
Amitabh Bachchan : अयोध्येत बिग बींनी खरेदी केली आणखी एक प्रॉपर्टी, किंमत ऐकून थक्क व्हाल!
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारे बिग बी प्रॉपर्टीमध्ये सध्या विशेष गुंतवणूक करत आहेत. अयोध्येत राम मंदिर (Ayodhya Ram Mandir) उभारल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी चौथी मालमत्ता नुकतीच खरेदी केली आहे. राम मंदिरामुळे तेथील रिअल इस्टेट मार्केटमध्ये भरारी आल्यामुळे अमिताभ तिथे जमिनीची गुंतवणूक करत असून नुकतीच त्यांनी ४० कोटींची तब्बल २५ हजार चौरस फूटचा प्लॉट खरेदी केली आहे.(Entertainment tadaka)

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांनी खरेदी केलेली जमीन ‘शररयू’ या प्रीमियम लँड पार्सलजवळ असल्याचं म्हटलं जातं आहे. ज्यात अमिताभ यांनी पूर्वीच १४.५ कोटींची गुंतवणूक केली होती. दरम्यान, नवा प्लॉट खरेदी करण्यापूर्वी बिग बींनी आणि अभिषेक बच्चनने बॉलिवूड निर्माते आनंद पंडित यांच्या मालकीच्या रिअल इस्टेट फर्ममध्ये प्रत्येकी १० कोटी रुपये गुंतवले होते. इतकंच नाही तर राम मंदिर उद्घाटनापूर्वी ४.५४ कोटींनाही एक प्लॉट खरेदी केला होता. अयोध्येत अमिताभ यांनी केलेल्या महच्वाच्या गुंतवणूकीत वडील हरिवंश राय बच्चन यांच्या नावावर असलेल्या ट्रस्ट अंतर्गत ५४,००० चौरस फूट भूखंड देखील त्यांनी खरेदी केला असून त्यांच्या नावे भव्य स्मारक उभारण्याची त्यांची कल्पना आहे.(Bollywood news)
================================
=================================
सिनेसृष्टीतील अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ‘कल्की २८९८ एडी’ नंतर ‘वेट्टाय्यां’ या चित्रपटात ते शेवटचे दिसले होते. सध्या ते ‘कौन बनेगा करोडपती’च्या १७ व्या सीझनची तयारी करत आहेत. तसेचस लवकरच त्यांचा ‘कल्की २’ देखील भेटीला येणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात अमिताभ बच्चन पुन्हा एकदा हिंदीसह साऊथ इंडस्ट्रीतही दमदार चित्रपट देणार असं चित्र सध्या दिसून येत आहे.(Amitabh Bachchan movies)