
Amitabh Bachchan : “उभं राहून पॅन्ट घालणंही झालंय अवघड”; वाढत्या वयाबद्दल काय म्हणाले बिग बी
साऊथमध्ये रजनीकांत (Rajinikanth) आणि बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी Age is just a number हे वाक्य आपल्या अभिनयानं सिद्ध केलं आहे… आजही वयाची ८० पार केली असूनही अमिताभ बच्चन यांचं अभिनय कौशल्य भल्याभल्यांना अवाक् करणारं आहे… शिवाय, यंग जनरेशनसोबत कनेक्टटेड राहण्यासाठी बिग बी सोशल मिडियावरही सक्रिय असतात… अशातच त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये वाढत्या वयातल्या परिणामांबाबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत… नेमकं ते काय म्हणाले आहेत जाणून घेऊयात…

तर अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत आपल्या वयाबद्दल काही गोष्टी शेअर करताना म्हटलंय की, “पूर्वी सोपी वाटणारी दैनंदिन जीवनातली अगदी लहान सहान कामं करताना आता जास्त लक्ष द्यावं लागलं आणि मेहनतही घ्यावी लागते. अमिताभ यांनी असंही सांगितलं की, त्यांच्या डॉक्टरांनीच त्यांना सल्ला दिलाय की, पॅन्ट घालताना कुठेतरी बसा, यामुळे बॅलेन्स जाऊन पडण्याची भिती नसते. पुढे बोलताना अमिताभ बच्चन यांनी कबुल केलं की, “आता घरात ‘हँडल बार्स’ची गरज भासते. कारण आता साधा कागदाचा तुकडा उचलण्यासाठीही वाकणं पूर्वीसारखं सहज राहिलेलं नाही…” (Bollywood News)
पुढे बिग बी म्हणाले की, “आता दैनंदिन दिनचर्या औषधं आणि महत्त्वाच्या कामांनुसार नियोजित केली जातात. प्राणायाम आणि हलका योगा करणं, जिममध्ये सक्रिय राहणं, संतुलन राखणं… हे सर्व आता आवश्यक झालंय. पूर्वीच्या सवयी ज्या सोप्या वाटत होत्या, त्या आता पुन्हा सुरू करणं कठीण आहे. एका दिवसाचा फरक देखील वेदना आणि वेगावर परिणाम करतो…”

अमिताभ बच्चन असं देखील म्हणाले की,”आता पॅन्ट घालणंही सोपं राहिलेलं नाही. डॉक्टरांनी सांगितलं की, मिस्टर बच्चन, बसून पॅन्ट घाला, उभं राहून घालू नका, नाहीतर तोल जाऊन पडू शकता… हे ऐकून मी मनातल्या मनात हसलो, पण नंतर लक्षात आलं की, ते किती बरोबर होतं. टेबलावरून उडून गेलेली एक साधी चिठ्ठी उचलण्यासाठीही आता शरीर वाकताना आधार लागतो…” (Amitabh Bachchan Movies)
तसेच, वाढतं वय आणि त्यासोबत येणाऱ्या आव्हानांचा स्वीकार करण्याबद्दल बच्चन म्हणाले की, “माझी एकच इच्छा आहे की, ही अवस्था तुमच्यापैकी कुणालाही कधीच अनुभवायला लागू नये. पण खरं सांगायचं, तर ही वेळ प्रत्येकावर येतेच. आपण या जगात जन्म घेतो, तेव्हापासूनच हळूहळू उताराची वाट चालायला लागतो. हे दुःखद आहे, पण हेच जीवनाचं कटू सत्य आहे.”
================================
हे देखील वाचा : Rajinikanth : नाहीतर ‘दशावतार’मध्ये दिसले असते रजनीकांत !
=================================
दरम्यान, अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल बोलायचं तर, बिग बी सध्या ‘कौन बनेगा करोडपती’च्या नव्या सीझनमध्ये व्यस्त आहेत. तसेच, लवकरच ते नितेश तिवारी दिग्दर्शित ‘रामायण’ (Ramayana Movie) चित्रपटात जटायूला आपला आवाज देणार असून संपूर्ण चित्रपटाचं निवेदन देखील ते आपल्या भारदस्त आवाजात करणार आहेत.. शिवाय, लवकरच ‘कल्की २’ (Kalki 2 Movie) देखील येईल अशी चर्चा रंगली आहे..
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi