना फॉर्मुला आहे. जो जंजीर मध्ये अजिबात नाही. तेंव्हा डोंट वरी.” तरीही नासिर हुसेन आपल्या चित्रपटात छोटे छोटे बदल करून ‘जंजीर’ ची छाप आपल्या सिनेमावर पडणार नाही याची काळजी घेत होते.

दुसरीकडे आता डिस्ट्रीब्यूटर ‘जंजीर’ च्या यशा नंतर अमिताभचे दिवाने झाले होते आणि त्यांनी तर नासिर हुसेन यांना असा सल्ला दिला की तुम्ही आता विजय अरोरा ला सिनेमातून काढून टाका आणि तिथे अमिताभ बच्चन ला पुन्हा कास्ट करा. नासिर हुसैन यांचा चित्रपट ७० टक्क्या हून अधिक तयार झाला होता. अशा परिस्थितीत डिस्ट्रीब्यूटर च्या सांगण्यानुसार बदल करणे म्हणजे पायावर दगड टाकण्यासारखं होतं. काय करावे? पण सलीम जावेद यांनी त्यांना समजावून सांगितले “ चित्रपट पूर्ण करा आणि प्रदर्शित करा घाबरू नका. सिनेमा नक्की हिट होईल.” नासीर हुसेन यांनी आर डी ची गाणी मस्त चित्रित केली. सूड कथा आता बऱ्यापैकी प्रेमकथा झाली. सिनेमा पूर्ण केला. पण प्रदर्शन मात्र ते लांबवत गेले.
‘बॉबी’ आणि ‘जंजीर’ ची हवा कमी झाल्यानंतर ९ नोव्हेंबर १९७३ ( जंजीर या सिनेमाच्या नंतर तब्बल सहा महिन्यांनी) हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने चांगला देखील बिजनेस केला. नासीर यांना जी भीती वाटत होती ती कुठल्या कुठे पळाली. धर्मेंद्र, विजय अरोरा, तारिक, झीनत, नीतू सिंग आणि अजित अशी तगडी स्तर कास्ट होती. आर डी चे बेफाम संगीत होते. चुरा लिया है तुमने जो दिल को, लेकर हम दिवाना दिल, आपके कमरे में कोई रहता है, यादों के बारात निकली है आज दिल के द्वारे, मेरी सोनी मेरी तमन्ना .. या गाण्यांनी कहर लोकप्रियता मिळवली.

१९७३ या वर्षीच्या टॉप टेन सिनेमाची जर यादी पाहिली तर ‘जंजीर’ चौथ्या क्रमांकावर होता तर त्याच्या पाठोपाठ ‘यादों के बारात’ पाचव्या क्रमांकावर होता. त्या वर्षीच्या टॉप थ्री चित्रपटात नंबर एक वर ऋषी कपूर- डिम्पल यांचा बॉबी, नंबर दोन वर धर्मेंद्र-हेमा चा जुगनू आणि नंबर तीन राजेश-शर्मिला-राखी चा ‘दाग’ हे चित्रपट होते. त्यावर्षी अमिताभचे सहा चित्रपट प्रदर्शित झाले. त्यापैकी ‘जंजीर’ सर्वाधिक यशस्वी झाला. ‘बंधे हाथ’ आणि ‘गहरी चाल’ हे ॲक्शन थ्रिलर चित्रपट असून देखील त्याला प्रेक्षकांनी फारशी गर्दी केली नाही. ‘नमक हराम’ हा ऋषिकेश मुखर्जी यांचा चित्रपट चांगला चालला.
‘अभिमान’ या चित्रपटाचे देखील रसिकांनी चांगले स्वागत केले. राजश्री प्रॉडक्शन चा ‘सौदागर’ हा चित्रपट एका लिमिटेड ऑडीयन्स आवडला. यावर्षी धर्मेंद्र चे आठ सिनेमे प्रदर्शित झाले होते आणि त्यातील बहुतांशी सिनेमे सुपरहिट झाले. त्यातील ‘जुगनू’ आणि ‘यादों की बारात’ हे चित्रपट तर टॉप फाईव मध्ये होते. टॉप टेन मध्ये आणखी तीन चित्रपट होते. किमत, कहानी किस्मत की आणि लोफर ! बॉक्स ऑफिसच्या नजरेतून पाहिलं तर धर्मेंद्रचा स्टार डम यावर्षी अमिताभ बच्चन पेक्षा भारी होता. पण अमिताभ बच्चन च्या जंजीर ने बॉलीवूडचे गणित बदलवून टाकले.
================================
हे देखील वाचा : अमिताभ आणि जया यांना हनिमूनहून तातडीने का परत यावे लागले?
================================
जर ‘यादों की बारात’ मध्ये अमिताभ बच्चन राहिले असते तर अमिताभ आणि धर्मेंद्र यांचा तो पहिला चित्रपट ठरला असता. अमिताभ यांना रिप्लेस करून आलेला विजय अरोरा त्या काळामध्ये लोकप्रिय कलावंत होता. त्या काळातील एका सिनेमा मॅक्झिनला दिलेल्या मुलाखतीत राजेश खन्ना याने त्याचे कौतुक करताना म्हटलं होतं ,” जर माझी कोणी रिप्लेसमेंट करू शकेल तो विजय अरोरा!” अर्थात हे त्याने विनोदाने म्हटले होते की नाही माहित नाही. पण ‘यादों के बारात’ नंतर विजय अरोरा याचं मार्केट चांगलंच वाढलं आणि बरेच चित्रपट मिळाले. पण लवकरच त्याची जादू कमी झाली . नंतर पंधरा वर्षांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या मालिकेत त्याने मेघनाथची भूमिका केली ही त्याची भूमिका हीच त्याची आयडेंटी ठरली. सलीम जावेद यांनी मात्र एकच कथा वेगवेगळ्या पद्धतीने दोन चित्रपटात वापरली आणि दोन्ही सिनेमे सुपरहिट करून दाखवले!