Sairat : आर्ची-परशा पुन्हा येणार भेटीला; रि-रिलीज ट्रेण्डमध्ये सैराटची वर्णी

Amitabh Bachchan : बिग बींच्या ऐवजी २४ वर्षांनी ‘केबीसी’चा होस्ट बदलणार?
“रिश्ते मैं तो हम तुम्हारे बाप लगते है…” खरंच हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकाराचे बाप आहेत अमिताभ बच्चन. ‘शोले’, ‘दीवार’, ‘शहनशाह’, ‘दोस्ताना’, ‘नसीब’, अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारली भूमिका प्रेक्षकांच्या मनात अजरामर आहे. अॅंग्री यंग मॅन अशी ओळख मिळवणारे बिग बी जितके चांगले अभिनेते आहेत तितकेच चांगल ते सुत्रसंचालकही आहेत. २००० सालापासून सुरु असलेला ‘कौन बनेगा करोडपती?’ हा शो ते होस्ट करत असून तब्बल २४ वर्षांनी बिग बी यांच्या जागी नवा होस्ट शोधण्याची धावपळ सुरु आहे असं सांगितलं जातंय आहे. काय आहे कारण जाणून घेऊयात….(Amitabh Bachchan)
“देवीयों और सज्जनो… “ हे वाक्य ऐकलं डोळ्यांसमोर उभा राहतो केबीसी (KBC Show) कार्यक्रम. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या भारदस्त आवाज, उत्तम व्यक्तिमत्व, आत्मियता आणि उत्कृष्ट सुत्रसंचालनाच्या जोरावर केबीसीचे १६ सीझन त्यांनी होस्ट केले आहेत.पण सध्या वयोमानानुसार अमिताभ बच्चन व्यावसायिक जबाबदाऱ्या कमी करताना दिसून येत आहेत. खरं तर यापूर्वीच अमिताभ बच्चन केबीसी (KBC) हा शो सोडणार होते पण त्यांच्या जागी दुसरा चांगला होस्ट न मिळाल्यामुळे त्यांनी १६ वा सीझनही होस्ट केला होता. (Bollywood and relality show masala)

अमिताभ बच्चन केबीसी सोडणार अशा चर्चा सुरु असताना इंडियन इन्स्टिट्यूट ऑप ह्युमन ब्रॅण्डस् आणि रिफ्युजन ऑप रेड लॅब यांनी एक सर्वेक्षण केलं असून जर अमिताभ यांनी केबीसी सोडली तर नवा होस्ट कोण असावा याबद्दल त्यांनी माहिती गोळा केली होती. (Kaun Banega Crorepati)
=============
हे देखील वाचा : Mohammed Rafi : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गायले म.रफीसोबत गाणे!
=============
अमिताभ यांनी केबीसीतून काढता पाय घेतला तर कार्यक्रमाचा प्रेक्षकवर्ग नक्कीच कमी होईल. त्यामुळे त्यांच्या इतकाच तोडीस तोड नवा होस्ट असला पाहिजे असं चाहत्यांचं मत आहे. त्यामुळे Shahrukh Khan, Aishwerya rai-Bachchan यांच्या नावाला चाहत्यांनी पसंती दिली आहे. पण खरंच अमिताभ बच्चन केबीसीतून निवृत्ती घेणार का? यावर अधिकृत शिक्कामोर्तब झाला नसल्यामुळे केबीसी कार्यक्रमात अमिताभ यांचाच आवाज आणि त्यांना पाहायला प्रेक्षकांना मिळणार आहे. (Bollywood update)
अमिताभ बच्चन यांच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास लवकरच ते कल्की २, ब्रम्हास्त्र २ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्याशिवाय तब्बल ३३ वर्षांनी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत ‘Vettaiyan’ या चित्रपटाl एकत्र स्क्रिन शेअर केली. याशिवाय, दीपिका (Deepika Padukone) आणि अमिताभ बच्चन पुन्हा एकदा ‘द इंटर्न’ या अमेरिकन कॉमेडी ड्रामाच्या हिंदी रिमेकमध्येही एकत्र दिसणार आहेत.