Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला खुलासा

 Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला खुलासा
Amitabh bachchan
कलाकृती तडका

Amitabh Bachchan : “जाण्याची वेळ झाली…”, पोस्टचा बिग बींनी केला खुलासा

by रसिका शिंदे-पॉल 28/02/2025

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर फार एक्टिव्ह असतात. जगभरात घडणाऱ्या घडामोडींवर त्यांचं लक्ष असतं आणि ते सतत त्यांची मतं व्यक्त करत असतात. बऱ्याचदा अमिताभ बच्चन सोशल मिडीयावर केवळ काही शब्दांच्या सूचक पोस्ट करतात आणि चाहत्यांना बूचकळ्यात पाडतात. अशीच काहीशी पोस्ट काही दिवसांपूर्वी त्यांनी केली होती ज्यात त्यांनी ‘आता जाण्याची वेळ आली’ असं लिहिलं होतं. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत बिग बींबद्दल काळजी व्यक्त केली होती. आता स्वत: अमिताभ यांनी त्या वाक्यांचा खुलासा केला आहे.

अमिताभ बच्चन यांनी ७ फेब्रुवारीला एक पोस्ट केली होती. त्यात “जाण्याची वेळ झाली…” असं लिहिलं होतं. त्यांची ही पोस्ट पाहून चाहत्यांची चिंता वाढली होती. नेटकऱ्यांनी बिग बींची तब्येत बरी नाही आहे का? किंवा कोन बनेगा करोडपती? या शोमधील ते एक्झिट घेत आहेत का? असे अनेक प्रश्न विचारले होते. यावर बिग बी म्हणाले की, “माझी कामावर जाण्याची वेळ झाली आहे. कमाल आहात तुम्ही. मला इथून (केबीसी सेटवरून) रात्री २ वाजता सुट्टी मिळते, घरी पोहोचायला उशीर होतो. रात्री ते लिहिता लिहिता मी झोपलो, त्यामुळे ते अर्धवट राहिलं आणि ‘जाण्याची वेळ झाली’ इतकंच लिहिलं आणि मी झोपलो.”

============

हे देखील वाचा :  Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?

============

त्यानंतर २८ फेब्रुवारीला अमिताभ बच्चन यांनी दुसरी एक पोस्ट केली होती. त्यात “जावं की थांबावं”, असं लिहिलं होतं. आधी जाण्याची वेळ झाली लिहिणाऱ्या बिग बींनी त्याच आशयाची पुन्हा पोस्ट केल्याने ते नेमकं कशाबद्दल बोलतायत हे चाहत्यांना जाणून घ्यायचं होतं. अखेर त्यांनी यावरही उत्तर दिलं असून “ते कामाबद्दल होतं”, असं म्हटलं आहे.

८२ वर्षांचे असूनही अमिताभ बच्चन कल्की सारख्या चित्रपटात अॅक्शन सीन्स करताना दिसतात. लवकरच अमिताभ बच्चन ऑंख मिचौली २, ब्रम्हास्त्र २, कल्की २, सेक्शन ८४, या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. तसेच, रजनीकांत यांच्यासोबत ३३ वर्षांनी Vettaiyan मध्ये स्क्रिन शेअर करणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bacchan social media Amitabh Bachchan Big B Bollywood bollywood celebrity bollywood update entertainment update facebook kon Banga crorepati mahanayak social media twiiter
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.