‘काजळमाया’ मालिकेमुळे ‘या’ 2 मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप?

Amitabh Bachchan Birthday Special : ‘डॉन’ ते ‘खुदा गवाह’; बिग बींनी साकारलेले डबल रोल…
हिंदी चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचा आज ८३ वा वाढदिवस… ५० वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केलं आहे… आजही कल्की सारख्या बिग बजेट चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या अमिताभ बच्चन यांनी तरुण कलाकारांना लाजवतील अशा भूमिका साकारत आहेत… आज त्यांच्या वाढदिवशी त्यांनी साकारलेले डबल रोल जाणून घेऊयात…

१९८२ साली रिलीज झालेल्या ‘सत्ते पे सत्ता’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली… यातील त्यांच्या डबल रोलच्या भूमिकेमुळे चित्रपट अधिक गाजला होता… यानंतरचा चित्रपट म्हणजे ‘डॉन’… बिग बींच्या करियरमधील महत्वाच्या चित्रपटांपैकी एक म्हणजे हा चित्रपट ‘डॉन’…. पुढचा चित्रपट आहे ‘महान’ जो रिलीज झाला होता १९८३ मध्ये… या त बिग बींनी डबल नव्हे तर ट्रीपल रोल साकारला होता.
पुढचा चित्रपट आहे ‘सुर्यवंशम’… या चित्रपटात तर अमिताभ बच्चन यांनी स्वत:च्याच वडिलांची भूमिका केली होती… १९९९ सालामध्ये आलेल्या या चित्रपटाला मोठ्य़ा पडद्यावर फारसं यश मिळालं नव्हतं… पण नंतर टेलिव्हिजनवर प्रेक्षकांचाहा फेव्हरेट चित्रपट ठरला… यानंतरचा चित्रपट आहे आखरी रास्ता… १९८६ साली प्रदर्शित झालेल्या ‘आखरी रास्ता’ या चित्रपटामध्ये बच्चन डबल श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यासोबत झळकले होते…

‘देश प्रेम’… १९८२ सालामध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. यात अमिताभ बच्चन यांनी एका स्वातंत्र्य सेनानीची भूमिका साकारली होती. या काळामध्ये बिग बींनी अनेक अॅक्शनपट करण्यास सुरुवात केली होती. नंतर, ‘तूफान’ १९८९ मध्ये आला ज्यात अमिताभ यांची जबरदस्त अॅक्शन पाहायला मिळाली होती.
================================
================================
‘खुदा गवाह’.. १९९२ सालामध्ये आलेल्या या चित्रपटाचं काही भागाचं शूटिंग अफगाणिस्तानमध्ये करण्यात आलं होतं. या चित्रपटाला तीन फिल्म फेअर पुरस्कार मिळाले होते. यात साउथ सुपरस्टाकर नागार्जुन देखील मुख्य भूमिकेत झळकले होते. याशिवाय बिग बींनी १९९१ सालामध्ये आलेल्या ‘हम’ तसचं, ‘लाल बादशहा’, ‘बडे मिया छोटे मिया’, ‘कसमें वादे’, ‘द ग्रेट गैम्बलर’, या चित्रपटांमध्येही डबल रोल साकारले आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi