Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बिग बी दिसणार अश्वत्थामाच्या भूमिकेत

 बिग बी दिसणार अश्वत्थामाच्या भूमिकेत
बॉक्स ऑफिस

बिग बी दिसणार अश्वत्थामाच्या भूमिकेत

by रसिका शिंदे-पॉल 22/04/2024

प्रभासच्या ‘कल्की २८९८ एडी’ बद्दल जितके लोक उत्सुक आहेत तितकेच निर्माते गुप्तपणे चित्रपटाशी संबंधित नवनवे अपडेट देत आहेत. नुकतेच अमिताभ बच्चन (Big B as Ashwatthama) यांचे या चित्रपटातील पोस्टर रिलीज करण्यात आले जे पाहून प्रेक्षक प्रचंड उत्सुक झाले आहेत.

नाग अश्विनच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या मल्टीस्टारर बिग बजेट चित्रपटात अमिताभ यांची भूमिका काय असेल, हे २१ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. पण त्याचं पोस्टर बघितल्यानंतर अमिताभ (Big B as Ashwatthama) कोणत्या व्यक्तिरेखेत दिसणार आहेत, याचा अंदाज लोकांनी बांधला आहे.

चित्रपटाच्या प्लॉटबद्दल फारशी माहिती बाहेर आलेली नसली तरी जेव्हापासून या चित्रपटाचा पहिला टीजर (Big B as Ashwatthama) आला आहे तेव्हापासूनच लोक या चित्रपटाची कथा विष्णु यांच्या जीवनावर बेतलेली असणार आहे.

पुराण आणि विज्ञान या दोन्हीचा एक मस्त मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. आजपासून तब्बल ८०० वर्षांपूर्वीची गोष्ट या चित्रपटातून उलगडणार आहे.

चित्रपटातील बिग बी (Big B as Ashwatthama) यांचा नवीन लुकही प्रेक्षकांसमोर आला असून या टीझरला उत्तम प्रतिसादही दिला आहे. बिग बींच्या पोस्टरमध्ये ते साधूच्या अवतारात दिसून येत आहेत. तसेच त्यांच्या चेहऱ्यावर पट्ट्या आहेत.

या चित्रपटाच्या टीझरमध्ये अमिताभ बच्चन (Big B as Ashwatthama) व एका लहान मुलांचे संभाषण आपल्या कानावर पडत आहे. व्हिडीओत अमिताभ बच्चन यांचे संपूर्ण शरीर पांढऱ्या कपड्याने झाकलेले असून फक्त त्यांचे डोळे दिसत आहे. या चित्रपटात बिग बी अश्वत्थामा यांच्या भूमिकेत दिसणार आहेट.

ते शिवलिंगाची पूजा करत असताना तेवढ्यात एक मुलगा त्यांच्याकडे येतो आणि म्हणतो, ‘हाय…मी राया आहे.’ यानंतर तो अश्वथामाला ((Big B as Ashwatthama)) बरेच प्रश्न विचारतो. मग अश्वत्थामाच्या कपाळातून रक्त येतं आणि मुलगा म्हणतो, “तू देव आहेस?” यावर ते म्हणतात, “आता वेळ आली आहे, माझ्या शेवटच्या युद्धाची वेळ आली आहे.”

===

हेदेखील वाचा : Pushpa 2: रिलीजआधी ‘पुष्पा २’ने रचला ‘हा’ रेकॉर्ड; कमावणार ‘इतके’ कोटी

===

यानंतर ते अश्वत्थामाची ओळख सांगतात. यामध्ये लहान मुलगा तेलुगूमध्ये बोलताना दिसतो, तर अमिताभ बच्चन (Big B as Ashwatthama) हिंदीत बोलतात. या टीझरची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

अमिताभ अश्वत्थामा (Big B as Ashwatthama) म्हणून आणि प्रभास विष्णुच्या भूमिकेत पाहायला मिळण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. हिंदू मान्यतेनुसार द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा हा गेली कित्येक वर्षं जीवंत आहे आणि कलयुगाचा अंत जेव्हा जवळ येईल तेव्हा कल्की त्याला या शापातून मुक्त करेल.

या पौराणिक कथांचे संदर्भ लक्षात घेता अमिताभ यात अश्वत्थामाचीच भूमिका करणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अद्याप चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याबद्दल कोणीतही अधिकृत घोषणा झालेली नाही. या चित्रपटाच्या प्रदर्शनची तारीख जसजशी जवळ येतीये तसतसे यातील प्रत्येक पात्राबद्दल नवीन अपडेट समोर येत आहे.

सध्या प्रेक्षक या चित्रपटासाठी प्रचंड उत्सुक असल्याचं स्पष्ट होत आहे. साऊथचा सुपरस्टार प्रभास आणि बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदूकोण यात प्रथमच एकत्र झळकणार आहे. याबरोबरच या चित्रपटात अमिताभ बच्चन (Big B as Ashwatthama) आणि कमल हासनसुद्धा महत्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor Amitabh Bacchan Bollywood Bollywood Actor bollywood update Celebrity Celebrity News Entertainment Entertainment News kalki 2898 ad prabhas South Indian Movies
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.